Kavita Spardha Kavya Lekhan Spardha

काव्यबंध : दिर्घ कविता स्पर्धा | Best Marathi Kavita Spardha 2023

माझा ब्लॉग घेऊन आले आहेत काव्यबंध हा कविता स्पर्धांचा समूह. या द्वारे आम्ही न थांबता Best Marathi Kavita Spardha घेण्याचा संकल्प केला आहे.

या स्पर्धांचा मुख्य हेतू हा आहे कि अनेक हुशार आणि प्रतिभावान कवी जे Digital युगामध्ये मागे राहिले आहेत त्यांना समाजधारे मध्ये सोबत घेणे. आम्ही असे अनेक कवी पहिले आहेत ज्यांची शब्दरचना मनाला सहज स्पर्श करते पण त्यांना म्हणावे असा गौरव मिळत नाही. बहुतेक वेळा तर कवितेचा मूळ कवी कोण हाच प्रश्न असतो. कारण सर्व जन Whats App वर जोडले जातात आणि तिथे कविता forward करताना खूप सहज कवी किंवा कवयित्री बदलता येते. अशा पार्श्वभूमीवर आमचा मानस हाच कि मूळ कलाकाराला त्याच्या नाव आणि चेहर्यासहित योग्य ती ओळख इंटरनेटवर मिळावी.

Best Marathi Kavita Spardha 2023

कविता स्पर्धा का गरजेच्या आहेत ?

कविता स्पर्धा या समजासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. कारण यामध्ये विविध जातीचे विविध धर्मांचे लोक सहभाग घेतात, इतकच नाही तर त्यांना त्यांचं मन त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी स्वातंत्र्य मिळते. समाजाची प्रगती करायची असेल तर अशा स्पर्धा होणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. तुमच्या विचारांचा ठसा समाजावर उमटतो आणि एक समाजकार्य तुमच्या हातून घडते.

कविता स्पर्धा आयोजित करण्याचे उद्देश काव्य कम्युनिटीच्या विकासाला प्रोत्साहन देणे हे आहे. या स्पर्धेमध्ये सर्व वयोगटातील लोक सहभागी होतात आणि कलेचा विकास करतात. कविता हे सर्वांना आवडणारे आणि सर्वांच्या मनातील भावना व्यक्त करणारे एक साधन आहे. कविता स्पर्धेमध्ये भाग घेतल्याने झालेल्या चुका लक्षात येऊन आपण नवीन आणि योग्य रीतीने लिहिण्यास सुरुवात करतो. जो जिंकतो त्याला पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि जो हरतो तो कुठे मागे पडलो याची शाहनिषा करतो आणि पुढे सरकतो.

Best Marathi Kavita Spardha 2023

दीर्घ कविता म्हणजे काय ?

दीर्घ कविता म्हणजे अश्या कविता ज्यांची शब्द संख्या हि कमीत कमी ३०० शब्द असते. या कवितांचे वैशिष्ट्य असे कि कवीचे शब्दज्ञान आणि आशयघनता याचे परीक्षण यात अतिशय चोखपणे होते. वाचणार्यालाही कवितेच्या विश्वाचे अगदी बारकाईने आकलन होते आणि कवी आणि वाचक दोघेही समान उंचीवर कवितेचा आस्वाद घेत असतात.

काव्यबंध : दिर्घ कविता स्पर्धा | Best Marathi Kavita Spardha 2023

स्पर्धेचे विषय

  1. पावसाळा आणि आठवणी
  2. माझे पहिले प्रेम
  3. किमयागार निसर्ग
  4. देश प्रेम कविता

Best Marathi Kavita Spardha 2023

स्पर्धेच्या तारखा

१) कविता रेजीस्टर करण्याचा कालावधी

सर्व स्पर्धकांनी दिनांक १२ जुलै २०२३ सकाळी ६ .०० पासून ते १७ जुलै २०२३ रात्री ११.५९ पर्यंत आपल्या कविता सर्व माहिती सहित लेखाच्या शेवटी दिलेल्या कविता नोंदणी फॉर्म मध्ये सबमिट करव्यात. (काही अडचण आल्यास आशू छाया प्रमोद +91 78209 94118 यांना संपर्क करावा)

२) कविता माझा ब्लॉग वर प्रसिद्ध करण्याचा कालावधी

दिनांक १८ जुलै २०२३ ते २५ जुलै २०२३ या कालावधीत आयोजाकांद्वारे पात्र झालेल्या सर्व कविता माझा ब्लॉग वेबसाईट वर प्रसिद्ध केल्या जातील.

३) परीक्षण कालावधी

दिनांक १८ जुलै २०२३ ते २५ जुलै २०२३ या कालावधीत परिक्षकांद्वारे पात्र झालेल्या सर्व कवितांचे परीक्षण करून त्यांना मार्क्स दिले जातील.

४) कविता प्रसार करण्याचा कालावधी

या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे या मध्ये जेवढे गुण परीक्षकांच्या हातात आहेत तेवढेच गुण स्पर्धकाच्या देखील हातात आहेत. स्पर्धक जितक्या जास्त लोकांना माझा ब्लोग वेबसाईट वर आपली कविता वाचायला आमंत्रित करेल तितके त्याला जास्त मार्क मिळतील. म्हणजे अर्धे मार्क परीक्षकांकडून आणि अर्धे मार्क कवितेच्या वाचक संखे वरून मिळतील आणि दोघांचे एकत्र गुण स्पर्धकाला मिळतील. गुण विभाजन तुम्हाला पुढे बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रक हेडिंग खाली वाचायला मिळेल.

कविता जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी स्पर्धकांना २६ जुलै मध्यरात्री १२.०० पासून ते ३१ जुलै २०२३ रात्री ११.५९ पर्यंत वेळ मिळेल.

५) स्पर्धेचा निकाल

दिनांक ६ ऑगस्ट २०२३ रोजी स्पर्धेचा निकाल जाहीर केला जाईल.

( स्पर्धकांच्या संखेत जर अचानक वाढ झाली तर निकालाची तारीख बदलू शकते याची नोंद घ्यावी.)

Best Marathi Kavita Spardha 2023

काव्यबंध Kavita Spardha नियम :-

१) कविता स्वलिखित आणि पूर्ण नवीन असावी. दीर्घ कवितेची शब्द मर्यादा ३०० शब्द आहे. त्यामुळे ३०० पेक्षा कमी शब्द संख्या असलेल्या कविता प्रसिद्ध केल्या जाणार नाहीत आणि त्या बाद होतील.

२) कविता ही या आधी दुसऱ्या कुठल्याच ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर प्रकाशित केलेली नसावी.

३) कविता एकदा माझा ब्लॉग वेबसाईट वर प्रसिद्ध झाल्यानंतर ती पुन्हा वापरासाठी इतर कुठल्याही वेबसाईटवर देऊ नये. कवितेच प्रसार करण्यासाठी वेबसाईट ची लिंक मिळेल, शेअरिंगसाठी तिचाच वापर करावा.

४) सामाजिक तेढ निर्माण होईल अशी रचना ग्राह्य धरली जाणार नाही.

५) एक स्पर्धक एकच कविता रेजीस्टर करू शकतो. ती कविता विषयाला अनुसरून असावी आणि दिलेल्या चार विषयातील एक विषय रचनेमध्ये अधोरेखित झालेला हवा.

६) काॅपी पेस्ट, चोरलेली/ फाॅरवर्ड केलेली कविता आढळल्यास रचना बाद होईल आणि रचनाकाराला भविष्यातील कोणत्याही स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही

७) स्पर्धेत काव्यरचना दिलेल्या वेळेवर रजिस्टर करावी. आयोजकांच्या परवानगी शिवाय वेळेनंतरची रचना प्रसिध्द केली जाणार नाही याची नोंद घ्यावी.

८) कविते मध्ये चोरलेला मजकूर नाही आहे हे आधी चेक केले जाईल आणि त्यानंतरच वेबसाइट वर प्रसिद्ध केली जाईल

९) प्रसिद्ध केल्यानंतर आपल्या कवितेची लिंक जास्तीत जास्त लोकांना पर्यंत पोहोचेल याची काळजी घ्यावी.

Best Marathi Kavita Spardha 2023

बक्षिसे आणि प्रशस्तीपत्रक

१) वरील नियम पाळून पात्र ठरलेले सर्व स्पर्धक प्रशस्ती पत्रकासाठी संरक्षित केले जातील.

२) प्रत्येक पात्र दीर्घ कवितेला 2 टप्यांमध्ये गुण मिळतील

a) पहिला टप्पा – स्पर्धकाच्या कवितेला किती वाचकांनी भेट दिली हा आकडा तपासला जाईल. आणि वाचकांच्या संख्येनुसार 10 पैकी मार्क मिळतील.

प्रसिद्धीसाठी दिलेल्या कालावधीत प्रत्येक कवितेच्या वाचक संख्येनुसार कवितेला खालील प्रमाणे मार्क मिळतील.

१ ते १० वाचक = १ मार्क
११ ते २० वाचक = २ मार्क
२१ ते ४० वाचक = ३ मार्क
४१ ते ५० वाचक = ४ मार्क
५१ ते ७० वाचक = ५ मार्क
७१ ते १०० वाचक = ६ मार्क
१०१ ते १३० वाचक = ७ मार्क
१३१ ते १६० वाचक = ८ मार्क
१६१ ते २०० वाचक = ९ मार्क
२०० पेक्षा जास्त वाचक = १० मार्क

सूचना:- दिनांक २६ जुलै २०२३ मध्यरात्री १२.०० पासून ते ३१ जुलै २०२३ रात्री ११.५९ पर्यंत या कालावधीतील वाचक संख्याच ग्राह्य धरली जाईल. त्यामुळे स्पर्धकांनी त्याच कालावधीत आपली कविता जास्तीत जास्त शेअर करावी. या कालावधीच्या आधी किंवा नंतर आलेले व्ह्यूज आणि वाचक मार्कांसाठी मोजले जाणार नाहीत.

Best Marathi Kavita Spardha 2023

b) दुसरा टप्पा :- परिक्षकांतर्फे कवितांचे परीक्षण केले जाईल. आणि त्यांच्याकडून कवितेला १० पैकी मार्क मिळतील

वरील दोन्ही टप्प्यातील मार्कांची बेरीज करून शेवटी २० पैकी सर्वात जास्त मार्क मिळवणाऱ्या कवितांमधून पहिले ३ नंबर्स काढण्यात येतील

पहिल्या ३ क्रमांक पटकावणाऱ्या विजेत्यांना खालील प्रमाणे रोख रक्कम आणि प्रशस्ती पत्रक मिळतील

तिसरा क्रमांक ->रोख ₹ २००
दूसरा क्रमांक ->रोख ₹ ३००
पहिला क्रमांक ->रोख ₹ ५००

सर्वांना लिखाणासाठी हार्दिक शुभेच्छा.

कविता नोंदणी फॉर्म

->> कविता नोंदणी येथे करा

वर दिलेल्या नावावर क्लिक करून आपली कविता नोंद करून घ्या. आणि पुढील माहितीसाठी खाली दिलेल्या whats app ग्रुप ला जॉईन व्हा.

->> Whats App Group

फॉर्म भरताना काही अडचणी असल्यास आयोजकांना किंवा whats app ग्रुप मध्ये विचारू शकता.

Best Marathi Kavita Spardha 2023

आयोजक

1) आशू छाया प्रमोद
+91 78209 94118
2) प्रतिक्षा गजानन मांडवकर
8308684865

पर्यवेक्षक

१) श्री. भूमिपुत्र वाघ सर
२) सौ. संध्या ताई देशपांडे
३) सौ. संगीता शिंदे, गव्हाणे

Best Marathi Kavita Spardha 2023

संचालक
मनीष अकोलकर
आणि माझा ब्लॉग टीम

Best Marathi Kavita Spardha 2023

समाप्त


आमच्या इतर कविता वाचा.

Romantic Marathi Prem Kavita | पावसातील स्पर्श | पाऊस कविता

कॉलेज लाइफ वरील धम्माल कविता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *