diwali poems for students

दिवाळी आत्ताची व स्मरणातली आणि सडा प्रकाशाचा | 2 Best diwali poems for students

सौ. मोहिनी डंगर आणि रवी आटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत diwali poems for students विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

diwali poems for students

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
काव्य बंध समुह आयोजित
साप्ताहिक काव्य लतिका स्पर्धा
दिनांक. २९/१०/२०२३
विषय : सण दिव्यांचा

°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°
दिवाळी आत्ताची व स्मरणातली | diwali poems for students
°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°°

दिवाळी आत्ताची व स्मरणातली आणि सडा प्रकाशाचा | 2 Best diwali poems for students

सण दिव्यांचा,
अंधाराकडून प्रकाशाकडे जायचा,
हल्लीही होतो साजरा,
पण पुर्वी जास्त आवडायचा…

पूर्वी म्हणजे कसं,
सर्व मिळून साफसफाई करायचो,
अंगण सारवून शेणाने,
किल्ल्यासाठी माती आणायचो….

नुसती चढाओढ किल्ले बनवायची,
सभोवताली मोहरी पेरून ती उगवायची वाट बघायचो,
वर्षभर थोडे थोडे पैसे साचवून,
आठ दहा सैनिक अन एक शिवाजी महाराजांची मूर्ति घेऊन यायचो…..

आठवडाभर आधी खरेदीची लगभग,
वर्षातून एकदा नवीन कपड़े मिळायचे,
गरिबांच्या दारात समाधानाच्या लवंग्या,
श्रीमंतांच्या दारात मोठेपणाचे रॉकेट उडायचे….

फराळाची तर गम्मतच न्यारी,
शेजारणी रुसवा फुगवा विसरायच्या,
आज तुझ्या करंज्या उद्या माझ्या बरं का,
हक्काने एकमेकींकडे मदत मागायच्या….

भाऊ जायचा बहिणीला भेटायला,
कसले हेवे जावे नव्हते,
दिवाळी म्हणजे आनंदाची ज्योतीच्
अंतरातही सारे प्रकाशमय होत होते…..

दिवाळी सुरू व्हायच्या आधीच,
गृहपाठ पूर्ण करायचो,
राहिलेल्या सुट्टीत मग,
मामाच्या घरी जायचो…..

आता तस काहीच राहील नाही,
रोजच्या चकाचक घराला कशाला साफ करते बाई,
हलवाईच्या दुकानातून रेडीमेड फराळ आणते,
रांगोळीचे स्टिकर लावते दारात,कसलीच नसते नवलाई…..

पाच दिवसाची सुट्टी,
हाहा म्हणता जाते निघून,
किल्ले बनवायला माती नाही,
वेळ जातो असाच सारा,मोबाइल मध्ये reels बघून…..

शेजार्‍यांची दार बंद सदाकाळ,
शेजारीण ही सारे ऑनलाईन मागवते,
सण येतो……सण जातो,
आम्हाला कसलेच अप्रूप नसते…..

बाराही महिने शॉपिंग,
दिवाळीच कशाला नवीन खरेदीला,
आकाशकंदील मात्र भलामोठा,
लटकवला जातो गैलरीला…

बहीण रुसली भावावर,
जमिनीचा हिस्सा दिला नाही म्हणून,
भाऊबीजेला येत नाही भाऊ,
बहिणीने केस दाखल केली म्हणून….

नवल वाटण्यासारखेच् सारे,
आपली संस्कृती आपण विसरत आहोत,
सण म्हणजे पैशाची उधळपट्टी,
आनंद विकत घ्यायचा प्रयत्न करत आहोत…

वसूबारस,धनत्रयोदशी
महत्त्व आहे प्रत्येक दिवसाला,
लक्ष्मीपूजन,बलिप्रतिपदा,
कारण साजरे करण्याला…

चला साजरा करू, सण दिव्यांचा
माणुसकीच्या पणत्या दारोदारी लावू
पहाटे उठून अभ्यंगस्नान,रांगोळ्या,
व्रत पूर्वजांचे आचरू….

सौ.मोहिनी डंगर,
रायगड

diwali poems for students

काव्यबंध समूह आयोजित
काव्य स्पर्धा
विषय-सण दिव्यांचा

सडा प्रकाशाचा | diwali poems for students

सडा प्रकाशाचा | 2 Best diwali poems for students

येता सण दिव्यांचा वर्षातून एकदा
मुठीतला अंधार तळहातावर घेऊ
मारू एक जोरदार फुंकर त्यावर
आकाशा पल्याड त्यास फेकून देऊ

दिवा दिसतो तेल दिसते वात दिसते
प्रकाश मात्र कुणालाच दिसत नाही
शिखा दिसते शिखेची ठिणगी दिसते
भूक तव्याची चुलीलाही दिसत नाही

सदैव प्रकाशच असतो सोबतीला
दिसत राहतो अंधारच दिवस रात्र
जन्मापासून मृत्यूपर्यंत का छळते
शिख भरलेले दुःख वेदनेचे पात्र

देव बघतो आहे निर्बलाला आधार द्या
दुःखितांचे अश्रू पुसा मानवधर्म पाळा
स्वतःच्याच विचाराने चेहरा पाडू नका
सर्वांच्या स्मितहास्याचा लागू द्या लळा

सूर्य किरणे फेकून रिताच होत जातो
चंद्र ही कधी कलेकलेने वाढत जातो
जाई जुई चंपा चमेली कोमेजून जाते
संसारी मात्र दगडही देव होऊन जातो

या दिवाळीत हृदयाने संकल्प करूया
घर स्वच्छ करताना मनही निर्मल ठेवू
सुख शांतीचे उत्थानाचे शिखरही गाठू
भारत देशा प्रगतीच्या माथ्यावर नेऊ

रवी आटे -सानपाडा – नवी मुंबई
दिनांक 29 ऑक्टोबर 2023
९३२४७४५९७०

Best diwali poems for students

diwali poems for students

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह