काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.जयश्री संतोष धोका यांची -गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला- हि कविता -Ganpati Bappa Quotes in Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला By सौ.जयश्री संतोष धोका| Best Ganpati Bappa Quotes in Marathi 2023
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला | Ganpati Bappa Quotes in Marathi 2023

श्री गणेशा बुद्धी दाता,
कला विद्यांचे अधिपती
कार्यारंभी पूजन करतो
गणांचे स्वामी गणपती…१
आसनस्थ पाहून गणेशा,
डोळे आमचे निवले
विधीवत करुनी पूजा,
मस्तक पायी लवले…२
बहुप्रिय तुम्हा असती,
मोदक, दुर्वा, लाल फुले
ढोल, ताशे, सनई वादन,
गजरात स्थापित केले…३
भक्ती रसात तल्लीन झाले,
अबाल वृद्ध अपंग
घरोघरी अन् गावोगावी,
उमटले कलेचे रंग…४
शिवपार्वती पूत्र गणेशा,
चर्तुबाहू, सूंड वदन
विशाल गजकर्ण ऐसे
आरूढ मुषक वाहन…५
बुद्धी देवता विनायका,
जल तत्त्वांचे अधिपती
संकट नाश करण्यासाठी
पाश, अंकुश अस्त्र हाती…६
रिद्धी सिद्धी सहित तुमची
मुर्ती ठसली डोळा
दुरदूरचे आप्तस्वकीय
घरात झाले गोळा…७
प्रमोदा, पदांचे सांज सकाळी,
पूजन केले नित्य
मनात आले ते ते सारे
वदले तुम्हास सत्य…८
मोदक सेवन करून एकाक्षरा
पोट बिघडले का हो ?
आवाजाच्या प्रदूषणाने,
कर्ण दडपले ना हो ?…९
ऊत्साहाचा अतिरेक झाला,
माफ करा ना आम्हा
आता चूक ही घडणे नाही,
असे वचन घ्या पुन्हा…१०
श्री गणेशा सिद्धिविनायका,
विद्येचा उपयोग व्हावा
तळागाळातील प्रत्येक जण,
शिक्षणाच्या गंगेत न्हावा…११
श्री गणेशा हे लंबोदरा,
श्रीमंती मनाची मिळू द्या
नको काही अपशब्द ओठी,
सर्वांप्रति ममता उमळू द्या..१२
विघ्नहर्ता तुम्ही चिंतामणी,
संकटातून मुक्ती मिळावी
रोजचा दीस जावो सुखाने,
अभय द्या हो, विघ्ने टळावी…१३
सर्वात्मना, गौरीसूता,
घडावी माय पित्यांची सेवा
उतराई तयांचे राहू,
मिळो आशीर्वाद मेवा…१४
भालचंद्रा, गजकर्णा,
आमचे ही कान खेचा
नको कुणाशी सूड बुद्धी,
निंदा नालस्त्या कुणाच्या…१५
धुम्रवर्णा, गिरिजात्मका,
बळ राहू द्या पर्वता ईतुके
माय भूमीच्या रक्षणार्थ,
गाजवावी आम्ही कर्तुके…१६
रूद्रप्रिय, डीजे विनाच,
श्लोक आरती म्हणू खास
प्रार्थतो आपणास देवव्रता,
सवंगतेचा व्हावा नाश…१७
रहा आता इथेच नंदना,
जाऊ नका ना दूरं
विरहाच्या जाणिवेने नयनी
दाटून येतो पूरं…१८
वरद विसर्जन मुर्तीचे होते,
तुम्ही न कोठे जाता
ज्यांच्या ठायी करुणा ममता,
त्यांच्या ह्रदयी वसता…१९
विरप्रद, भूपती, अथर्वा,
थोड्याच दिवसांसाठी येता
विरहातही सुख असते,
असेच ना पटवून देता…२०
झाल्या चुका आमच्या,हरिद्रा,
लंबोदरी ठेवून घ्या ना
बाप्पा तुमची वाट पाहतो,
पुढच्या वर्षी लवकर या ना..२१
ईशानपुत्र हो मयुरेश्वरा,
जल्लोष तुमच्या नावाचा
आम्ही मुखाने नित्य करतो,
गजर बाप्पा मोरयाचा….२२
🙏💐🙏💐🙏💐🙏
सौ. जयश्री सं. धोका. पुणे.
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला By सौ.जयश्री संतोष धोका| Best Ganpati Bappa Quotes in Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला By सौ.जयश्री संतोष धोका| Best Ganpati Bappa Quotes in Marathi 2023
Beautiful Poetry