diwali kavita on marathi

सण दिव्यांचा आणि अनुपम्य सोहळा | 2 Best diwali kavita on marathi

अनिता मधुकर भोई आणि सौ. जयश्री राजेश बारड यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत diwali kavita on marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

diwali kavita on marathi

काव्यबंध समूह आयोजित उपक्रम काव्यलेखन स्पर्धा

सण दिव्यांचा | diwali kavita on marathi

सण दिव्यांचा आणि अनुपम्य सोहळा | 2 Best diwali kavita on marathi

वाट पहावी सणाची
असा वर्षाचा हा सण
काय करावे ते थोडे
सारे होतील हैराण

करू स्वच्छता निर्मळ
रंगरंगोटीच छान
किती करावी तरीही
सजावट समजून

घरीदारी फुलांच्याच
सोडू माळा खालीवर
सण दिव्यांचा हा येता
झगमग दारोदार

होते ती वसूबारस
सुरूवात दिवाळीची
धनत्रयोदशी येता
पूजा ती धन्वंतरीची

करू ते लक्ष्मीपूजन
होते धनाचे पूजन
सारे गर्भश्रीमंतीत
जाती तल्लीन होऊन

रोशनाई ही दिव्यांची
होती लक्ष्मी कुबेरची
अती प्रसन्न मनात
करू आरास दिव्यांची

येता पाडवा मुहूर्त
पत्नी ओवाळील पती
काय हवे ते देईल
खूश होऊन तो अंती

भाऊबीज येई जेंव्हा
वाट पाही बंधुराया
कशी येईल बहीण
काय करावे ते खाया

असा सण हा
दिव्यांचा
घरोघरी होई छान
पाहुण्यांचा तो राबता
सुट्टी मध्ये कोठे भान

म्हणे दिवाळी या सणा
करी ते अभ्यंगस्नान
सुगंधित हे उटणे
सारी अंगाला लाऊन

अनिता मधुकर भोई कुरूंदवाड (कोल्हापूर)

diwali kavita on marathi

काव्यबंद समूह आयोजित काव्य स्पर्धा
विषय : सण दिव्यांचा

अनुपम्य सोहळा | diwali kavita on marathi

अनुपम्य सोहळा | 2 Best diwali kavita on marathi

सण हा मांगल्याचा
सण हा आनंदाचा
सण हा मोद हर्षाचा
सण हा नववर्षाचा

अश्विन कार्तिकी सण
सर्वत्र होतो दीपोत्सव
विजयाचे वाटे प्रतीक
दीपावली नामे उत्सव

दीपावली सण असे
पुरातन व प्राचीन
प्राचीनकाळी यक्षोत्सव
नामे दीपावली अर्वाचीन

अंधःकारास सारून दूर
दिप प्रतीक मांगल्याचे
जीवनातील अंधःकार दूर
करण्या औचित्य दिव्यांचे

दिवाळी दिव्यांची ओळ
दिसते ही नयनरम्य
दारोदारी आकाशकंदील
सोहळा वाटे अनुपम्य

रंगीबेरंगी फुल-
तोरणांचा हा ताज
सडा ,रांगोळीने
अंगणी चढतो साज

चार दिवसांचा सण
आनंद हा क्षणोक्षणी
शुभेच्छा वर्षावांनी
मिलन होईल मनोमनी

वसुबारस प्रथम दिन
गाय वासराचे पूजन
धनत्रयोदशी दिनी
करू धन्वंतरीची आठवण

नरकासुरपाश सुटका
नरक चतुर्दशी दिन
अश्विन अमावस्येस
करूया लक्ष्मीपूजन

कार्तिक पाडव्यास
सण नामे बलिप्रतिपदा
करू बळी राजाचे पूजन
गृही सुख शांती नांदो सदा

भाऊ बहिणीची भाऊबीज
अतूट स्नेहाची सृष्टी
नाते विश्वासाचे ,मायेचे
अनोखी ही दृष्टी

संपू दे अंधकार सारा
उजळू दे अवकाश तारे
गंधाळलेल्या पहाटेस
वाहू दे आनंदाचे वारे

✒️ सौ जयश्री राजेश बारड
अमळनेर जिल्हा जळगाव

Best diwali kavita on marathi

diwali kavita on marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह