Aamchi Shahal Niband in Marathi

आमची सहल सुंदर मराठी निबंध | Aamchi Shahal Niband in Marathi Best in 2023सहल म्हटलंकी विद्यार्थ्यांच्या मनात मनापासून उत्साह निर्माण होतो ,पण निबंध लिहायला लावले की मात्र अडखळतात. वाचा सोप्प्या भाषेत Aamchi Shahal Niband in Marathi.

Aamchi Shahal Niband in Marathi

Aamchi Shahal Niband in Marathi

आमची परीक्षा संपली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आमच्या शिक्षकांनी ठरवले की, आपण कुठेतरी सहलीला जायचं. मुलांना आलेल्या “एक्झाम” च्या प्रेशर पासून थोडे दूर करायचं. त्यांनी ठरवलं आणि आम्ही सर्व त्या गोष्टीसाठी होकार दिला . खरंतर परीक्षेचा आलेलं “टेन्शन” हे प्रत्येकच विद्यार्थ्यांच्या मनात होतं, त्यापासून थोडं मनाला विश्रांती देण्यासाठी शिक्षकांनी हा प्लॅन बनवला होता. मुलांच्या मनात काय असतं हे शिक्षकांना ठाऊकच असतं. त्यामुळे आम्ही सर्व अगदी आनंदाने सहलीच्या तयारीला लागलो. शिक्षकांनी आम्हा सर्वांना सांगितले की आपण सहलीला एखाद्या सुंदर नदीवर जाऊया निसर्गरम्य वातावरणात थोडास फ्रेश होऊयात. आम्हाला त्यांनी सांगितलेलं पटलं. आणि नंतर आम्ही काही विद्यार्थी सहलीला जाण्यासाठी तयार झालो. वर्गामध्ये ऐकून वीस विद्यार्थी होते पण या वीस विद्यार्थ्यापैकी पंधराच विद्यार्थी तिथे जाण्यासाठी तयार झाले.\

Aamchi Shahal Niband in Marathi

सहलीला जाण्यासाठी आम्ही आमचे बॅग पॅक केली. त्यामध्ये आईने दिलेल्या चिवडा, आलू ची चटणी सोबतच, पराठे अगदी मनापासून आवडणाऱ्या सर्वच गोष्टी होत्या. इतकच नाही तर चिप्स चे पॅकेट देखील सोबतच दिले होते. माझ्यासारखंच इतर विद्यार्थ्यांच्या आईने देखील त्यांना भरभरून टिफिन दिलाच असेल या विचाराने मी मनातच हसले. सर्व विद्यार्थी शाळेमध्ये जमले सरांनी सहलीला जाण्यासाठी आम्हा सर्व मुलांसाठी बसची व्यवस्था केली होती .आम्ही सर्वे गंगा नदीच्या तीरावर जाणार होतो. गंगा नदी हे सर्वांचे पाप नष्ट करणारी असे मी लहानपणी ऐकलं होतं. पण हे किती सत्य आहे याच्या शोधात आम्ही सर्व मुलं आज तिथे जाणार होतो . सहलीला जाण्यासाठी आमची बस निघाली.

Aamchi Shahal Niband in Marathi आमची सहल मराठी निबंध

बस मध्ये आम्ही सर्व मुलं गाणे म्हणत होतो ,इतकच नाही तर आमचे वर्गशिक्षक सुद्धा आमच्या सोबत गात होते. प्रवास सुरू होता, असे ठिकाण जिथे आपण जात आहोत, हिरवाई, सुंदर फुले, आजूबाजूला मनमोहक वातावरण ,आणि अतिशय मनाला स्पर्श करून जाणार ते निसर्ग रम्य अगदी मनासारखं, खरं तर मला प्रवास करायला अतिशय आवडतो ,म्हणून ते बस मध्ये असलेला प्रवास मला कधीच मिस करायचा नव्हता, जेव्हा पण प्रवास सुरू असते ना, तेव्हा समांतर एका दिशेने कधी चढ तर कधी उतार या सर्व गोष्टीला फेस करत ती समोर जात असते, आणि हेच मला खूप आवडतं .

Aamchi Shahal Niband in Marathi आमची सहल मराठी निबंध

_________________________

वाचा बहिणीला भेटवस्तू काय द्यावी Top 10 Gift for Sister

वाचा आपल्या भारतीय सणाबद्दल निबंध :- Essay on Our Festivals 2023

_________________________

Aamchi Shahal Marathi Niband

एकदाच आम्ही आमच्या सहलीच्या ठिकाणी पोहोचलो, आणि सरांनी आम्हा सर्व मुलांना आमची बॅग एका ठिकाणी ठेवायला सांगितले .इतकच नाही तर त्यांनी आम्हा सर्व मुलांना त्या ठिकाणी विषयी माहिती सांगितली त्या नदीचं वैशिष्ट्य , त्या नदीचे “धार्मिक वैशिष्ट्ये “अध्यात्मिक वैशिष्ट्ये” त्यांनी आम्हा सर्व मुलांना सांगितले .कुठून आणि कुठपर्यंत वाहते त्या नदीला तीर्थस्थान का म्हटलं जातं या सर्व गोष्टीची माहिती आम्हा सर्व मुलांना सरांनी दिली. नंतर त्यांनी आम्हाला बसायला सांगितले आणि अगदी मनापासून विचारले की मुलांनो सांगा तुम्हाला हे ठिकाण आवडलं ना !त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद मावत नव्हता कारण ते आहेस तसे त्यांना मुलांसोबत वेळ घालवायला अतिशय छान वाटतो. नदीच्या बाजूला सुंदर मैदान होतं .आम्ही सर्व मुलांनी खेळण्याचे सर्व वस्तू आणले होते.

Aamchi Shahal Niband in Marathi

सरांनीच ठरवलं की आपण कुठला गेम खेळायचा, आणि सर्व मुले खो खो खेळण्यात व्यस्थ झाले. पण मी त्या खो खो मध्ये बसले नव्हते ,त्या खेळामध्ये गेले नव्हते, कारण मला खेळण्यापेक्षा लिहिण्याची जास्त आवड होती.एका ठिकाणी बसून” मी आणि माझी कवितेची डायरी ” इतकच नाही तर त्या ठिकाणी बसून मी त्या ठिकाणचा विचार करायला लागले .की इतकी सुंदर नदी लोकांनी का बरं त्यामध्ये कचरा टाकला असेल? भारतामध्ये किती ठिकाणी आहेत त्या सर्व ठिकाणांना असेच खराब करतात .बसून असल्याने सर माझ्याकडे आले, आणि मला म्हणाले का “ग” तुला खेळायचं नाही का जाणा खेळ.

मी सरांना म्हटले सर खरंतर ही नदी पाहून मला खूप वाईट वाटतं आहे .सर माझ्याकडे बघून हसायला लागले. आणि म्हटले का ग तुला रडायला येते आहे? मी म्हटले सर इतकी शुद्ध आणि पवित्र मानली जाणारी ही नदी, यामध्ये कितीतरी प्लास्टिक आणि कचरा दिसतोय. सर मला म्हणाले बेटा याला शुद्ध ठेवणे हे आपल्या विद्यार्थ्यांच्या हातात आहे. लोकांमध्ये जेवढे जनजागृती कराल तेवढेच तुम्ही रोगराई पासून आणि आपल्या भारतामध्ये असलेल्या सुंदर ठिकाणाला सुंदर त्यापेक्षाही जास्त सुंदर बनवायचा प्रयत्न कराल. सरांचा आणि माझा संवाद चालू होता तेवढ्या वेळातच नीता मॅडम आमच्याकडे आलेत. ते सर्व विद्यार्थ्यांना घेऊन आले आणि प्लास्टिक बद्दल होणाऱ्या घानी बद्धल माहिती सांगू लागल्या.

Aamchi Shahal Niband in Marathi

आपल्या भारताला कसं स्वच्छ ठेवता येईल याबद्दल माहिती सांगू लागल्या त्या सहलीमध्ये आम्ही इतकं तर नक्कीच शिकलो की लोक फक्त म्हणतात पण करत काही नाही .आणि आम्हा सर्वांना कळले की जनजागृती किती महत्त्वाची आहे.ती सहल म्हणजे आम्हा सर्व विद्यार्थ्यांसाठी एक शिकवण होती.आणि असा आनंदमय प्रसंग होता ज्याला आम्ही कधीच विसरू शकत नाही.

1 thought on “आमची सहल सुंदर मराठी निबंध | Aamchi Shahal Niband in Marathi Best in 2023”

  1. Pingback: 100+ निबंध लेखन विषय | Best Nibandh Lekhan in Marathi

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
17 × 13 =