काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ. संजना सच्चिदानंद पाटील यांची -पाऊस आणि आयुष्य – कविता -पावसाळा आणि आठवणी-विषयावर असून एक Paus kavita in Marathi आहे
पाऊस आणि आयुष्य | Paus kavita in Marathi 2023

पावसाळा आणि आठवणी
याचं गणित खूप वेगळे
किती ही वय झालं तरी
पाऊस पडायला लागला की
मन आठवणीत रुळे,
पावसाच्या धारा मन चिंब भिजवतात
लपलेल्या आठवणींना अलगद वर आणतात
मखमली मोरपिसे हळुवार फिरतात
त्यातील एक मोरपीस म्हणजे शाळा
शाळा…म्हणजे शामळूपणाला घातलेला आळा.
विविधतेने नटलेल्या प्रत्येकाच्या भावना
बाकावरची मैत्रीण जिवाभावाची बनते
हसत खेळत जीवनाचे एकएक पान उलगडते ,
काही वर्षाच्या सहवासाने अनंतकाळाची मैत्रीण होते
असेच असते अनमोल मैत्रीचे नाते,
तिच्या आवडी ,आपल्या आवडी
एकमेकीं तडजोड करतात
स्वतःच्या हातातील घासपण
एकमेकिंसाठी राखून ठेवतात,
साधी हेअरपिन घेतली तरी
दोघीही ट्राय करतात
किती ही आवडीची असली तरी
एकमेकीस बहाल करतात
दहावीच्या सेंडऑफ वेळी
एकमेकींना बिलगतात….
अश्रूंचे बांध लपवत क्षितिजाकडे झेपावतात,
पंख बळकट होतात आणि स्वच्छंदी बनतात
नवीन दिशा मग शोधत राहतात,
असाच .. काळ पुढे जातो
आकाश ही मग ठेंगणे
वाटते ……
उंच उंच स्वप्नांची मालिकाच सुरू होते
यात इतकं गुरफटायला
होतं की मैत्रीणचं काय
स्वतःसाठी ही वेळ
नसतो,
नवरा, मुलं,संसार यात सारा आनंद असतो
आपल्या सारखेच आपल्या मुलांनाही
नवे पंख फुटतात
तीही आता आकाशात
बागडू लागतात,
आपल्यालाही आता निळ्याभोर आकाशाकडे पहावे
वाटते
सरून गेलेले ते अल्लड
वय आठवू लागते
हळूच जुनी फोन डायरी
आपसूक नजरेसमोर
येते
नंबर कोणाचे भेटतात
का पाहू लागते
एक नंबर मिळाला की
लगबग सुरू होते,
मग लागतात हळूहळू
एकएक नंबर वाढायला
एकएक वीट रचू लागते
स्कुलकट्टा बांधायला…
तेव्हा ती कशी दिसायची
डोळ्यात हेच चित्र असते
आता कशी दिसते
याची आतुरता असते
वाटते आता आपण
सर्वांनी एकत्र यावे
स्नेहमेळाव्याने जुने रेशमीबंध पक्के बांधावे
चिवचिव करत चिमणीपाखरे होऊन
आठवणीत रमावे ..
दरवर्षी स्नेहमेळव्याचे आयोजन करावे
एक दिवस तो ही आनंदाने जगायचा
एरवी तर असतो ना
संसार गाडा ओढायचा,
उगवतो दिवस मग
सोनियाचा ….
शाळेतल्या आठवणीत रमण्याचा
मनात खूप ठरवलेले असते
खूप काही बोलायचं..
शाळेतील दिवस आठवून
खूप खूप हसायचं ,
आठवणींना उजाळा देत भरभरून जगायचं
पण ..प्रत्यक्ष भेटल्यावर सार काही विसरून
जातो
संसाराच्या कहाणीतच
वेळ आपसूक निघून
जातो
बरेच काही बोलायचं
असते…….
वेळेअभावी राहून जाते
पुढील वर्षी भेटण्याचे
आश्वासन देवून
गाडी संसाराच्या पटरीवर परत धावू लागते….

पाऊस आणि आयुष्य | Paus kavita in Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
ही रचना उत्कृष्ट आणि जिवंत काव्यरचना आहे ताई. तुमच्या अनेक रचना आम्ही वाचत असतो. त्यातून आम्हांला बरंच काही शिकण्यासारखं भेटत असतं. तुम्हांस व तुमच्या लेखणीस खूप खूप शुभेच्छा..👍
Khup chan👍🥰
Khup sundar kavita ahe👍🥰💓…chan utrusht mandani keli ahe..🤝🤗