kavita on life

आयुष्य सुंदर आहे आणि आयुष्याच्या वाटेवर | 2 best kavita on life

सौ. रेखा सर्जेराव पाटील आणि पल्लवी हर्षद यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत best kavita on life विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

best kavita on life

काव्य बंद समूह, काव्यलतिका
प्रत्येक रविवारी होणारी स्पर्धा
विषय-आयुष्य

आयुष्य खूप सुंदर आहे | best kavita on life

आयुष्य सुंदर आहे आणि आयुष्याच्या वाटेवर | 2 best kavita on life

भरभरून जगता आलं पाहिजे
रस्त्यात असुदया खाचखळगे
पार तर करता आलीच पाहिजे
आयुष्यात सर्वांसोबत राहुन

समाजासाठी वेळ देता आलाच पाहिजे स्वतः मोठे होऊनदुसऱ्यांना मोठे करता आले पाहिजे*
मात्र जमिनीवरच पाय रोवले असावे

अहंकार ,मत्सर ,क्रोध यांना
पार करून लढता आले पाहिजे
प्रेमाने जग जिंकता येते
हे मनी ठाव पाहिजे

सर्वांसाठी प्रेमाचे द्वार उघडे पाहिजे
पेरले तेच उगवते….

जगण्यास आकार पाहिजे
म्हणजे आयुष्य सुंदर होईल

जगण्यात साधी राहणी

पण उच्चविचार सरणी असवी
जीवनाचा प्रत्येक क्षण आनंदाचा असावा
आनंद पेरत जगणं असावं

सहजीवनाचे आयुष्य घालवायचे
हे रामायण सूत्र सांगते
मी आणि माझे विचार.
सृदढ निकोप असले पाहिजे

शेवटी काय ह्याच मातीत
जगणं आणि ह्याच
मातीत रुजणं.


सौ. रेखा सर्जेराव पाटील
ता . चोपडा
जि. जळगाव

best kavita on life

आयुष्याच्या वाटेवर | best kavita on life

आयुष्याच्या वाटेवर | 2 best kavita on life

आयुष्याच्या वाटेवर
अनेक नवी वळणं आहेत
पडायचं, सावरायचं, उभं राहायचं आहे
आयुष्य मनमुराद जगायचं आहे…

सुखाचे चार क्षण आहेत
दु:खाचे काही दिवस आहेत
सुख दु:खाच्या हिंदोळ्यावर
आनंदाने झुलायचं आहे
आयुष्य मनमुराद जगायचं आहे…

नव्या वाटा खुणावत आहेत
जुन्या वाट दाखवत आहेत
नव्या जुन्याच्या संगमात
मुक्तपणे बहरायचं आहे
आयुष्य मनमुराद जगायचं आहे…

गोड आठवणींमध्ये रमायचं आहे
कडू आठवणींना पुसून टाकायचं आहे
कडू गोडाच्या मिलनामध्ये
स्वत:ला झोकून द्यायचे आहे
आयुष्य मनमुराद जगायचं आहे…

ऐलतीरी मन गुंतले आहे
पैलतीर साद घालीत आहे
ऐलतीर आणि पैलतीराच्या मध्ये
सुखाने विहार करायचा आहे
आयुष्य मनमुराद जगायचं आहे…

पडायचं, सावरायचं, उभं राहायचं आहे
आयुष्य मनमुराद जगायचं आहे…

– पल्लवी हर्षद, ठाणे

best kavita on life

best kavita on life

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *