हा पाऊसच उरलाय… | पावसाळा आणि आठवणी | Best Pavsala Kavita 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी Kardile Ankita Sunil यांची -हा पाऊसच उरलाय….- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक Pavsala Kavitaआहे

हा पाऊसच उरलाय.. Pavsala Kavita 2023

Pavsala Kavita पावसाळा

पुन्हा एकदा हा पाऊस आला
आल्यासरशी भूतकाळात घेऊन गेला


मग आठवणी देखील त्यात नाऊन निघाल्या
नाही नाही म्हणता एक एक बाहेर पडल्या


जेव्हा आठवली ती पहिली भेट
असाच पाऊस आणि समोर आली ती थेट


बघताच भान हरपले माझे
न म्हणता मग मनात वाजू लागले गाणे


गाण्यावर त्या ठेका धरावा म्हटलं
पुढे होऊन जरा ओळख वाढवावी ठरलं


हळूच बिचकत घाबरत नमस्कार मी घातला
समोरून हळू पण सुंदर हसत प्रतिकार सुद्धा आला


मग “पुढे कुठला थांबा तुमचा?” हा प्रश्न मी केला

योगायोगाने तो देखील दोघांचा एकच निघाला


आभार मानत देवाचे मग मी पुढचा प्रश्न केला
नाव विचारतात जरा नजरेचा रोखं तिने धरला


पण निर्मळ भाव बघून माझे पुढाकार तिने घेतला
स्वतःचे नाव सांगून माझ्या नावाचा आग्रह तिने धरला


प्राथमिक ओळख इथे संपली होती
आणि तितक्यात बस देखील येऊन थांबली होती मग


चढत बस मध्ये मागे वळून तिने पाहिले

“नवीन होती ती तिथे” मग हे अजूनच पक्के झाले


सोबत बसत तिने माझ्या मग “घर कुठे तुमचे?” विचारले

उत्तर मिळता मग “मी नवीन इथे” असे देखील सांगितले


पुढे बोलताना कळले की शेजारीच आहे घर तिचे
न माहीत का पण मग मन अधिकच सुखावले


मग दिवसागणिक दिवस गेले
ओळख अधिक दृढ होत गेली


आता तिची जागा मैत्रीने घेतली
पण मनात मात्र एक वेगळीच धाकधूक जाणवू लागली


मग जरा मोकळेपणा वाढला आणि
पावसाळ्यात फिरण्याचा छंद दोघांना जडला


नवनवीन ठिकाणी पावसाचा आनंद घेण्याचा
आणि एकमेकांसोबत नवीन आठवणी बनवण्याचा…


आज देखील तो टपरीवरचा चहा, उगीचच मारलेला तो शहराचा पट्टा,

निसर्गाच्या नयनरम्य वातावरणातला फेरा तर धबधब्याच्या पाण्यात केलेल्या खोड्या


नाही नाही म्हणतात सगळ्या आठवणी ताज्या झाल्या

आणि अलगदपणे मनात घर देखील करून गेल्या


ओठावर हसू आणि डोळ्यात आसू दोन्ही एकाच वेळी आले

“ती असती आज सोबत तर झाले असते बरे” असे सुद्धा वाटले


आयुष्यभर तिच्यासाठी जगलो आणि तिच्यासोबत जगलो

पण आयुष्याच्या शेवटच्या वाटेवर मात्र तिने मला एकटं सोडलं


अनोळखी पासून मैत्रीण, मैत्रिणीपासून प्रेयसी आणि प्रेयसी पासून बायको ती माझी झाली
आणि आमची ही गोड प्रेम कहाणी या पावसानेच तर पाहिली


आजही हा पाऊस तिच्याच आठवणींनी भरलाय
माझ्याही आयुष्यात आता फक्त हा पाऊसच तर उरलाय……

Pavsala Kavita

आमच्या इतर कविता वाचा

लग्न म्हणजे काय असते ?

लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

4 thoughts on “हा पाऊसच उरलाय… | पावसाळा आणि आठवणी | Best Pavsala Kavita 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
27 ⁄ 9 =