काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.ऋषीकेश कारभारी आव्हाळे यांची -माझा बाप्पा – हि कविता -ganpati visarjan kavita marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
माझा बाप्पा By श्री.ऋषीकेश कारभारी आव्हाळे | Best ganpati visarjan kavita marathi 2023
माझा बाप्पा | ganpati visarjan kavita marathi 2023

गणराया गणपती बाप्पा
बुध्दीचा देव तू
आम्हा भेटाया धरतीवर
वर्षात एकदा येतो तू
बाप्पा आल्यावर मन
आमचे प्रसन्न होई
दहा दिवस बाप्पाचा
जल्लोशात जाई
बाप्पा तू फक्त दहा
दिवस च का असतो
असा प्रश्न विचारून चिमुकला
सारखा बाप्पाशी भांडतो
एक काम कर बाप्पा तू
पूर्ण दिवस इकडेच थांब
असा सल्ला खूपदा
बारक्या देवाला देतो
बाप्पा प्रेमाने नेहमी
एकच गोष्ट कितीदा सांगतो
बाळा मी पुढच्या वर्षी
लवकर येईल असं समजावतो
बाप्पा येतात दहा दिवस
घर आमचे आनंदी होते
आई बाप्पा साठी
मोदक छान करते
मोदक फराळ खाण्याची
मज्जा मस्ती वेगळी
बाप्पाच्या मांडवात असते
भक्तांची फौज आगळी
बाप्पा च्या मंडळात स्पर्धा
होतात खूप साऱ्या मस्त
किलबिल मुलांची असते
मज्जा बक्षीस मिळवण्याची कस्त
बाप्पा पृथ्वीवर अवतरल्यावर
धरती छान नटते
हिरवागार शालू सोबत
रंगबेरंगी फुल बहरते
बाप्पा आल्यावर सर्वाची
वेगळी मज्जा असते
बाप्पा सोडून शाळेत जाण्यासाठी
चिंटू अन् पिंटू ही रडते
अश्याच जल्लोशात ढोल ताशाच्या
पथकान सह बाप्पाची स्वारी येते
चिमुकल्यांच्या अश्रू सोबत
बाप्पाची मिरवणूक निघते
छोटा पिंटू त्याच्या आईला बाप्पा
परत नेण्याची विनवणी करतो
इकडे भक्त बाप्पाला पुढच्या वर्षी
लवकर येण्याची प्रार्थना करतो
आई बाळाला समजावते
बाप्पा ल जावच लागणार
आपल्याला बाप्पाचे विसर्जन इच्छा
नसतांनाही करावे लागणारं
बाप्पा गेल्यावर सर्व
शांत वातावरण होते
बाप्पा विना दिवस
खूप कसेतरी जाते
मनाला वेगळेच वाटते
दुःख मनाच्या मनात साठलेले असते
दरवर्षी बाप्पा गेल्यावर
ओढ मनाला पुढच्या वर्षीची लागते
बाप्पाच्या आगमनाची वाट पहात
दिवस लवकर सरतात
मनी नवी ऊर्जा घेवून
आगमनासाठी भक्त सज्ज होतात
पुन्हा नवीन वर्षात आगमनाची तयारी करतात
बाप्पाचे भक्त पुन्हा सजावट करतात
डी जे च्या गाण्याने बाप्पाचे
थाटात आगमन होते
बाप्पा तू असाच
आमच्या सोबत राहा
तुझा आशिर्वाद आम्हावर
असाच बरसावा
-ऋषीकेश आव्हाळे

माझा बाप्पा By श्री.ऋषीकेश कारभारी आव्हाळे | Best ganpati visarjan kavita marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
माझा बाप्पा By श्री.ऋषीकेश कारभारी आव्हाळे | Best ganpati visarjan kavita marathi 2023