FSSAI License- Login, Register, Full form: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे

FSSAI full form = Food Safety and Standards Authority of India
ज्या ठिकाणी खाद्यपदार्थ तयार केले जातात किंवा त्यांची विक्री अथवा साठवणूक केली जाते अशा सर्व व्यवसायांना म्हणजेच अन्न व्यवसायांना अन्न सुरक्षा परवाना किंवा नोंदणी असणे बंधनकारक आहे. हा परवाना किंवा नोंदणी देण्याची जबाबदारी FSSAI या अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरण या संस्थेची आहे. ही संस्था आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालया अंतर्गत येत असून अन्न सुरक्षा आणि मानकांसंदर्भातील सर्वोच्च संस्था आहे. तिची स्थापना अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत झाली आहे. FSSAI अन्न व्यावसायिकांना एक १४ अंकी नोंदणी किंवा परवाना क्रमांक देते जो प्रत्येक अन्न व्यावसायिकाला फूड सेफ्टी डिस्प्ले बोर्डवर छापून आपल्या आस्थापनांमध्ये ग्राहकांना स्पष्ट दिसेल अश्या जागेवर लागणे बंधनकारक आहे.
FSSAI LICENSE कोणासाठी आवश्यक आहे?
१. डेअरी युनिट २. तेल प्रोसेसिंग युनिट ३. कत्तलखाना/ मांस प्रक्रिया युनिट ४. Relabeller आणि Repacker ५. प्रत्येक निर्माता किंवा अन्न प्रक्रिया युनिट
६. घाऊक विक्रेता, किरकोळ विक्रेता,वितरक,पुरवठादार ७. ढाबा, खानावळ, कॅन्टीन, डब्बावाला ८. केटरिंग, हॉटेल, उपहारगृह, Restuarant
९. दूध किंवा खाद्य पदार्थ वाहतूक १०. Markter ११. फेरीवाला, फास्ट फूड, चायनीज सेंटर १२. निर्यातकार आणि आयातकार १३. ई- कॉमर्स / ऑनलाईन फूड डिलिव्हरी
Food Safety and Standards Authority of India: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे
फूड सेफ्टी कायदा काय आहे?
अन्न व्यवसायात अनेक कायदेशीर लाभ मिळू शकतात. ग्राहक जागरूकता निर्माण होते. FSSAI लोगो ग्राहकांना सुरक्षित अन्नाची खात्री देतो. व्यवसाय विस्तार करताना योग्य नियोजन करण्यास मदत करतो.
FSSAI License-अन्न सुरक्षा परवान्याचे प्रकार
FSSAI Register नोंदणी:
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा कमी आहे त्यांना नोंदणी करणे आवश्यक आहे.
राज्य परवाना:
ज्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल १२ लाखांपेक्षा जास्त व २० कोटींपर्यंत आहे त्यांना राज्य परवाना काढावा लागतो.
उत्पादन युनिट दररोज २ टनापर्यंत क्षमतेचे,
दुग्ध व्यवसाय युनिट ५०,००० लिटर दररोज.
३ तारांकित व त्यावरील हॉटेल्स,
repacker व relabeller युनिट
उपाहारगृहे, सर्व केटरिंग व्यवसाय हे उलाढाल कितीही असली तरी राज्य पर्वांच्यासाठी पात्र आहेत.
केंद्र परवाना:
ज्या व्यवसायाची वार्षिक उलढाल २० कोटींपेक्षा जास्त आहे त्यांना केंद्राचा काढणे अनिवार्य आहे.तसेच E- कॉमर्स, आयतकार व निर्यातकार यांना सुद्धा केंद्राचा परवाना अनिवार्य आहे.
FSSAI License- Login, Register, Full form: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे

FSSAI License-आवश्यक कागदपत्रे
१. नोंदणीकरता:
आधार कार्ड पॅन कार्ड पासपोर्ट पत्ता (वीजबिल / भाडेकरार)
२. राज्य व केंद्राकरता
आधार कार्ड / पॅन कार्ड पासपोर्ट पत्ता (वीजबिल / भाडेकरार)पाणी तपासणी अहवाल (प्रक्रिया उद्योगासाठी)अन्नवर्ग यादी, उपकरणे यादी, युनिट चा फोटोअन्न सुरक्षा व्यवस्थापन प्रणालीचा प्लॅन इतर (व्यवसायानुसार)
FSSAI License-वैधता
१ ते ५ वर्षांपर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर नूतनीकरण करणे आवश्यक.
परवाना नूतनीकरण
लेट फी टाळण्यासाठी परवाना संपण्याच्या ३० दिवस आधी अर्ज करावा.त्यानंतर मुदत संपण्याच्या दिवसापर्यंत १०० प्रति दिन दंड भरावा लागतो.मुदत संपल्यानंतर नूतनीकरण करता येत नाही . पुन्हा नवीन अर्ज सादर करावा लागतो.
FSSAI License- Login, Register, Full form: अन्न सुरक्षा परवाना- प्रक्रिया व फायदे
अर्ज कसा करावा?
अन्न सुरक्षा परवाना प्रक्रियेसाठी FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर माहिती उपलब्ध आहे.नोंदणीसाठी ८६२३८५५८३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. अथवा पुढील गूगल फॉर्म भरावा https://docs.google.com/forms/u/0/ तुमच्या व्यवसायाच्या प्रकारानुसार नोंदणी प्रकार व आवश्यक कागदपत्रे तसेच फूड सेफ्टी इन्स्पेक्शन साठी मार्गदर्शन केले जाईल. आम्ही तुमचा अर्ज FSSAI च्या अधिकृत वेबसाईटवर तुमच्यावतीने दाखल करू. दोन दिवसात पावती मिळेल.नोंदणीसाठी १० शासकीय कामाचे दिवस तर परवान्यासाठी ३० ते ४५ शासकीय कामाचे दिवस लागतात.
Author-संकेत अहंकारी
सर्टिफाइड फूड सेफ्टी मित्र
FSM ID FSMDM003155
Contact- ८६२३८५५८३३
Email- foodsafetymitra@yahoo.com