Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi

सय बाप्पाची By किरण चौधरी | Best Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी किरण चौधरी यांची -सय बाप्पाची- हि कविता -Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

सय बाप्पाची By किरण चौधरी | Best Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi 2023

सय बाप्पाची | Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi 2023

ganesh visarjan poem visarjan quotes in marathi Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi

गणपती गेले गावाला,चैन पडे ना आम्हाला
निरोप देता बाप्पाला,दहा दिसाची सय येई मला

तू सुखकर्ता तू दुःखहर्ता, तू विघ्नविनाशका
मूषकासंगे नाचत आला तू ,शिव गौरीच्या बालका
।।धृ।।

गणपती बाप्पा आले घरा,वाटे दिवाळी नि दसरा।
मनमोहक देखणी मूर्ती,हटेना मुखावरुनी नजरा
भक्तिमय आनंदी वातावरण,हर्षाने फुलले सारे घर
तेजोमय गुलाबी हसरा चेहरा,नांदे भक्तिचा गजर
साधी भोळी पूजाअर्चा आमुची, हे विश्वचालका
मूषकसंगे नाचत आला तू शिव गौरीच्या बालका ।।१।।

ढगांचा गडगडाट,जणू वाजंत्री बनले
विजेच्या कडकडाटाने फटाके फोडले
बरसल्या सरी तुझ्या आगमनासाठी
चंद्र तारे आले धरतीवर तुझ्यासाठी
प्रकाशमय संध्येस वाटा,नाचत सुटल्या सागर लाटा
मूषकसंगे नाचत आला तू शिव गौरीच्या बालका ।।२।।

हर्ष,उल्हासाने मखर सजविला
लाडू,मोदक प्रेमाचा रे बनविला
तुझे आगमन,प्रफुल्लित मन
दारी बांधयिले पताका नि तोरण
पहाटे सोनेरी सूर्य किरणापुर्वी
डोळे उघडता होईल तुझे दर्शन
दहा दिवस आनंदी क्षण,ऐकू येईल कीर्तन भजन
स्वागतासाठी भक्तजण उधळीती गुलाल नि बुक्का
मूषकासंगे नाचत आला तू शिव गौरीच्या बालका ।।३।।

नवग्रहाची पूजा मांडली,कलशाची स्थापना केली
मूर्ती बैसली चौरंगावरी,विड्याचे पान सुपारी,पै ठेवली
दुर्वा जुडी,शोभे शिरी,मूषकसंगे बाप्पाची भारी जोडी
रिद्धीसिद्धी संगिनी सवे,बांधुनी ठेवली हातकडी
जास्वंदी फुले आवडती तुला,प्रिय तू भक्ताला
मूषकसंगे नाचत आला तू शिव गौरीच्या बालका ।।४।।

सिद्धिविनायका घरी झाला बहाल,
गरीबाची झोपडी झाली महाल*
मोदक,लाडू नाही घरी भोगाला
प्रेमाने मनोभावे हजर सेवेला
आरती करुनि,नैवेद्यासाठी भक्त गातो भजनाला,
ना फळे ,ना मिठाई,डोळयांत अश्रू तरी आनंदला
मूषकसंगे नाचत आला तू शिव गौरीच्या बालका ।।५।।

बाप्पा निरोपाच्या या घटिकेवर
मात करावे आपण कोरोनावर
सोंडेने सारे जंतू पकडून घ्या
नेऊन फेका ना चीन सीमेवर
पत्र्याच्या या ढोल ताशाच्या गजरावर निरोपाची वाटिका
मूषकासंगे परतीचा प्रवास करी तू शिव गौरीच्या बालका ।४।।

दहा दिवस येती भक्त तुझ्या दर्शनासाठी
संकटकाळी धावून येशील तुही भक्तासाठी
भुकेला आहे मी देवा तुझ्या आशीर्वादास
सुखी आनंदी ठेवा देवा,मिळो पोटास दोन घास
प्रेम भोग लावून देतो निरोप, आहे मी फाटका
मूषकासंगे परतीचा प्रवास करी शिव गौरीच्या बालका ।४।।

गणपती गेले गावाला,चैन पडेना आम्हला
निरोप दिला बाप्पाला, दहा दिसाची सय येई मला

सय बाप्पाची By किरण चौधरी | Best Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

सय बाप्पाची By किरण चौधरी | Best Ganpati Bappa Visarjan Caption in Marathi 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *