Marathi Prem Kavita

भेटली अचानक ती | माझे पहिले प्रेम | Best Marathi Prem Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी वर्षा पडधान/खोब्रागडे यांची -भेटली अचानक ती – हि कविता -माझे पहिले प्रेम- या विषयावर असून हि एक Marathi Prem Kavita आहे

भेटली अचानक ती | Marathi Prem Kavita

भेटली अचानक ती | माझे पहिले प्रेम | Best Marathi Prem Kavita 2023

भेटली अचानक ती
ती सांजवेळ होती
मनात खोल कुठेतरी
दाटलेली कळ होती
तरी ओठांवर स्मित देत
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

किती बोलकी असे ती
मोजकेच बोलली पण
आठवणीत ठेवलेले
वेचले काही क्षण
सल मनातील लपवून
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

रिता झालो तिच्या पुढे मी
सल मनात खोल
हुंदक्यात साठलेली
वर्षे कित्येक अबोल
वाट देऊन आसवांना
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

वाटे रागवावे तिने
“आता काय राहिलेले?
मोडलेस घरट्याचे
मी स्वप्न पाहिलेले”
पण जुळवून घेत सारे
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

उगाच हसत होती
कधी बोलली काही- बाही
मुक्या भावनांना जनू
सांगायचे होते काही
पुन्हा एकदा लपवीत
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

हुरहूर लागलेली
थबकत होते पाऊल
नजर चुकवून कुणाची
जनू घेत होती चाहूल
पदर खांद्यावर सावरीत
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

सौभाग्याच्या बंधनांचा
पायी तिच्या धागा
तरी शोधत राहीलो मी
तिच्या मनात माझी जागा
नजरेला नजर चुकवून
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

“ये, थांब ना जरासा”
ती का म्हणत नाही?
भेटशील का पुन्हा रे
बोलायचे आहे काही
तरी “उशीर होतोय” म्हणत
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

वेळ निघून गेलेली
डोळ्यांसमोर जागी
सुखी कुंकवाचा धनी
अन् मी किती अभागी
मध्येच भावनांना बांध घालत
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

बघता वळून तिला मग
वाटे किती मी चुकलो
आयुष्य भर सुखाला
खरोखरीच मुकलो
नशीबास दोष लावीत
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो।

पहिल्या प्रेमाच्या त्या
आठवणी कित्येक गोड
कवितेत गुंफताना
जीवंत वाटे ओळ न ओळ
स्पर्श मनाला घडवून
पुढे ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

मन विचारत होते मज
पुन्हा मैत्री करावी का रे?
पण होते तसे निरागस
पुढे राहील काय सारे?
म्हणून घालविलेले सोबतचे क्षण
जपत ती ही निघून गेली
पुढे मी ही निघून गेलो ।

भेटली अचानक ती | माझे पहिले प्रेम | Best Marathi Prem Kavita 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

भेटली अचानक ती | माझे पहिले प्रेम | Best Marathi Prem Kavita 2023

93 thoughts on “भेटली अचानक ती | माझे पहिले प्रेम | Best Marathi Prem Kavita 2023”

 1. Prafulkumar Gajanan Nartam

  अतिशय उत्कृष्ट अशी कविता मनाला भावून जाते. खोल दूरवर कुठे हुरहुर निर्माण करते.

 2. राजु आंबिलकर

  प्रेमाला उजाळा देणारी अप्रतिम कविता .

 3. राजु आंबिलकर

  हृदय स्पर्श प्रेमाला उजाळा देणारी अप्रतिम कविता .

 4. खूप छान
  अतिशय सुंदर मनाला स्पर्श करून जाणारी कविता
  💐💐

 5. Madhukar Pajai

  खूपच छान कविता तुम्ही करता कविता करण्याची गुपित तुम्ही कधीच सांगितलं नाही एवढ्या मोठ्या लेखिका आम्हाला कळलच नाही बेस्ट ऑफ लक अशाच कविता करत रहा

 6. Very Nice poem, Write poetry in Hindi as well as Marathi, so that other language audiences can understand it.
  ☺️☺️😊😊

 7. अतिशय सुन्दर कविता मनाला स्पर्श करणारी.
  दिल से दिल तक

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
16 × 2 =