Categories: लेख

रक्षाबंधन निबंध मराठी Best 500 शब्दांमध्ये | Raksha Bandhan Nibandh In Marathi


हिंदूंच्या महत्वाच्या सणांपैकी एक सण म्हणजे “रक्षाबंधन” आहे. हा सण मुख्यतः हिंदूंचा असला तरी देखील हा सण इतर धर्मातील लोकं सुद्धा अगदी आनंदाने आणि उत्साहाने साजरा करता. आज आपण पाहणार आहोत Raksha Bandhan Nibandh In Marathi. यासोबतच हा सण भारतापुरताच मर्यादित नसून संपूर्ण जगात ठिकठिकाणी साजरा केला जातो. या सणामध्ये बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ त्याबदल्यात बहिणीला भेटवस्तू देऊन आहे बहिणीचं आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो. हा सण प्रामुख्याने श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला येते त्यामुळे या सणाला “नारळी पौर्णिमा” असे देखील म्हटले जाते.

Raksha Bandhan Nibandh In Marathi | रक्षाबंधन निबंध मराठी

या सणाची सुरवात कधीपासून झाली हे सांगता येत नाही मात्र पौराणिक कथानुसार अशी मान्यता आहे की, देव आणि राक्षस यांच्यामध्ये एकदा युद्ध झालं होतं तेव्हा राक्षस हे देवांवर प्रभुत्व मिळवीत होते. त्यामुळे इंद्रदेव घाबरून बृहस्पती कडे गेले. सगळं बघून इंद्राची पत्नी इंद्रायणी हिने रेशमी धाग्याला मंत्रांच्या साहाय्याने पवित्र करून ब्राम्हणांच्या हस्ते इंद्राच्या हाताला बांधला त्यामुळे इंद्रदेव त्या युद्ध मध्ये विजयी झाला. त्यामुळे असे म्हणतात की, त्या रेशमी धाग्यामुळेच इंद्राचा विजय झाला. योगायोगाने तो दिवस श्रावण पौर्णिमेचा होता. त्या दिवसाच्या स्मरणार्थ च हा दिवस “नारळी पौर्णिमा” म्हणजेच “रक्षाबंधन” म्हणून साजरा करण्यात येतो.

Raksha Bandhan Nibandh In Marathi.

ऐतिहासिक दृष्टिकोनामधून या सणाला बघितलं तर राजपूत राजे ज्यावेळी युद्धाला जायचे त्यावेळी स्त्रिया त्यांना विजय मिळावा यासाठी त्यांच्या कपाळावर कुमकुम टिळक आणि हाताला एक रेशमी धागा बांधायचे.

या राखी शी संबंधित आणखी एक ऐतिहासिक कथा प्रसिद्ध आहे ती अशी की, मेवाडची राणी “कर्मावती” यांना अशी पूर्वसूचना मिळाली होती की, त्यांच्या मेवाळच्या राज्यावर बहादूरशहा आक्रमण करणार आहे. अशी पूर्वसूचना मिळताच मेवाळ ची राणी कर्मावती घाबरून गेली होती कारण तिला लढाई करता येत न्हवती. त्यामुळे त्यांनी मुघल चे सम्राट “हुमायु” यांना राखी पाठवली आणि त्यांच्या मेवाळ च्या राज्याची बहादूरशहा यांच्या पासून संरक्षण मिळवून मेवाळ राज्याला वाचविण्यासाठी मदत मागितली होती. हुमायु हा सम्राट धर्माने मुसलमान असून देखील हिंदूच्या राखीची लाज राखत त्यांनी मेवाळ गाठले आणि बहादूरशहा शी लढाई करून मेवाळ वाचविले आणि मेवाळ सोबतच मेवाळची राणी कर्मावती यांचे सुद्धा संरक्षण केले.

Raksha Bandhan Nibandh In Marathi.

या वर्षी रक्षाबंधन कधी आहे ते पहा :- Rakshabandhan Date & History

रक्षाबंधन शुभ मुहूर्त वाचा :- Rakshabandhan Muhurt

रक्षाबंधन हा सण बहीण भाऊ यांचे पवित्र नाते आणखी अतूट आणि निर्मळ व्हावे या साठी बहीण आपल्या भावाला त्यादिवशी त्याच्या कपाळावर कुमकुम टिळक लावून नारळाचे औक्षण घालते आणि त्याला काहीतरी गोड खाऊ घालते. त्याच्या बदल्यात भाऊ बहिणीला काहीतरी भेटवस्तू देते किव्वा आरती मध्ये काही पैसे टाकून बहिणीचं आयुष्यभर रक्षण करेन असं वचन देते. हा सण फक्त सख्खे भाऊ बहिण मध्येच केला जात नसून, मावस भाऊ बहिण, मामे भाऊ बहिण, चुलत भाऊ बहिण यांच्यामध्ये देखील रक्षाबंधन हा सण साजरा करण्यात येतो. या व्यतिरिक्त ज्या बहिणीला सख्खा किव्वा कुठल्याही नात्यामधला भाऊ नसेल किव्वा ज्या भावाला कुठल्याही नात्यांमधील बहिण नसेल तर असे भाऊ किव्वा बहिण आपल्या समवयस्क मला मुलींना देखील भाऊ किव्वा बहिण बनवून रक्षाबंधन साजरा करता येतो.

Raksha Bandhan Nibandh In Marathi.

एक भारतीय स्त्री जेव्हा एखाद्या पुरुषाला राखी बांधते आणि त्या पुरुषाला भाऊ बनवते तेव्हा ती पुरुष त्या राखीचा मान राखतो आणि आयुष्यभर आपल्या बहिणीचं रक्षण करतो. म्हणूनच या “रक्षाबंधन” म्हणजेच “नारळी पौर्णिमेला” भारतीय संस्कृती मध्ये विशेष महत्व आहे.

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago