प्रेम कथा “एकाकी खिडकी” | Great Love Story Marathi Sad 2023

बालपणाचे प्रेम म्हणजे थोडासा वेडेपणा आणि मनोरंजन, थोडं दुःख थोडं हसू. “एकाकी खिडकी” | Best Love Story Marathi Sad हि एक अशी प्रेम कथा आहे जी सर्वांना लागू होते.

Best Love Story Marathi Sad 2023

खिडकी हे आमच्या दोघांच्या प्रेमाच आरसा होती ,मला बघण्यासाठी तो त्या खिडकीतून डोकावून पाहायचा तर त्याला बघण्यासाठी मी खिडकीच्या खाली असलेल्या छिद्रातून, बघायचे, आम्हा दोघांना एकमेकांना बघण्यासाठी ती “खिडकी” नेहमीच आधार द्यायची. आमच्या दोघांचे लव स्टोरी अगदी लहान मुलाच्या नासमज प्रेमासारखीच होती. तो माझ्यापेक्षा वयाने तीन वर्षांनी मोठा होतो .आणि मी त्याच्यापेक्षा तीन वर्षांनी लहान होते, तो अगदी सिम्पल ,साधा ,आणि अतिशय कमी बोलणारा मुलगा पण जेव्हा तो माझ्यासोबत बोलायचा तेव्हा मनात कुठलाच विचार न ठेवता मनातल सर्वच मला सांगून जायचा, त्याची दुसऱ्याला मदत करण्याची वृत्ती ,त्याचा शांत ,स्वभाव, आणि त्याचा निर्मळ मन माझ्या मनात घर करून गेलं.

Best Love Story Marathi Sad 2023

तोही नकळत बघता बघता माझ्या प्रेमात पडला त्यालाही ते कळलच नाही , त्याचे व्हाट्सअप मेसेजेस सुरू झाले, तो मला मेसेज करायचा आणि मेसेज मध्ये जेवण केलं का याशिवाय दुसरं काहीच बोलायचं नाही, मला त्याचे हे बोलणं खूप आवडायचं, त्यांनी घेतलेली काळजी मनाला स्पर्श करून जायची. तो त्याच्या दरवाज्यात उभा राहून एकटक सतत माझ्या खिडकीकडे डोकावून पाहायचा .आणि मी त्याला न दिसता त्या खिडकी खाली असलेल्या छिद्रातून त्याला बघायचे, त्याचा आवाज जरी आला ना तरी मी धावत माझ्या खिडकीकडे यायचे ,आणि त्या खिडकीतून त्याला पाहायचे, तो कुठेही बाहेर जाताना गाडीचा हॉर्न वाजवायचा ,मला कळायचं की आता तो आलाय आणि मला खिडकीजवळ जायचं, इतकच नाही तर त्याला बोलायचं असेल तर तो ,चिट्टी चा उपयोग करायचा, आणि माझ्या खिडकीमध्ये ठेवायचा.

Best Love Story Marathi Sad 2023

आम्हा दोघांचं हे रिलेशनशिप गेल्या तीन ते चार वर्षांपासून सुरू होतं, आम्ही कधी एकमेकांना भेटलो नाही, त्यांनी मला कधी स्पर्शही केला, नाही बस डोळ्याने पहायचं आणि निस्वार्थी प्रेम करायचं आणि बघायचं इथपर्यंतच. तो माझ्या आईला आत्या म्हणायचा, आणि मी त्याच्या आईला मामी म्हणायची, म्हणून त्याच्या घरचे सुद्धा मला सुनबाई सुनबाई म्हणून चिडवायचे, त्याची बहीण ही माझी बेस्ट फ्रेंड होती, तिच्या बहाण्याने मी त्याला बघायला यायचे, तेव्हा मी आठवीमध्ये होते, कालांतराने मला समज यायला लागली, आणि त्यालाही आपण कुठेतरी चुकतोय याची त्याला जाणीव व्हायला लागली होती.

_____________________________________________

Love Quotes In Marathi | प्रेमाच्या चारोळ्या

वाचा Quotes On Life In Marathi

वाचा Romantic Marathi Prem Kavita

_____________________________________________

पण म्हणतात ना ,सोळाव्या वर्षाचा प्रेम हे एक आठवण असते आपल्या खऱ्या प्रेमाची. मला माहिती नव्हतं की हे प्रेम वगैरे काय आहे पण त्याच्याकडे बघण्यासाठी मी आईच राग ही सहन करायचं. त्याला त्याची चुकीची जाणवायला लागली, त्याने एक दिवस मला मेसेज केला आणि मेसेज करून म्हटलं मला माफ कर मी कुठेतरी चुकतोय! आणि तू लहान आहेस पण मी तुला समजून घेतलं नाही, आता वेळ आहे तू तुझ्या करिअर कडे लक्ष दे, तू खूप मोठी हो तुझं हे बारावीचे वर्ष म्हणजे आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे ,तू माझ्याकडे लक्ष देऊ नकोस ,तू अभ्यास कर.

Best Love Story Marathi Sad 2023

त्याचे असे बोलणे ऐकून अगदी मला रडायलाच आल. कळलंच नाही की मी आता काय करावे, मी त्याला चुकीचा आणि अपराधी म्हणून समजून बसले, मी त्याला त्या गोष्टीचा जाब विचारत होते त्याला सतत मेसेज करत होते, पण तो माझ्या मेसेजची उत्तरच देत नव्हता ,मी त्याच्या बहिणीला विचारलं त्याची बहीण म्हणाली, तुझं वय आता अभ्यास करायचं लहान होते तेव्हा डोकं नव्हतं पण आता तुम्हाला अक्कल आली आहे ,जरा अभ्यासाकडे लक्ष द्या, त्याचा पण ग्रॅज्युएशनचं वर्ष आहे ,आणि तुझं पण बारावीच!

Best Love Story Marathi Sad 2023

बारावी हे आयुष्याचा टर्निंग पॉईंट असतो यापासून च सुरुवात होते तुझ्या आयुष्याची! तुझ्या जीवनाची खरी परीक्षा, थांबू नकोस प्रेम काय ग, जर तो तुझ्यावर प्रेम करत असेल तर तो ग्रॅज्युएशन आणि आयुष्यात सेटल झाल्यानंतर नक्कीच तुझ्याकडे येणार ,पण तुलाही त्यासाठी काबिल बनाव लागेल, ताईचे बोलणे ऐकून मला थोडं वाईट वाटलं, पण कळतच नव्हतं की खरं काय आहे मी कुठे चुकते ,त्याला विसरणे हे माझ्यासाठी अशक्यच होतं पण आजही मी त्या खिडकीतून डोकावून रोज त्यालाच पाहते त्याच्या मेसेजची वाट पाहते.

Best Love Story Marathi Sad 2023

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

आमचे इतर साहित्य वाचा

Marathi Poem For Boyfriend

Love Quotes In Marathi

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago