papa var kavita in marathi

सावली | Best papa var kavita in marathi in 2023

प्राची परचुरे वैद्य यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत papa var kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

papa var kavita in marathi

काव्यबंध समूह काव्य लतिका
आयोजित काव्य स्पर्धा
दि. १५ ऑक्टोबर २०२३
विषय – वडील

सावली | papa var kavita in marathi

आईवडिलांची छत्रछाया
हिच असे आमची सावली
त्यांच्या कृपाशीर्वादाने होते
दिवसाची सुरुवात आपली

नव्हती चिंता, काळजी कसली
नव्हती कसलीच पोकळी
अचानक एक बुंधा निखळला
अन् झाली सुखाची होळी

होत्याचे नव्हते म्हणतात
तसेच झाले काहीसे
सुखाचे दिन संपले
आले दुःखाचे कवडसे

तप्तता जाणवते उन्हाची
आठवण येते सावलीची
बोच मनाला आहे एकच
आपण काही न करू शकल्याची

आपल्या हातात नसे काही
माहित असले तरीही वाटते
पोरके करून कां गेलात बाबा
रोज आठवण मनी दाटते

तिमिरातून प्रकाशाकडे गेलो तरी
तुमच्यासारखी सोबत नाही
आईची साथ आहे आम्हांस
पण एकटेपण सलते तिलाही

कितीही केले तरी आठवण येते
शब्द थिटे पडतात तिथे
वडिलांसारखे समजून घेणारे
नाही कुणी दिसत इथे

प्राची परचुरे वैद्य

सावली | Best papa var kavita in marathi in 2023

papa var kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह