Navra Bayko : नवरा बायको

Navra Bayko अरे बापरे…शीर्षक वाचल्या क्षणी तुम्हाला वाटलं असेल याला आज काय विषय काढायची गरज होती. आमचं आम्हाला माहित रोजचे दिवस कसे चालू आहेत ते. “अहो ऐकलं का…?” हे ऐकताच नवऱ्याच्या कपाळावर घड्या पडतात. आता काय काम करावं लागणार आहे याचाच विचार लगेच डोक्यात येतो आणि लगेच उत्तर नाही दिलं तर जग पालथं होयला वेळ लागत नाही. मग काय बळच उठायचं आणि टीव्ही वरच्या न्युज, आवडता कार्यक्रम सोडून बोला बाईसाहेब काय म्हणता म्हणत जावं लागतं. आणि जर फक्त टाइमपास म्हणून बोलावलं असेल तर काय करू आणि काय नाही असं होतं, पण नाइलाज असतो.

नंतर डोक्यात हा पण विचार येतो की थोडा वेळ तिला दिला तर काही नाही होणार, कारण ती जे काही करते ते आपल्यासाठीच असतं, आणि तिला तर त्यातच आनंद भेटत असतो. हे सगळं आपल्याला माहित असूनही आपण आपल्याच दुनियेत मस्त असतो.

Navra Bayko नात्यातील विश्वास

नवरा बायकोचा नातं हे विश्वासावर असते हे तर सगळ्यांनाच माहिती आहे तरी आपण सगळ्या गोष्टी सांगायला टाळतो अथवा घाबरतो. ती सरळ अर्थाने समजून घेणार नाही हे लक्ष्यात येत, काय शेवटी लपवावाच लागतं. आणि चूक केली असेल अथवा झाली असेल ती लपवता लपवता नाकी नऊ येतात. खरी मजा तर तेव्हा येते जेव्हा भांडण सुरु होतं. सुरवातीला नवरोबाचा आवाज कडक असतो, एकदम वजनदार, असं वाटतं आता ही बोलूच शकणार नाही, पण….पण म्हटल्यावर तुमच्या लक्ष्यात आलंच असेल पुढे काय होतं ते. शेवटी गप बसावच लागतं. नाही करणार यापुढे असं म्हणून माघार घ्यावी लागते.

Navra Bayko

बायको माहेरी गेल्यावर


बायको माहेरी गेल्यावर काय आनंद होतो ते नवऱ्यालाच माहिती. पण हा आनंद जास्त वेळ टिकत नाही. बायको असल्यावर घर घरा सारखं भरलेलं वाटतं. ती गेल्यावर २-४ तासातच तिची आठवन यायला सुरवात होते. राहवत नाही म्हणून फोन लावून विचारपूस करतो आणि लवकर ये म्हणून सांगतो. ती पण हो म्हणून समजून सांगते. ओढ दोन्ही बाजूने असते पण ती माणूस दूर गेल्यावरच समजते. आपलं माणूस म्हणून आपण कोणाचा विचार करतो तर ते म्हणजे नवरा बायको. जीवनात सुखाचा आनंद घायचा असेल तर माणसाने लग्न केलंच पाहिजे आणि गोड भांडण तर नक्कीच करायला हवं. बायकोची नवऱ्याकडून खूप मोठी अपेक्षा कधीच नसते. तिला फक्त समजून घेणारा आणि प्रेमाने मिठीत घेणारा नवरा हवा असतो. माहेर सोडून आल्यावर तिच्या जवळचा कोणी माणूस असेल तर तो म्हणजे नवरा. ती आपलं संपूर्ण जीवन त्याचा सोबत घालवणार असते. म्हणून ती आपल्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी नवऱ्याला सांगते. ऑफिस मधून आपण ज्यावेळी घरी येतो त्यावेळी तिच्या चेहेऱ्यावर जो आनंद असतो तो खरंच बघण्यासारखा असतो. तिच्या हाताचा चहा पिताना दिवसभरचा थकवा कसा निघून जातो ते समजत नाही. मग तिच्या दिवसभरच्या गोष्टी सुरु होतात. ” शेजारची जोशीबाईला काही काम नाही, येऊन जाऊन गल्लीतील लोकांविषयी सांगत सुटते. नारदमुनीच आपल्या सोसायटी मधला”, असं म्हणून सगळ्या दिवसाच्या गोष्टी सुरवात होते आणि आपण फक्त “बरं मग” म्हणून सोडून देतो. तिला जाणीव नये होऊ देत की आपल्याला त्या गोष्टी ऐकण्यात काही रस नाही, पण फक्त तिचा मूड बनून राहावा म्हणून ऐकत असतो.

Navra Bayko

सारांश : Navra Bayko

समजून घेतलं तर माणूस कायम सुखी राहील आणि आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या बायको सोबत घालवायचा विचार येईल. बायको म्हणजे तर आपलं हृदय, हसू येईल पण ही गोष्ट खरी आहे. तिच्या शिवाय आपलं एक पान देखील हालत नाही. सकाळी उठवण्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपली सगळी कामे तीच करते. ऑफिसच काम सोडलं तर खरंच विचार करा की आपण कुठलं काम करतो. न आपण स्वतःचे कपडे धुतो न स्वतःच्या कपड्याना इस्तरी करतो. ही छोटी काम पण आपण तिच्या कडूनच करून घेतो. नवरा बायकोवर किती प्रेम करतो हे तिला कधीच दाखवत नाही. पण तिला काही झालं तर त्याला सहनही होत नाही. काळजी पोटीच तो तिच्यावर चिडचिड करत असतो कारण नवरा बोलला आणि बायकोनी पहिल्या शब्दात ऐकलं आजपर्यंत तरी मी बघीतलं नाही. “तुम्ही म्हणाल तसंच मी करेल” हे बायकोच वाक्य नवऱ्याचा पाठ झालं असेल, पण ती बोलली आणि तसं वागली तर ते जगातलं आठव आचार्य ठरेल.
एकमेकांच्या चुका काढण्याऐवजी एकमेकांना समजून घेतलं तर बऱ्याच गोष्टी सुरळीत चालतील. त्यामुळे समजुन घ्या आणि आपलं एकमेकांवरील प्रेम कायम वाढत राहूद्या.

देवेंद्रानी नमस्तुभ्यं देवेंद्र प्रिय भामिनी |
विवाहं भाग्यमारोग्य शिघ्रलाभं च देहि मे ||

Author- Chaitanya Thorat

Maza Blog

Navra Bayko

चैतन्य यांचे आणखी लिखाण वाचा – रक्षाबंधन २०२०

Made In India Smartphone Review वाचण्या साठी क्लिक करा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *