Katha Lekhan In Marathi Ek Raja

एक राजा आणि उंदीर मराठी कथा लेखन 2023 | Best Katha Lekhan In Marathi Ek Raja

लहान मुले जेव्हा ऐकत नाही, त्यांना शांत राहण्यासाठी गमतीदार गोष्टींची आवश्यकता असते. Katha Lekhan In Marathi Ek Raja हि गोष्ट आहे ज्यातून बोध सुद्धा मिळणार आहे.

Katha Lekhan In Marathi Ek Raja

एका गावामध्ये एक उंदीर असतो .तो उंदीर नेहमीच गडबडीत असतो. स्वतःचे पोट भरण्यासाठी आणि स्वतःला आकर्षक दिसण्यासाठी तो प्रयत्न करीत असतो. म्हणून कुठल्याही घरात जाऊन कुठलेही वस्तू तो उचलून आणतो इतकच नाही तर एक दिवस एका घरी जातो त्या घरामध्ये खाली लोणी पडलेली असते ती लोणी खायला जातो .लोणी खात असताना त्याला एका बाजूला एक कापड दिसतो . तो अतिशय सुंदर आणि आकर्षक कापड पाहून उंदराला वाटतं की याची आपण एक सुंदरशी टोपी बनवूया.

Katha Lekhan In Marathi Ek Raja

तो कापड घेऊन तो नाचत नाचत धोबी कडे जातो . आणि धोबीला म्हणतो , “दादा दादा” मला या कापडाला स्वच्छ धुऊन द्या, तर धोबी म्हणतो, “नाही नाही” मला वेळ नाही, चल जा इथून तर उंदीर त्याला म्हणतो तू खूप काम चोर आहेस, हे सगळ्यांना सांगू का तू कशाप्रकारे कपडे धुतो हे मी सगळ्यांना सांगू का उंदरांनी असं म्हटल्या बरोबर धोबी घाबरून जातो ,आणि त्याला ते कापड स्वच्छ धुऊन देतो. स्वच्छ धुतलेला कापड घेऊन तो शिंपीकडे जातो, आणि शिंपीला म्हणतो “दादा दादा “याची मला सुंदर टोपी शिवून द्या. शिंपी दादा त्याला म्हणतो की, नाही नाही मला वेळ नाही मी तुला शिवून देऊ शकत नाही

माझ्याकडे असंख्य कापड आहे ,आणि त्याला मला आता लगेच शिवून द्यायचं आहे, उंदराला राग येतो आणि उंदीर म्हणतो, दादा दादा तुम्ही कापडाची अदलाबदली करत असता, मी बाहेर जाऊन सांगू का ?आणि असं म्हणून उंदीर जोरात ओरडायला लागतो.

Katha Lekhan In Marathi Ek Raja

Best Katha Lekhan In Marathi Ek Raja

उंदराने असं म्हटल्यानंतर शिंपी घाबरून जातो आणि त्याला टोपी शिवून देण्यासाठी त्याच्या जवळचा कापड घेतो. काही वेळानंतर त्याच्या सुंदर कापडाची तो टोपी शिवून देतो. सुंदर शिवलेल्या टोपीला आणखी आकर्षक करण्यासाठी तो एका आजीकडे जातो आणि आजीला म्हणतो, आजी मला याला सुंदर आकर्षक करून दे, म्हणजेच माझी टोपी अगदी राजाच्या टोपी सारखी दिसेल .आणि राजाच्या टोपीला जसे सुंदर हिरा आहे त्यालाही तिथे जोडून दे.

ज्यामुळे माझी टोपी सुंदर आकर्षक राजा च्या टोपी सारखी दिसेल. आजी त्याला नकार देते आणि म्हणते जा मला आणखी खूप काम आहे. आजीचे असे बोल ऐकून उंदीर ओरडायला लागतो, आणि म्हणतो आजी तू कुठल्या प्रकारे कामचोरपणा करते मला माहितीये? मी सर्वांना सांगेल की तू कामचोरपणा करते!

Katha Lekhan In Marathi Ek Raja

__________________________

वाचा गोष्ट :- Short Katha Lekhan in Marathi

वाचा गोष्ट :- आईची आत्मा गोष्ट | Aatma Story in Marathi 2023

__________________________

उंदराचा असं बोलणं ऐकून त्यांला विचारते एवढासा तू उंदीर आणि मला शिकवतोस की मी काम चोरपणा केला सांग बर मी काय कामचोरपणा केला. आजी धीट असते. ती उंदराला अजिबात ऐकत नाही. उंदीर ओरडायला लागतो उंदराचं ओरडणं बघून आजी घाबरते. आणि त्याला म्हणते आ न तुझी टोपी त्याला हिरा लावून देते . उंदीर आनंदी होतो. आणि तिला टोपी देतो. आजी टोपीच्या मध्यभागी एक सुंदरसा हिरा जोडून देते.

ती टोपी अगदी राजाच्या टोपी सारखी आकर्षक आणि अतिसुंदर दिसायला लागते. टोपी घेऊन उंदीर राजाकडे जातो राजाच्या महालात जाऊन जोर जोरात ओरडतो हातामध्ये असलेला बँड आणि डोक्यावर असलेली टोपी राजाची नजर त्याच्याकडे आकर्षित करते.

Katha Lekhan In Marathi Ek Raja

उंदीर राजाला म्हणतो ,कसा दिसतोय मी तुझ्या डोक्यावर असलेल्या टोपी पेक्षा माझी टोपी सुंदर दिसत आहे .राजा रागवतो चिडतो ,आणि त्याच्या डोक्यावरची टोपी काढायला लावतो. उंदीर पुन्हा हसतो आणि हसताना तेच ते वाक्य रिपीट करतो . आणि म्हणतो राजमहालात राहणारा राजा एका उंदराची टोपी घेऊन पळाला. राजा हा भिकारी आहे. असं म्हणत म्हणत तो महालाच्या बाहेर जाऊन बँड वाजवत आरडाओरडा करतो उंदराचा असं बोलणं ऐकून राजा घाबरतो आणि त्याला टोपी वापस देण्याचा सैनिकांना आदेश देतो.

Katha Lekhan In Marathi Ek Raja

असे अनेक प्रकारचे साहित्य आम्ही घेऊन येत असतो. तुम्हाला दर्जेदार मराठी साहित्य पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. तुमचे Feedback देऊन. त्यामुळे आम्ही आमच्या तृटी दुरुस्त करू शकतो.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha
https://www.youtube.com/watch?v=U19l1M1zhNI

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *