काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.गणेश रामदास निकम यांची -निरोप देतांना तुला बाप्पा- हि कविता -ganpati gele gavala chain padena amhala in marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
निरोप देतांना तुला बाप्पा By श्री.गणेश रामदास निकम| Best ganpati gele gavala chain padena amhala in marathi 2023
निरोप देतांना तुला बाप्पा | ganpati gele gavala chain padena amhala in marathi 2023

कविता:निरोप देतांना तुला बाप्पा
बाप्पा तुझ्या आगमनाने
घरात आनंद सारा फुलतो
किमान दहा दिवस का होईना
जो तो जयजयकार तुझा बोलतो
बाप्पा तुला आणण्यासाठी
तयारी सुरू होते अगदी खूप
मनात घर करतं बाप्पा
तुझं ते सुंदर असं रुप
नतमस्तक होतो आम्ही
बघून तुझी ती मूर्ती
दहा दिवस सुरूच असते
बाप्पा तुझी ती आरती
नैवेद्य तुझा खाऊन बाप्पा
अंगात येतं भक्तीचे बळ
तू जाऊ नये लवकर बाप्पा
हीच असते आमची तळमळ
बुद्धिवंत किर्तीवंत बाप्पा
तूच मायेचा आमचा झरा
तुझी मूर्ती बघून बाप्पा
आनंद होतो अगदी खरा
ढोल ताशा वाजवून बाप्पा
तुला घरी आम्ही आणतो
दहा दिवस का होईना
आम्ही भक्त तुझे बनतो
मनोभावे पूजा करून तुझी
आम्ही जोडतो तुला हात
तुझ्या आशीर्वादाची बाप्पा
जीवनभर असते आम्हा साथ
शहर असो की गाव असो
बाप्पा तू साऱ्यांचा सुखकर्ता
पाऊस पडू दे दहा दिवस
तूच आमचा तारणहर्ता
बाप्पा तुझ्यापुढे आमचे
चालेल तरी काय?
बाप्पा तूच आमचा वाली
तूच बाप आणि माय
बाप्पा तुझ्या दहा दिवसांत
येऊ दे पावसाच्या सरी
हीच प्रार्थना आहे तुला
भक्तांच्या सर्वच घरोघरी.
बाप्पा तू पाहुणा बनून
देतो सर्वांना आनंद अती
तू जवळ असला की
दूर होते आमची भीती
बाप्पा आमच्या ह्रदयात तू
मांडून बसतो मोठे स्थान
तुला निरोप देतांना मात्र
मोकळं वाटतं सारं रान
डोळ्यात अश्रू जमा होतात
बाप्पा तुला निरोप देता देता
तू घरात ठाण मांडून बसतो
घरातून आमच्या जाता जाता
गप्पा सुरूच राहतात आमच्या
बाप्पा मला नको जायायाला
दहा दिवसाचा पाहुणा बाप्पा
नसतो कायम राहायला
घरातून जाऊनही बाप्पा
आम्ही बघतो दरवर्षी वाट
कारण डोळ्यासमोर सतत
उभा राहतो तुझा थाटमाट
निरोप देतांना बाप्पा तुला
उधळतो आम्ही गुलाल फुले
तुला तर मित्रच मानतात
आमची लहान सारी मुले
सोडत नाही बाप्पा तुला
धरून बसतात खूप हट्ट
या दहा दिवसांत तुझ्याशी
त्यांची मैत्री होते खूप घट्ट
बाप्पा लहान थोर वृद्ध साऱ्यांच्या
मनात खुलतो भक्तीचा मळा
तू आहेस बाप्पा असा
जाता जाता ही लावतो लळा
निरोप देतांना तुला बाप्पा By श्री.गणेश रामदास निकम| Best ganpati gele gavala chain padena amhala in marathi 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
निरोप देतांना तुला बाप्पा By श्री.गणेश रामदास निकम| Best ganpati gele gavala chain padena amhala in marathi 2023