सौ. भारती गाडगिलवार आणि सौ. समीक्षा बाळासाहेब जामखेडकर यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत marathi poem on diwali festival विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
marathi poem on diwali festival
काव्यबंध समुह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
दि : २९/१०/२१
विषय : सण दिव्यांचा
रंग दिवाळीचे | marathi poem on diwali festival

आठवते मज आजही दिवस दिवाळीचे…!
बालपणाच्या मस्तीचे…!
फराळाची चंगळ, कपडे खरेदीची मौज…!
घरोघरी खमंग फराळाचा दरवळ…!
साफसफाई, वेळेत फराळ बनविण्याची धावपळ…!
बच्चेकंपनीत सर्वात आकाशकंदील बनवण्याची चाललेली चढाओढ…!
प्रत्येकाच्या अंगणात मातीच्या किल्ल्याचे मनमोहक दृश्य…!
पायऱ्या, गुहा, तटबंदी, शत्रूशी लढणारे मावळे,
शिरोभागी सिंहासनावर आरूढ स्वयं छत्रपती शिवाजी महाराज…!
गवळणी, गुरंवासरं, सारी काही नयनरम्य…!
सकाळ संध्याकाळ दारी शेणाचा सडा…!
ठिपक्यांच्या रंगीबेरंगी रांगोळीने दिसे अंगणाचा नूरच आगळा…!
घरातील पोरीबाळी वह्यांच्या पानावर ठिपक्यांच्या रांगोळीचा करती सराव…!
सगळे संस्कृती, संस्कार अनुकरणातून आपसूकच मिळालेले….
ना कुठले शिबिर ना कुठला क्लास…!
दिवाळीच्या दिवशी तेल, उटण्याचं अभ्यंगस्नान…
लाडू, चकल्या, अनारसे, शंकरपाळी, चिवडा, कानवल्यांना येई मायेची सर…!
पहाटवेळीच घरोघरी धूप दीप, अगरबत्तीचा सुवास…!
लक्ष्मीपूजनाला घरधनी नि गृहलक्ष्मी भासे लक्ष्मी नारायण…!
बालगोपाल फुलबाज्या, लवंगी फटाके, टिकल्या उडवत करती मज्जा…!
सगळं चित्र सुंदर हृदयात साठवण करण्यासारखे…!
आजच्या काळात दिवाळी सणाचे रूपच निराळे…!
दिखाऊपणा, भपकेपणा सर्वत्र नेत्री दिसे…!
सडा, रांगोळी मोजक्याच घरी…!
स्टिकर, साचा, प्लास्टिकच्या रांगोळी घरोघरी…!
मातीच्या पणत्यांएवजी विजेच्या पणत्यांची रोषणाई…!
विकतचा फराळ…!
नातलग भेटीगाठीचे क्षणही मर्यादित…!
पारंपारिक वेशभूषेलाही आधुनिकतेचं वलय…!
रंग दिवाळीचे पाहा कसे बदलले…!
कालाय तस्मै नमः म्हणावे…!
आठवांची साठवण हृदयात करत आजचे क्षण साजरे करूया चला रे….!!
सौ. भारती गाडगिलवार, चंद्रपूर
marathi poem on diwali festival
काव्यबंध समूह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 29/10/2023
विषय सण दिव्यांचा
आली दिवाळी घरोघरी | marathi poem on diwali festival

आली दिवाळी घरोघरी
सगळ्यात मोठा सण
सण हा असे मांगल्याचा
होत असे प्रसन्न मनं
सण दिव्यांचा दिवाळी
वनवास रामाचा संपला
रामराया आले त्यांच्या घरी
दीपोत्सवाने स्वागत समारंभ झाला
दूर सारून अंधकार
प्रकाश आणू या जीवनी
अज्ञानाचा अंधार दूर
प्रकाशाच्या ज्योती गगनी
सप्तरंगात रांगोळी
दिसे छान सोनसकाळी
लेखणी घेऊन हातात
साहित्यिकाला सुचे चार ओळी
पहिला दिवा पेटतो तो
गाई वासरराला औक्षण
माया मामतेचे प्रतीक
आले उत्साहाला उधाण
धनतेरस पूजन लक्ष्मी कुबेराचे
शेतातील पीक घरात येई
त्यामुळे घरचे धनधान्य,
पूजन त्याचेही कौतुके होई
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी
उटन्याणे आंघोळ करावी
उजेडासाठी रांगोळीवर
एक छानशी पणती ठेवावी
लक्ष्मी पूजनाला पूजा लक्ष्मीची
अंगणात दिसे पणतीच्या ओळी
घरची लक्ष्मी सोनपावलांनी येई
नैवेद्याला आज गोड पुरणाची पोळी
पाडव्याचा सण पुढे औक्षण
वडिलांना ,पतीराजाला
ओवाळणी घेत असताना
आनंद मनोमनी हो झाला
भाऊबीजेचा दिवस येता
बहीण बघते भावाची वाट
काय त्यांचे निस्वार्थी प्रेम
काय वर्णू प्रेमळ नात्याचा थाट
दिवाळीच्या या सणाला
आनंदाची प्रकाशाची उधळण
सर्वांना सुख लाभावे
अशी प्रार्थना करते मनोमन
सौ. समिक्षा बाळासाहेब जामखेडकर संभाजीनगर

marathi poem on diwali festival
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह