बापावर युनिक मराठी कविता चारोळ्या | Best Baapavar Kavita Marathi 2023

बाप हा फार जिव्हाळ्याचा विषय पण काही लिहायचं म्हटलं कि सुचत नाहीत. वाचा Baapavar Kavita Marathi Charolya हा हृदयाला स्पर्श करून जाईलअसा काव्यसंग्रह आहे.

बापासाठी काय लिहायचं ? बाप तर कणखर असतो. त्याला कशाला हवी तारीफ, सहानुभूती, काळजीचे बोल? असा प्रश्न पडलाय का कधी? हा प्रश्न वाचून तुम्हाला नक्कीच वाटले असणार कि या दृष्टीने कधी विचार केलाच नाही. बाप सुद्धा माणूस आहे. तो काही सुपर ह्युमन नाही कि जामुळे त्याला भावना नसतील. बापाला मन आहे आणि त्या मनाला सुद्धा एका सध्या माणसासारखे संकटात आधाराची गरज असते.

बापावर युनिक मराठी कविता चारोळ्या | Best Baapavar Kavita Marathi 2023

आनंदात तारीफ मिळाली तर त्यालाही बरे वाटेल आणि त्याच्या कष्टाची कुणी दाखल घेत आहे हे कळल्यावर त्याला शारीरिक नाही पण मानसिक विसावा तरी मिळेल. अशा या बापासाठी आम्ही खालील सर्व कविता समर्पित करतो.

Baapavar Kavita Marathi 2023 | Marathi Charolya

आपल्या आयुष्याचा सगळ्यात मोठा आधार तो आहे
तरीही हाच बाप अतिशय उपेक्षित आहे
स्वतःचे अश्रू सावरून आपले डोळे पुसत आहे
तरीही हाच बाप अतिशय उपेक्षित आहे

मुलांच्या शिक्षणासाठी दिसतील त्याची हाडे झिजलेली
अनेक रात्री जागून डोळ्याची बाहुली खोल गेलेली
कर्जाचे डोंगर मोजण्यात रात्र रात्र जागत आहे
तरीही हाच बाप अतिशय उपेक्षित आहे

श्रीमंत मित्रांचे लाड पाहून आमचे तोंड व्हायचे वाकडे
आम्हाला दर महिन्याला लागायचे नवीन नवीन कपडे
फाटके जोडे घालून सुद्धा चेहरा हसरा ठेवत आहे
तरीही हाच बाप अतिशय उपेक्षित आहे


एक क्षण सुद्धा विसावा नाही तुझ्या डोळ्याला
माझ्या काळजीचेच स्पंदन असते तुझ्या हृदयाला
मागच्या जन्माची चांगली कर्मे दिसली असती जेव्हा देवाला
तेव्हाच बाबा तुझ्या पोटी घातले असेल मला जन्माला


बापाशिवाय माझी आई कधीच पूर्ण नव्हती
आईचं दूध आणि बापाचं रक्त यातून आली मला शक्ती
बापाचे कधी आभार मानावेत अशी नसते सक्ती
पण जो आभार मानतो त्याला कधी करावी लागत नाही देवाची भक्ती

बापावर युनिक मराठी कविता चारोळ्या | Best Baapavar Kavita Marathi 2023


मुलांसाठी झिजून आपली पूर्ण काया
बाप देत असतो त्याची संपूर्ण छाया
कितीही अवघड क्षण आले तुमच्या आयुष्यात
जीव देईल तो कुटुंबाचे रक्षण करण्यास


बाप म्हणजे करुनीचा महासागर
तीव्र उन्हात थंड सावलीची चादर
धरणी मायेतून धान्याची कोंबे बाहेर काढणारा नांगर
ग्रीष्मातल्या कडक उन्हात गार पाण्याने भरलेली घागर


बापाचं अस्तित्व दिसत नाही कोणाला
दिसणार नाही तुम्हाला तो कधीच प्रेम बोलून दाखवताना
रात्र आणि दिवस ज्याचा एकत्र होतो
संपूर्ण परिवाराचा तो एकटाच सहारा असतो

बापावर युनिक मराठी कविता चारोळ्या | Best Baapavar Kavita Marathi 2023


बाबा होते म्हणून आम्ही आमची स्वप्न पूर्ण करू शकलो
बाबांना नसतील का त्यांची स्वप्ने?

बाबा होते म्हणून आम्ही संकटातून मार्ग काढत पुढे आलो
बाबांना नसतील का त्यांची संकटे?

बाबा होते म्हणून आम्ही रात्री निश्चित झोपी जाऊ शकलो
बाबांना नसतील का त्यांच्या चिंता?

बाबा आता आम्हा सर्वांना सोडून तुम्ही गेलात देवाघरी
आता कसा सोडवू हा आयुष्याचा गुंता?

बापावर युनिक मराठी कविता चारोळ्या | Best Baapavar Kavita Marathi 2023


आकाशात तळपणारा तेजस्वी सूर्य तू
खडतर जीवन प्रवासातील मायेची सावली तू
अनंत कष्टांविरुद्ध न तुटणारी ढाल कणखर तू
अदृश्य देवा पेक्षा जास्त मला आधार देणारा तू


कधी देतो सुख कधी देतो दुःख
असेच असते देवाचे जग रहाटीचे चक्र
बाबा तू मात्र अगदी आहेस देवाच्या विरुद्ध
तुझ्याकडे आहे फक्त सुखाचे अक्षयपात्र


बापावर युनिक मराठी कविता चारोळ्या | Best Baapavar Kavita Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago