आजीची लाडूबाई | Best aaji mhanje kay kavita lyrics in marathi 2023

आजीची लाडूबाई | Best aaji mhanje kay kavita lyrics in marathi 2023

सौ. सुवर्णा अनिल बाबर यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji mhanje kay kavita lyrics in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

aaji mhanje kay kavita lyrics in marathi

स्पर्धेसाठी स्वरचित कविता
“काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा”
दि. – १४ सप्टेंबर २०२३
विषय – आजीची छकुली

aaji mhanje kay kavita lyrics in marathi 2023

आजीची लाडूबाई | aaji mhanje kay kavita lyrics in marathi

आजी आजी म्हणत
साऱ्या घरभर फिरते
आजीची ती लाडूबाई
आजोबांची ती बछडी

दुडू-दुडू कसे
आजीच्या मागे मागे फिरे
पायी पैंजण कसे
छूम-छूम वाजे

चिऊ काऊचा घास
भरवीत भात संपवे आजी
एक घास आईचा, अन् एक बाबांचा
करीत संपवी पानातली भाजी

निरनिराळ्या सांगत गोष्टी
आजी घाले लाडूबाईला झोपी
ऐकून लाडू बाईच्या गप्पा गोष्टी
मिटे आजीही डोळे घेऊन लाडूबाईची पापी

आजीच्या कुशीत मिळे ऊब प्रेमाची
जशी कडक उन्हात सावली झाडाची
आजी आजोबा असे शिदोरी संस्काराची
आहेत अनमोल नाती जन्माची

वाढता वाढे लाडूबाई आमची
तरीही ऐकायची आजी कडून अंगाई
सारे पुरवून हट्ट घेई
नही म्हणता फुगून पाय आपटत जाई

सरले दिवस बालपणीेचे
वाही वारे मग लाडूबाईच्या पाठवणीचे
साठवून माहेरच्या आठवणी
घेई निरोप भरल्या मनी

आजीच्या डोळा येई पाणी
आता ऐकवील कोणाला ती गाणी
आजी नातीच नातंच मुळी आगळ वेगळं
नातीच्या बोलत विसरते दुःख सगळं

नशीबवान असतात मुलं ज्यांना
मिळते आजी-आजोबांचे प्रेम
सहवास असतो नि:स्वार्थ प्रेमाचा
झरझर झरा वाहे जसा नदीचा

सौ. सुवर्णा अनिल बाबर
पुणे

aaji mhanje kay kavita lyrics in marathi

aaji mhanje kay kavita lyrics in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *