diwali kavita marathi madhe

दिवाळी आणि आनंद | 2 Best diwali kavita marathi madhe

गोविंद कुलकर्णी आणि विद्या प्रधान यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत diwali kavita marathi madhe विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

diwali kavita marathi madhe

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
काव्य बंध समुह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक. २९/१०/२०२३
विषय : सण दिव्यांचा

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
दिवाळी | diwali kavita marathi madhe
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

दिवाळी आणि आनंद | 2 Best diwali kavita marathi madhe

सण दिव्याचा आवेग श्र्वासाचा
किमया रंगाची जादू प्रेमाची
सण भाग्याचा उत्साह प्रेमाचा
दारात दिसे रांग पणत्यांची….१

दसरा संपला दहन झाले
कृषी मोती वावरात भरले
नवान्न पौर्णिमेच्या सोहळ्यात
वावरातून धान्य घरी आले…२

चाहूल लागे दिव्याच्या सणाची
छोट्या मुलांची परीक्षा संपली,
आकाश कंदीलाची स्पर्धा झाली
किल्ल्याची आठवण केली गेली ..

आई ताईची झाली धावपळ
फराळासाठी केली पळापळ
चकली, शेव, कडबोळी ,लाडू,
झाला चिवडा उजडे सकाळ..४

कंदील, दिव्यांची माळ दाराला,
पणत्यां लावूया उंबऱ्यावर
गाय वासराची पूजा करत
वसुबारस करूया साजर….५

कातर वेळी सागर संगीत
पुजन करूया गुप्तधनाचे
दिन दुसरा धनत्रयोदशी
धने बत्तासे ठेवा नैवेद्याचे…६

अभ्यंग स्नान पहिल्या दिवशी,
नातीगोती फराळाला बसती,
कातरवेळी लक्ष्मीचे पूजन
त्यानंतर फटाके वाजवती…७

त्यानंतर पाडव्याचा दिवस,
नवऱ्याचे पाकीट खाली होती
बहिणीच्या भेटीला भाऊं जाती
माहेर वाशीणीला भेट देती…८

(C)(R)
गोविंद शिवराम कुलकर्णी
नौपाडा ठाणे ४०० ६०२
९८२०५ ८४४७९

diwali kavita marathi madhe

काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका
स्पर्धेसाठी स्वरचित कविता

२९/१०/२०२३

विषय:- सण दिव्यांचा

आनंद | diwali kavita marathi madhe

आनंद | 2 Best diwali kavita marathi madhe

सण दिव्यांचा आला
दिपावली आनंदात
ज्योतिर्मय दिपोत्सव
उजळूया सदनात.

आम्रपर्ण गुंफू छान
झेंडू फूले तोरणात
नक्षी रांगोळी काढूया
लक्ष्मी पाऊले दारात

शोभा आकाश कंदील
रंगांतून खूले छान
दीप लखलखतात
हीच दिपावली शान

नि:स्वार्थपणाने जगू
माणुसकी समाजात
करू आदर सन्मान
उजळेल जीवनात

एकमेक एकोप्याने
हेवेदावे संपवूया
पणत्यांची देऊ भेट
दिपावली सजवूया.

मदतीचा हातभार
गरजूंना घरासाठी
आनंदाचा क्षण पाहू
उभे राहू त्यांच्या पाठी. ६

एक लावूया दीपक
ठेवू तेवत दारात
जवानांची आठवण
दिपावली दिवसात.

अनाथांच्या आश्रमात
दीपमाळा उधळूया
देऊ फटाके फराळ
दिपावली सजवूया.

वाटू आनंद सकलां
सण दिव्यांचा साजरा
गोड मिठाई मुखात
छान करूया हासरा. ९

धनत्रयोदशी सण
धणे गुळ नैवेद्यास
वह्या पुस्तके पैशांची
करुनिया पूजा खास. १०

नरकचतुर्दशीस
तेल सूवासिक छान
सुगंधित उटण्यास
असे दिवाळीत मान
११

पाडव्याचा सण मोठा
करी पतीस औक्षण
लक्ष्मीपूजा, भाऊबीज
भाऊ बहीणीचा सण.
१२

विद्या प्रधान
ठाणे.

Best diwali kavita marathi madhe

diwali kavita marathi madhe

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह