इर्शालवाडी आणि माळीणच्या घटना टाळता आल्या असत्या ? माधवराव गाडगीळ समिती | Terrible Irshalwadi Landslide Information in Marathi 2023

नमस्कार मित्रांनो आज आपण Irshalwadi Landslide Information in Marathi मध्ये इर्शालवाडी येथे दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोक ढिगार्याखाली अडकले या घटनेवर प्रकाश टाकणार आहोत.

19 जुलै 2023 च्या रात्री सुमारास साडे दहा ते अकरा वाजताच्या दरम्यान दरड कोसळली. त्या दुर्घटनेत आत्तापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला. इर्शालवाडी येथील घडलेल्या या दुर्घटनेमुळे 2014 ला घडलेली माळीण दुर्घटना आणि 2021 येथील तळीये येथील दुर्घटना डोळ्यासमोर आपसूकच येते….

Irshalwadi Landslide Information in Marathi

माळीण येथे काय घडले?

पुणे जिल्ह्यातील आंबेगाव या तालुक्यातील माळीण येथे 30 जुलै 2014 रोजी पहाटेच्या वेळी डोंगराचा कडा खाली आला आणि त्यात 44 हून अधिक घरं नागरिकांसह त्या ढिगाऱ्यात गाडली गेली. ज्यात पुरुष, महिला, लहान मुले, पाळीव प्राणी यांचा देखील समावेश होता. होते नव्हते ते सारे त्या ढिगाराखाली गाडले गेले. त्यांना त्या बुधवारची सकाळ सुद्धा पाहता आली नाही.

दिवसरात्र त्या ढिगाराखालील मृतदेह बाहेर काढायचा काम चालू होता आणि सहा दिवसात तब्बल 151 मृतदेह बाहेर काढण्यात आले. या घटनेनंतर राज्य आणि केंद्र सरकार जे या घटनेला राष्ट्रीय आप्पत्ती म्हणून काही केली आणि माळीण या गावाचं पुनर्वसन केलं.

Irshalwadi Landslide Information in Marathi

तळीये येथे काय घडले?

रायगड जिल्ह्यातील महड तालुक्यामधील तळीये या गावात 22 जुलै 2021 रोजी भर दुपारी सुमारे साडेचार वाजता दरड कोसळली आणि सारं गाव उध्वस्त झालं. तिथं 2 दिवसापासून मुसळधार पाऊस चालू होता. समोरच्या डोंगराचा काही भाग खाली आलेला होता म्हणून गावातील लोकं घराबाहेर येऊन आपला बचाव व्हावा या हेतूने दुसऱ्या डोंगराच्या आडोशाला उभे होते मात्र ज्या डोंगराच्या आडोशाला स्वतःचा बचाव करण्यासाठी उभे होते त्याच डोंगराचा एक मोठ्ठा भाग खाली कोसळला आणि जे लोकं तिथे उभे होते ते जागीच मरण पावले.

काही लोकं त्या दरडी बरोबर वाहत गेले. बचाव कार्यात 53 मृतदेह बाहेर काढण्यात आले आणि जे 31 लोकं मिळाले नाही त्यांना मृत घोषित करण्यात आले. जी लोकं त्यावेळी कामाला गेले होते तेच बचावले गेले.

Irshalwadi Landslide Information in Marathi

ज्या प्रकारे माळीण आणि तळीये या ठिकाणी दुर्घटना घडल्या अगदी तशाच प्रकारची घटना आत्ता काल परवा च म्हणजे 19 जुलै 2023 रोजी रात्री साडेदहा ते अकरा वाजताच्या सुमारास इर्शालवाडी येथे घडली. त्यात 4 जणांचा मृत्यू झाला आणि अजूनही 120 ते 130 लोकं दरडी खाली अडकलेले आहेत अशी शक्यता वर्तविली जात आहे. आत्ता पर्यंत 75 लोकांना वाचविण्यात बचावकार्याला यश आलेले आहे.

माळीण, इर्शालवाडी सारख्या घटना टाळता आल्या असत्या!

सह्याद्रीसह संपूर्ण पश्चिम घाटातील पर्यावरणाचा अभ्यास करून त्यांचा संरक्षण करण्यासाठी आणि सूचना देण्यासाठी केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मार्च 2010 रोजी पर्यावरण शास्त्रज्ञ प्रा. माधवराव गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली. त्या समिती चे नाव माधवराव गाडगीळ समिती ठेवण्यात आले. या समितीच्या मदतीने प्रा. माधवराव गाडगीळ यांनी संपूर्ण सह्याद्रीसह पश्चिम घाटाचा अभ्यास करून ऑगस्ट 2011 साली केंद्र सरकार कडे एक अहवाल सादर केला होता.

मात्र तत्कालीन केंद्र सरकारने ती अहवाल फेटाळून लावला आणि त्यानंतर 17 ऑगस्ट 2011 साली गाडगीळ समितीच्या शिफारशीचा अभ्यास करण्यासाठी ज्येष्ठ अंतराळ शास्त्रज्ञ डॉ. कस्तुरीरंगन यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या गटकार्याने गाडगीळ समितीच्या शिफारशी निष्प्रभ होतील अशा शिफारशी सादर केल्या.

Irshalwadi Landslide Information in Marathi

माधवराव गाडगीळ समिती ने काही शिफारशी केल्या ते आपण खालील प्रमाणे पाहूया….

  1. सह्याद्रीसह पश्चिम घाट हे अतीसंवेदनशील क्षेत्र म्हणून जाहीर करावे.
  2. जैवविविधचे काटेकोरपणे संवर्धन करावे.
  3. या प्रदेशांपैकी 30 टक्के अतीसंवेदनशील 15 टक्के प्रदेश मध्यम संवेदनशील तर 25 टक्के कमी संवेदनशील अशी विभागणी करावी.
  4. इथल्या विकासकामांच्या बाबतीत ग्रामपंचायत पातळीवर निर्णय घेतले जावेत. ते दिल्ली-मुंबईमध्ये बसून नेते किंवा सरकारी अधिकाऱ्यांनी ठरवू नयेत.
  5. या प्रदेशांमध्ये सेझला आणि हिल स्टेशनला परवानगी देऊ नये. डोंगरमाथे, डोंगरउतार, वने, समुद्रकिनारे आदी जनतेला खुल्या असणाऱ्या सार्वजनिक जमिनींवर खासगी मालकी हक्काला मनाई करण्यात यावी.
  6. खाणींना परवाने देऊ नयेत. सध्या चालू असणाऱ्या खाणी हळूहळू बंद कराव्यात. रासायनिक व औष्णिक उद्योगांना परवानगी देऊ नये.
  7. अतिसंवेदनशील आणि मध्यम संवेदनशील प्रदेशातून नवीन रेल्वेमार्ग आणि महामार्ग काढण्यास मनाई करण्यात यावी.

Irshalwadi Landslide Information in Marathi

गाडगीळ समितीच्या या शिफारशी जर तत्कालीन सरकार ने किव्वा आताच्या सरकारने मान्य केले असते आणि यावर वेळीच पाऊले उचलले असते तर माळीण, इर्शालवाडी सारख्या घटना टाळता आल्या असत्या. असे माधवराव गाडगीळ यांनी सांगितलं.तसेच त्यांनी डॉ. कस्तुरीरंगण यांच्या देखील शिफारशींना कडाडून टिका केल्या.

गाडगीळ समिती आणि डॉ. कस्तुरीरंगन यांच्या शिफारशीमध्ये मतभिन्नता होत्या त्यासाठी प्रा. माधवराव गाडगीळ यांनी म्हटलं की याचा निर्णय आपण लोकांवर सोडू मात्र यावर सुद्धा डॉ. कस्तुरीरंगन यांनी नकार दिला. त्यामुळे प्रा. माधवराव गाडगीळ यांनी लोकशाही वर देखील प्रश्न उपस्थित करून म्हटलं की, याबाबतीत लोकांना त्यांचे मत व्यक्त करण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि हे मूलभूत लोकशाहीला धोका आणणारे आहे.

Irshalwadi Landslide Information in Marathi

सर्वसमावेशी रूपाने सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये जे काही आज उत्खनन सुरू आहे त्यामुळे पर्यावरणाचा जो काही र्हास होत आहे त्यांचे सर्व जबाबदारी सरकार आहे आणि माळीण असो, तळीये असो किंवा आत्ताच घडलेल्या इर्शालवाडीतील दुर्घटना असो या सर्व घटना नैसर्गीक नाही तर अनैसर्गिक आणि मानवनिर्मित आहेत. आणि आताही जर आमच्या गाडगीळ समितीच्या अहवालावर विचार केला गेला नाही तर अशा घटना भविष्यात देखील घडत राहणार असे ठाम मत गाडगीळ समितीचे अध्यक्ष प्रा. माधवराव गाडगीळ यांनी मांडले.

Irshalwadi Landslide Information in Marathi


वायू प्रदूषण मराठी माहिती | Air Pollution Information in Marathi

प्रदूषण एक समस्या मराठी निबंध। Pradushan Ek Samasya Nibandh in Marathi

लाकडी तेल घाणा प्रक्रिया आणि फायदे | Lakdi Ghana Best Information 2023

अण्णा भाऊ साठे संपूर्ण माहिती | Anna Bhau Sathe Information in Marathi 2023

Author:- आशु छाया प्रमोद (रावण)

mazablog

Recent Posts

वास्तव | Best marathi love poem shayari in 2024

मंगल राजाराम यादव यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem shayari in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

प्रेमाची हमी | best marathi love poem for gf in 2024

अरविंद कुळकर्णी यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi love poem for gf in 2024 विषयावर रजिस्टर…

2 months ago

ऑनलाईन प्रेम | best Fb love poem in marathi in 2024

सौ. संघमित्रा सोरटे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Fb love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

फेक आयडी | Best Facebook love poem in marathi in 2024

प्रवीण मारुती कसबे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Facebook love poem in marathi in 2024 विषयावर…

2 months ago

खरं की खोटं | Best Social Media love poem in marathi in 2024

सौ. रेखा पिंगळे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Social Media love poem in marathi in 2024…

2 months ago

प्रेम | Best love poem marathi online pdf in 2024

शालिनी सदाशिव पवार यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत love poem marathi online pdf in 2024 विषयावर…

2 months ago