Romantic Marathi Prem Kavita

Romantic Marathi Prem Kavita | पावसातील स्पर्श | Best पाऊस कविता 2023

पावसाळा हा मनाला मोहून टाकणारा ऋतू आहे. अश्यावेळी Romantic Marathi Prem Kavita वाचायला आणि त्या आपल्या प्रिय व्यक्तीला पाठवायला फार मजा येते.

Romantic Marathi Prem Kavita

झाली होती भेट अपुली क्षण तो पावसाचा
मातीच्या गंधा समवेत दरवळे गंध प्रितीचा
वादळ वारा वाहताच विझला दिवा प्रकाशाचा
लपून बसला होता जणू तारा ही गगणाचा
जिकडे तिकडे चोहीकडे रस्ता काळोखाचा
ढगांच्या धडकांनी आवाज होई मग विजांचा
सतेजात दिसे चेहरा तुझा तुकडा जणू चंद्राचा
अन् बघताच चेहरा तुझा मज विसर पडे जगाचा

बेधुंद व्हावे मन अन् बहरून जावे
प्रितीच्या मोहात सर्व विसरून जावे
तू कोण? आणि मी कोण?
मनी प्रश्न असे असंख्य पडावे….
निरुत्तर होऊनी चंद्ररुपी
तुझ्या चेहऱ्याकडे बघत रहावे….
आणि बघतच राहावे…..

Romantic Marathi Prem Kavita | पावसातील स्पर्श | पाऊस कविता Paus Sparsh

Romantic Marathi Prem Kavita | पावसातील स्पर्श

विजांच्या कडकडाटासह
आता पडू लागल्या पावसाच्या धारा
ओले चिंब भिजले अंग अमुचे
दाही दिशांस पसरला अंधार सारा
विजांच्या कडकटाने चमकणारे डोळे
जणू वाटे मज एक कोहिनुर हिरा
केस तिचे झाले होते मोकळे
अन् त्यानमध्ये अडखळे थंड वारा…
थेंब गुलाबी गालांवर येऊ लागले
पाहूनिया तो क्षण मन ही डगमगले माझे जरा
तिच्या नाजुक ओठांवर येताच थेंब
केलो चुंबनाचा इशारा
क्षणार्धात पावसाने ही त्याचा वेग धरला
अन् त्यातच रखडला खेळ सारा….

पावसातील स्पर्श | पाऊस कविता | Paus Sparsh

वेगाने पडलेल्या पावसाने
केली तिने लगबग आडोशाची
पदर खोचून साडीचा तिने
केली घाई स्वतःस सावरण्याची
हातात हाथ घेऊन माझा
वाट धरली तिने आडोशाची
एका झाडाखाली थांबून
पुन्हा रंगवली भेट प्रेमाची
हाथ बाहेर काढून
घेतली तिने मजा पावसाची

Romantic Marathi Prem Kavita | पावसातील स्पर्श

पाऊस गेला तिने माझा निरोप घेतला परी
जरी साथ सोडली नाही मातीच्या सुगंधाने
दाही दिशांस दरवळत होता अजूनही
जरी निरोप घेतला होता आता पावसाने
दाटून आलेले ढग होते अजून हो गडगडते
सोबत विजाही होते कळकळते
जणू कुणीतरी जात्यावर दळण दळते

मुसळधार येणाऱ्या पावसाने वाट धरली परतीची
अन् जवळ येत होती वेळ आमुच्या निरोपाची
पहिलाच पाऊस अमुचा अन् पहिलीच होती भेट अमुची
शेवट पर्यंत राहील स्मरण पहिल्या वहिल्या भेटीची
तिच्या नी माझ्या प्रेमाची अन् सोबतीस असलेल्या पावसाची

Romantic Marathi Prem Kavita | पावसातील स्पर्श | पाऊस कविता | Paus Sparsh

कवी आशु छाया प्रमोद (रावण)

कवी आशिष

कॉलेज लाइफ वरील धम्माल कविता वाचा >>>>.

तुम्हाला आमची आठवण हि कविता नक्कीच आवडेल. वाचण्यासाठी क्लिक करा>>>>.

झाशीची राणी लक्ष्मी बाई कश्या होत्या ?

13 thoughts on “Romantic Marathi Prem Kavita | पावसातील स्पर्श | Best पाऊस कविता 2023”

 1. Pingback: 50 Love Quotes In Marathi | या प्रेमाच्या चारोळ्या मूड फ्रेश करून टाकतील

 2. Pingback: 1 नंबर नाद मराठी स्टेटस | Boys Attitude Quotes in Marathi

 3. Pingback: 100+ प्रेरणादायी मराठी सुविचार | Inspirational Marathi Suvichar

 4. Pingback: 50+ Friendship Quotes In Marathi | Free क्वालिटी कोट्स | मैत्रीवर सुंदर मराठी कोट्स

 5. Pingback: वाढदिवस शुभेच्छा दिल्याबद्द्ल आभार | 20+ Thank You Message in Marathi

 6. Pingback: आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा | Ashadhi Ekadashi Shubhechha In Marathi 2023

 7. Pingback: प्रेम कथा "एकाकी खिडकी" | Great Love Story Marathi Sad 2023

 8. Pingback: खूप मिस करताय तर ह्या शायरी वाचा | Love You Miss You Shayari In Marathi 2023

 9. Pingback: निसर्गाच्या कविता | Best Nisarg Kavita In Marathi 2023

 10. Pingback: काव्यबंध : दिर्घ कविता स्पर्धा | Best Marathi Kavita Spardha 2023

 11. Pingback: बाई पण भारी देवा ने गाठला 50 कोटी क्लब | Baipan Bhari Deva Review वाचा काय आहे

 12. Pingback: मैत्रीदिन कविता स्पर्धा "काव्यबंध ऑगस्ट 23" | FREE KAVITA SPARDHA MARATHI 2023

 13. Pingback: काव्यबंध सप्टेंबर 2023 | "कविता लिहा आणि बक्षिसे जिंका" Best मराठी कविता लेखन

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
21 + 30 =