“सांजवेळ होता दारी” कधीही न ऐकलेली कविता | Poem on Evening In Marathi Beautiful Kavita 2023

सांजवेळ हि अशी वेळ आहे कुणाला हवीहवीशी वाटते तर कुणाला नकोशी. पण त्यावेळी जी शांतता अनुभवता येते ती कुठल्याच वेळेला अनुभवता येईल असे वाटत नाही. सांजवेळ होता दारी (Poem on Evening In Marathi) या कवितेतून कवीने एका आई हरवलेल्या बाळाच्या संध्याकाळचे वर्णन अतिशय जिवंत शब्दांमध्ये केले आहे.

सांजवेळ होता दारी | Poem on Evening In Marathi

सांजवेळ होता दारी
दिवा लागतसे घरी,
चिंब भरल्या अभाळी,
खाली झोपडी गळकी..

झोपडीच्या उंबऱ्यात,
बसे बाळ कुणाचा,
सुकल्या मलूल गालावरी,
ओघळ रे आसवांचा…

पक्षी येती घरट्यात,
चारा पिलांच्या रे मुखी,
बाळ उपाशी तापाशी,
ओढ आईच्या भेटीची,

सांजवेळी एक सावली,
हळू चालत रे येई,
नजर भिरभिरतसे
बाळाचा ती शोध घेई…..

सांजवेळ होता दारी | Short Poem On Evening in Marathi

बघता ती सावली,
बाळ धावत रे जाई,
गर्भ रेशमी सांजवेळी
भेट ओल्या आसवांची….

चिंब भिजल्या मिठी मध्ये,
ओलावा सोनसळी,
फिका स्वर्ग त्या पुढें
ज्याला लाभली माऊली,…

तोच पदराची गाठ,
आई हळूच सोडवी,
खाऊ देत हाता मध्ये,
मुका बाळाचा ती घेई….

सांजवेळ होता दारी | Short Poem On Evening in Marathi

अंधारल्या सांजवेळी,
समई ही पेटत असे,
मिणमिणत्या प्रकाशी,
चुलीलाही जाळ लागे,..

जळक्या भाकरीवरी ,
ठेचा मिरचीचा छान दिसे,
जाता घास पोटा मध्ये,
खुदकन बाळ हसे….

माया आईच्या कुशीची,
तीला सर कशाची,
आधी सांगतसे गोष्टी
मग गाई अंगाई….

सूर्य देव येता दारी,
आई जात असे दुर.
भारल्या आसवांनी
बाळ देतसे निरोप…

सांजवेळ होता दारी | Short Poem On Evening in Marathi

होता सांजवेळ पुन्हा,
बाळ बसतेस अंगणात,
झोपडीत लागे दिवा अण्
अंधार काळजात…..

वाट पाहता आईची,
डोळे भरून येतात,
येतो आठव मनात,
अश्रू हळू ओघळतात…

नाही राहिली आई आता,
बाळ बसे उंब्ऱ्यात
येता भरून आभाळ,
सांजवेळ भिजते आसवांत…

कवी :- श्री. अभिजित बागुल
8275159813

वाचा लग्न म्हणजे काय असत कविता : – Marathi Kavita On Marriage

वाचा लेकीवर लिहिलेली अतिशय सुंदर कविता :-Mulgi Marathi Kavita On Daughter

आमच्या वेबसाईट वर आम्ही अशाच प्रकरचे दर्जेदार साहित्य मराठी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जर तुम्हाला आमचे हे प्रयत्न आवडले तर आम्हास नक्की कळवा.

संपर्क :- +91 7020965224

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago