काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे यांची -जगात किमया तुझीच सारी – हि कविता -Ganesh Visarjan poem in Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
जगात किमया तुझीच सारी By श्री.ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे | Best Ganesh Visarjan poem in Marathi 2023
जगात किमया तुझीच सारी | Ganesh Visarjan poem in Marathi 2023

सिद्धिविनायक जय विघ्नेशा देवांचा तू देव गणेशा ।
मन बुद्धीची तू परिभाषा भक्त जणांना तुझीच आशा ॥
जय जय जय जय संकटहारी जगात किमया तुझीच न्यारी ॥धृ.॥
रिद्धी सिद्धीची तूच देवता जगात सारी तुझीच सत्ता ।
भक्त गातसे गौरव गाथा तू तर आमचा भाग्यविधाता ॥सकळजणांचा तू कैवारी ॥१॥
जगात महिमा महान तुझा रे भक्तांना अभिमान तुझा रे ।
शुभ कार्याला सर्वांआधी गजानना रे मान तुझा रे ॥
नाव तुझे रे मंगलकारी ॥२॥
तहानलेल्या तुझ्या प्रीतीची भक्त जणांना प्यास लागली । देव्हाऱ्यातील मुग्ध कळ्यांना देवा तुझी रे आस लागली ॥
तुझ्या भेटीची तळमळ सारी ॥३॥
करमत नाही तुझ्याविना रे तुला विनवितो गजानना रे ।
चैन पडेना दयाघनारे आठवं येई पुन्हा पुन्हा रे ॥
एकदंत तू भवभयहारी ॥४॥
तुझ्या स्वागता मंगलमूर्ती फुला फळांनी सजली धरती ।
विश्व स्वागता सजले सारे आनंदाला आली भरती ॥
सजली सारी दुनियादारी ॥५॥
धावत येई गणाधीशा तू या सकलांना दावी दिशा तू ।
पदस्पर्शाने पावन करूनी भक्तजनांची मिटवी दशा तू ॥
हे गणराया तू सुखकारी ॥६॥
तुझ्या आगमने मिळे चेतना पूर्ण कराया मनोकामना ।
दयानिधे रे पतितपावना तुला अळवितो हे श्रीगजानना ॥
येऊन हरवी दुःख सारी ॥७॥
आठव येई क्षणाक्षणाला मन कोठेही लागतं नाही ।
दयाघना रे तुझ्याविना रे दुसरे काही मागत नाही ॥
पतितपावना भवभयहारी ॥८॥
असा कसा रे भक्तवत्सला पुजा आरती सोडून गेला ।
चुकले तरी रे काय आमुचे घोर जीवाला लागून गेला ॥
झाली मनाची फसगत सारी ॥९॥
दुःख मनाला बोचत राही पूजा आरती रोज घडेना ।
तुच जगी या एक सहारा तुझ्याविना रे चैन पडेना ॥
प्रीती तुझी रे जगात न्यारी ॥१०॥
अजान आम्ही तुझी लेकरे हवा आम्हाला तुझा सहारा ।
सद्बुद्धी दे रे गणराया तुझ्या भक्तीचा हवा उबारा ॥
शिणलो भारी या संसारी ॥११॥
घराघरातून मखरे सजली आलो न्यायला तुला गड्या रे ।
रस्त्यावरती तुझ्या स्वागता लाल फुलांच्या पाय घड्या रे ॥
वाट पाहते दुनिया सारी १२॥
आम्हा फुकाचे दान नको रे अहंकार अभिमान नको रे ।
दुष्कर्माने बरबटलेले असे असुरी ज्ञान नको रे ॥
या सर्वांतून आम्हास तारी ॥१३॥
जगात किमया तुझीच सारी By श्री.ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे | Best Ganesh Visarjan poem in Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
जगात किमया तुझीच सारी By श्री.ज्ञानदेव लक्ष्मणराव डिघुळे | Best Ganesh Visarjan poem in Marathi 2023