दिसणार नाही तुला तरी जवळ असेल,
सहवास माझा नेहमीच तुला भासेल,
माझ्या जगात तुला वेगळेच स्थान असेल,
दिसेल फक्त मला जगाला दृष्टी नसेल…
Marathi Ektarfi Prem Kavita | एकतर्फी प्रेम कविता मराठी
पिंजऱ्यात माझ्या कायमची तुला कैद असेल,
तुला कोणत्याही प्रकारचा जामीन मात्र नसेल,
प्रेमात पडशील तू असा तो पिंजरा असेल,
कायम तिथे राहायला तुझा मोठा गुन्हा असेल…

तुझ्या त्या मूर्ती वर संपूर्ण हक्क माझा असेल,
कोणताच पुरावा नसलेला तो ताबा असेल,
त्या विश्वात मी सांगेल तो कायदा असेल,
माझ्या ओढीचा तो एक आगळा नियम असेल…
वेदनेच्या पलीकडचे समाधान | Marathi Prem Kavita
मनमुराद प्रेम करणारा मी तिथे एकटाच असेल,
दिसेल मी कोणाला असा डोळा तिथे नसेल,
तुझ्यावर प्रेम करायला मला तुझीच गरज नसेल,
त्या वेदनेच्या पलिकडचे समाधान माझ्यात असेल…
फक्त शांततेने भरलेली ती वेळ अबोल असेल,
असू देणारा आणि ते पुसणारा मीच असेल,
माझी अपेक्षा पूर्ण करायला प्रयत्न माझाच असेल,
एका बाजूने अथांग भरलेलं ते प्रेम माझं असेल….
Marathi Ektarfi Prem Kavita | एकतर्फी प्रेम कविता मराठी
कवी- स्वप्नील खैरनार

कविता आवडल्यास नक्की प्रतिक्रिया द्या …. धन्यवाद. Maza Blog
Superbbb????
Ek No Sir
Thanks for comment. Please share ?
Thanks for comment. Please share ?