हिशोबाचे चिटोरे | बाबा कविता मराठी

हिशोबाचे चिटोरे | Best बाबा कविता मराठी in 2023

कु. उज्वला धांडे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत बाबा कविता मराठी विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

बाबा कविता मराठी

काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका
दर रविवारी स्पर्धा
दिनांक:- १५/१०/२०२३
विषय:- बाप

बाबा कविता मराठी

हिशोबाचे चिटोरे | बाबा कविता मराठी

बापा सम बाप होता
नाही बरोबरी त्याची
काळोखात दिवा झाला
वात केली डोळ्याची

आभाळाची माया दिली
पंख बनुन सावली
जग काय आहे त्याने
खरी प्रचिती दावली

रखरखत्या रस्त्यावर
पाय स्वतःचे भाजले
डोई घेऊन पाखरा
मैल अंतर कापले

झळ लागू दिली नाही
तळ हाताशी जपले
बालपण असे दिले
जणू मोत्यात शिंपले

माया आगाध ह्रदयी
होती त्याच्यात भरली
पोट स्वतःचे उपाशी
दुःख आमची सारली

मोठा संघर्ष झेलून
श्वास दिले लेकराला
विसरला स्वतः सुख
दंडवत त्या बापाला

हिशोबाच्या चीटोऱ्यांना
सांभाळले जन्मभर
कर्ज घेता देह त्याचा
थरारला मणभर

होता वरून नारळ
दिसायला कणखर
मनी प्रेमाचा सागर
मऊ मायेचा आगार

बाप बव्हंशी कुणाला
समजत नाही कधी
उमगतो हळुवार
खुळा मावळती मधी

जपा बाप आयुष्यात
नाही परत येणार
गेला क्षितिजा पल्याड
डोळी नाही दिसणार

कु. उज्वला धांडे
नागपूर

बाबा कविता मराठी

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *