निरोप बाप्पा येण्यासाठी घ्यावा By श्री.गजानन दशरथ पोटे| Best ganpati gele gavala 2023

निरोप बाप्पा येण्यासाठी घ्यावा By श्री.गजानन दशरथ पोटे| Best ganpati gele gavala 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.गजानन दशरथ पोटे यांची -निरोप बाप्पा येण्यासाठी घ्यावा- हि कविता -ganpati gele gavala- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे

निरोप बाप्पा येण्यासाठी घ्यावा By श्री.गजानन दशरथ पोटे| Best ganpati gele gavala 2023

निरोप बाप्पा येण्यासाठी घ्यावा | ganpati gele gavala 2023

ganpati gele gavala 2023

आज बाप्पा आमचा निघाला
तुला निरोप देतांना कंठ दाटून आला
मन हे व्याकुळ आज झाले
नयनी अश्रु दाटून आले ||

आज खिन्न झाले हे मन
शोधत आहे तुझेच चरण
सदोदित बाप्पा गाऊ तुझेच गुणगान
तुझ्या जाण्याने घर आमचे झाले सुनसान ||

बाप्पा तुझ्या राहिल्या मनात आठवणी
तुझ्या आरतीचा सूर आहे अजून कानी
जरी तू गेला गावी तू वसलास आमच्या मनी
सदैव हे चित्त राहील तुझ्याच चरणी ||

विसरू कधी नको बाप्पा आम्हाला
जपून ठेवले आहे आम्ही मनाच्या कोपर्‍यात तुला
बाप्पा सुखरूप पोहच तुझ्या गावाला
माफ कर नकळत झालेल्या आमच्या चुकीला ||

बाप्पा फार बरे वाटले तुमच्या सहवासात
असेच आता नेहमी रहा आमच्या संपर्कात
तुझ्या कृपेचा असू दे आम्हावर हात
पुढल्यावर्षी आणू पुन्हा आमच्या घरी वाजत गाजत ||

बाप्पा मोरया मागणे आहे तुला एकच
विघ्न देशावरील कर दूर
महागाईचा ,प्रदूषणाचा ना व्हावा
आतंकवादाचा,अमानवी विचार व्हावा ठार||

आशिर्वाद तुमचा सदैव असू द्यावा
बाप्पा सदैव आमच्या सोबत असावा
स्विकार भक्ती सुमनांचा देवा करावा
तुम्ही परत येण्यासाठी आमचा हा निरोप घ्यावा||

बाप्पा दुःख, दारिद्र्य सार नष्ट कर
तू जाता जाता सुखाचा दे वर
बाप्पा तुझ्याविना होईल सुने सुने हे घर
आता ऐकू नाही येणार तुझ्या नामाचा गजर ||

जाता जाता बाप्पा सत्ता कोणाची ते सांगून जा
वरूण राजाला थोड समजावून सांगून जा
महागाई, दुष्काळ, दुष्ट विचार यांचा विनाश करून जा
निरोप घे आमचा पुन्हा येण्याचा , तुच आहेस आमचा दीन जनांचा राजा ||

हे लंबोदरा ,गणाधीशा ,गजानना
सांभाळून घे तुझ्या या अजाण बालका
न लागेल हे मन आता तुझ्याविना
घे निरोप परत भेटण्ये हे गण नायका||

गजानन दशरथ पोटे
अकोला
9923208775

निरोप बाप्पा येण्यासाठी घ्यावा By श्री.गजानन दशरथ पोटे| Best ganpati gele gavala 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

निरोप बाप्पा येण्यासाठी घ्यावा By श्री.गजानन दशरथ पोटे| Best ganpati gele gavala 2023

3 thoughts on “निरोप बाप्पा येण्यासाठी घ्यावा By श्री.गजानन दशरथ पोटे| Best ganpati gele gavala 2023”

    1. मस्त 👌❣️
      प्रत्येकाच्या मनातल्या निरोप वेळी कुठे तर असलेल्या भावना

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *