सुवर्णा नाझरे मिरजकर आणि सौ. संध्यारजनी बळीराम सावकार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत poem on diwali in Marathi for class 1 विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
poem on diwali in Marathi for class 1
🌹 काव्यबंद साहित्य समूह आयोजित काव्य लेखन स्पर्धा
२९/१०/२०२३
विषय सण दिव्यांचे
दीपोत्सव | poem on diwali in Marathi for class 1

तबकामध्ये शोभे निरांजन
निरांजनात फुलवाती शोभायमान
सांज समयी लक्ष्मीच्या आगमनाने
सारी सृष्टी झाली प्रसन्नवान. !
लक्ष लक्ष दिव्यांचा थाट
घेऊन आली नवी पहाट
निरांजनात राहो तेल वातीची साथ
तिमिरांना मिळो प्रकाशाची वाट!
तिन्ही सांज सजली प्रकाशमान
तारकांचे झाले धरेवर आगमन
धरतीवर अवतरले जणू नभांगण
लख्ख दिव्यांनी गेली उजळून!
दीपोत्सव रंगला दारोदारी
दूरदेशी पाखरे आली घरोघरी
वेडी माय उभा दारोदारी
आनंद असे तिच्याच उदरी !
भेदभाव विसरून सारा
आसमंत उजळून निघावा
सर्वधर्मसमभावाच्या रोषणाईने
अवघ्या चराचरसृष्टीला साज चढावा!
🌹सुवर्णा नाझरे मिरजकर 🌹
poem on diwali in Marathi for class 1
काव्य बंध समुह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक – २९ । १० । २० २३
विषय – सण दिव्यांचे
एक दिवा अनाथांसाठी | poem on diwali in Marathi for class 1

आला दिपावली सण मोठा
नव तेज घेऊन उत्सव
छान साजरा करू स्नेहाने
असा ज्योतिर्मय दिपोत्सव– १
पाच दिवसांचा उत्साहाचा
आनंदाचा वर्षाचा भाग्याचा
लक्ष लक्ष दिव्यांची आरास
घेऊन आला हा मांगल्याचा— २
माणूसकीचा दिवा लावूनी
टांगू या आकाशकंदीलात
सुखाचे दिप लावू अंगणी
रांगोळी काढू सप्तरंगात— ३
अनमोल अशा जीवनात
खास अमौलिक करू कर्म
नको फळाची अपेक्षा मनी
अनाथांचे जाणून घ्यावे मर्म— ४
ज्यांना मायबाप नाही असे
समाजातील अनाथ मुले
त्यांना प्रेम आधार मायेचा
हात देवू निरागस फुले— ५
मायबाप होऊ त्यांचे लावू
काळजात या प्रेमाच्या वाती
मुखी घास घालू अन्नदाता
जोडू हृदयात गोड नाती– ६
अनाथांसाठी ही दिपावली
साजरी करू छान हर्षाने
घालवू क्षण सोबती त्यांच्या
उत्साहाने मायेने प्रेमाने— ७
एक दिवा हा अनाथांसाठी
जरी पोरके असती किती
वाटू आनंद दिपावलीचा
संध्या करते सर्वांना विनंती — ८
सौ . संध्यारजनी बळीराम सावकार
नासिक

poem on diwali in Marathi for class 1
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह