Pav Bhaji Ingredients List In Marathi

Pav Bhaji Ingredients List In Marathi | Pavbhaji Recipe Written In Marathi

Pav bhaji ingredients list in marathi | Pav bhaji Recipe written in marathi
पावभाजी आहाहा !! नाव ऐकूनच तुम्हाला मस्त तव्यावर बनणारी चविष्ट पावभाजी डोळ्यासमोर आली असेल. लाल लाल कलरची मसालेदार तुपाने किंवा बटरने हेवी बनलेली अशी पावभाजी कोणाला खाण्यास आवडत नाही. चवी बरोबर पावभाजी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा फार महत्त्वपूर्ण असते कारण की त्यामध्ये भाज्यांचा मुबलक प्रमाणात वापर केला जातो. विशेष म्हणजे या भाज्यांची चव नंतर लक्षातही येत नाही त्यामुळे सर्वजण त्याला आनंदाने खातात. पाव भाजीची रेसिपी ही तुम्ही तयार करायला घेतली असता तुम्हाला 40 मिनिटे लागतील आणि रस्त्यावरती गाड्या वरची तुम्ही पावभाजी चवीने खातात तशी पावभाजी तुम्ही घरी खाऊ शकता.

Pav bhaji ingredients list in marathi

दोन मोठे बटाटे बारीक चिरलेले घ्यावेत, अर्धा कप ताजे वाटाणे , पाऊण कप फ्लॉवर बारीक चिरून , अर्धा कप चिरलेले गाजर , एक मोठा कांदा त्याला बारीक चिरून घ्यावा , लसणाची पेस्ट एक चमचा , दोन बारीक चिरलेले मध्यम आकाराचे टोमॅटो , अर्धा कप बारीक चिरलेली शिमला मिरची , दीड कप लाल तिखट पावडर , पाव चमचा हळदीची पावडर , एक चमचा पाव भाजी मसाला , एक चमचा धने जिरे पावडर , एक चमचा लिंबाचा रस , मीठ चवीनुसार , दोन चमचे तेल , दोन चमचे बटर , बारीक चिरलेली कोथिंबीर गरजेनुसार , आठ पाव

Pav Bhaji Ingredients List In Marathi | Pavbhaji Recipe Written In Marathi

Pavbhaji Recipe written in marathi

सर्व भाज्या स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या त्यानंतर कोरड्या फडक्याने पुसा आणि त्यांचे लहान लहान तुकडे करा

एक चांगला प्रेशर कुकर घेऊन त्यामध्ये चिरलेले गाजर वाटाणे बटाटे फ्लॉवर अर्धा कप पाणी टाकून आणि चवीनुसार मीठ टाकून मध्य आजचे वरती शिजवायला ठेवा

Pav bhaji ingredients list in marathi | Pav bhaji Recipe written in marathi

दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर बाजूला काढून घ्या आणि थंड व्हायला ठेवा. साधारणतः पाच-सहा मिनिटानंतर जेव्हा प्रेशर कमी होईल तेव्हा कुकरचे झाकण उघडा

आता माशर मदतीने सर्व भाज्या कुस्करून घ्या तुम्ही तांब्याचा वापर सुद्धा कूच करण्यासाठी करू शकता काही लोकांना भाज्या जास्त कुस्करलेल्या आवडतात तर काहींना कमी तुमच्या गरजेनुसार करून घ्या

एका कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊन ते गरम करावे त्याच्यामध्ये बटर टाका आणि त्याला कांदा हलका गुलाबी होईपर्यंत आले लसूण पेस्ट सोबत परतून घ्या त्याच्यामध्येच शिमला मिरची आणि टोमॅटो घाला आणि थोडे चवीनुसार मीठ घाला

हे सर्व मऊ झाल्यानंतर त्यामध्ये पावभाजी मसाला धना जीरा पावडर हळद आणि लाल मिरची पावडर टाका आणि हे सर्व चमच्याने ढवळत रहा

Pav bhaji ingredients list in marathi | Pav bhaji Recipe written in marathi

यानंतर त्यात पाऊण कप पाणी घाला आणि चांगले मिक्स करा त्याच्यानंतर मगाशी आपण कुस्करलेल्या भाज्या एक चमचा लिंबाच्या रसासोबत याच्यामध्ये मिक्स करा

हे सर्व मिश्रण चार ते पाच मिनिटं शिजवायला ठेवा आता तुम्ही चवीनुसार मीठ जास्त करू शकता. या वरती कोथिंबीर घालून तुमची भाजी सर्व करायला रेडी झालेली आहे

दोन पावांची जोडी घ्या तिला चाकूने मध्यभागी बरोबर कापून ते बाजूला करून घ्या यानंतर त्यामध्ये मसाला टाकू शकता किंवा थोडा भाजी चा भाग टाकू शकता आणि पाव दोन्ही बाजूने तूप किंवा तेल लावून तव्यावरती परतवून घ्या उरलेले पाव अशाच प्रकारे परतून भाजीसोबत सर्व्ह करा

अशाप्रकारे तुमची पाव भाजीची रेसिपी तयार झाली आहे वेगवेगळ्या भाज्यांमुळे वेगवेगळी चव तुम्ही पावभाजीला आणू शकता तुम्ही ब्रोकोली, फ्लोवर कोण वांगी सुद्धा यामध्ये टाकू शकता जर भाजीला गड लाल रंग आणायचा असेल तर तुम्ही बीटाचा वापर करून छान लाल भाजी बनवू शकता

Pav bhaji ingredients list in marathi | Pav bhaji Recipe written in marathi

पुरणपोळीचा बेत अस्सल महाराष्ट्रीयन रेसिपी शिवाय पूर्ण होणारच नाही. क्लिक करा.

बाळगुटी म्हणजे काय ? आणि त्याचा वापर कसा करावा ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *