काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.चंद्रकला प्रमोद अमृतकर यांची -गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला- हि कविता -Ganpati Bappa Poem in Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला By सौ.चंद्रकला प्रमोद अमृतकर| Best Ganpati Bappa Poem in Marathi 2023
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला | Ganpati Bappa Poem in Marathi 2023

किती सांगू मी सांगू कुणाला
गणपती गेले गावाला
दहा दिवसांचे पाहुणे बाई
चैन पडेना आम्हांला. १
काय सांगू गणेशा तूला
गेल्या दिवसापासून माझे
चित्त नाही घरात दारात
तरी कधी करणार आगमन तुझे २
शुभ अशुभ कार्याला
तुझीच रे आराधना
शंकर पार्वती तुझी
करतात रे प्रार्थना ३
तुझी बुद्धीची रे किमया
षडानन करी पृथ्वी प्रदक्षिणा
चालून फिरून दमला रे
तू आपल्या माय बापाला प्रदक्षिणा. ४
विश्वची तुझे गांव
वसुंधरा तुझे आश्रय
विनंती करते तुजला
तू नक्की येणार हा करते निश्चय. ५
तुझे मोदक खिरापत कोण खाणार
मुलं म्हणतात गणपती बाप्पा गावाला गेले
आम्ही एकटे नाही खाणार
तुम्ही कधी येणार कळवा आम्हांला. ६
७) गणाधीश तुझा ध्यास
रात्रंदिन बाल गोपाळांना
आई मोदक कर ना,
बाप्पा घराला येईल ना?
८) बाप्पा गावाला जाऊ नकोस
आमची मजा घालवू नकोस
फक्त शाळा आणि घर एवढेच
आम्हाला वैताग आणू नकोस.
९) बाप्पा असे रे नको करू
कमीत कमी दहा दिवस
सुट्टी काढून तरी ये
आम्हांला पुरे होईल बस.
१०) तुम्हाला सांगायला वाटते लाज
गणपती आमचे गावाला गेले
एवढ्या करता तुमचे नांव
विश्वात ठेवण्यात आले.
११) गणपती बाप्पा याना
आम्ही नाही लावणार डीजे
नाही करणार धांगडधिंगा
नाही आणणार पिझ्झे.
१२) तुला आरास मोठी करूक्ष
छान छान लाइटिंग लाऊ
तुला आवडेल तसा
चौरंग ( पाट )बसायला देऊ .
१३) काव्यमय कविता करू
तुझ्यासाठी गोड गाणी गाऊ
मूषक वाहन आणू
विविध प्रकारचे राग
मुलांना सादर करायला लावू .
१४) तू कुठल्याही गोष्टीचा
राग मनात धरू नको
तुला हवं ते सांग
बाप्पा रागावू नको
१५) हो बाप्पा तुला एक सांगायचे राहिले
येताना गौरीला पण सोबत घेऊन येशील
घर कसे आनंदाने खुलून जाईल
गणपती, गौरी दोघांचे स्वागत करता येईल
१६) बस झाले बाप्पा पुरे आता
चैन पडेना मन रमेना पत्र लिहिले तुम्हांला
झाले गेले विसरा आता
विनंती करतो तुमच्या येण्याला .
चंद्रकला प्रमोद अमृतकर धुळे
नाशिक म्हसरूळ दिंडोरी रोड
आकाश पेट्रोल पंप मागे
गुरु भक्त आपारमेंट 205
नाशिक ४२२००१
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला By सौ.चंद्रकला प्रमोद अमृतकर| Best Ganpati Bappa Poem in Marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गणपती बाप्पा गेले गावाला चैन पडेना आम्हाला By सौ.चंद्रकला प्रमोद अमृतकर| Best Ganpati Bappa Poem in Marathi 2023
Good