काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.अनिता प्रकाश डोंगरावर यांची -गणरायाची कृपा – हि कविता -ganpati nirop status- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
गणरायाची कृपा By सौ.अनिता प्रकाश डोंगरावर | Best ganpati nirop status 2023
गणरायाची कृपा | ganpati nirop status 2023

भाद्रपद चतुर्थीस होते बाप्पा आगमन तुमचे
स्वागतास उत्सुक सर्वच मोठेअन् बालगोपाल आमचे
भव्यदिव्य सुशोभित मंडपात विराजमान स्थान तुमचे
माता भगिनी समस्त भक्तगण वातावरण उत्साहाचे..
सदैव असता विराजमान सर्वांच्या मनात
भाद्रपदी विशेष स्थान तुमचे आमच्या घरात
बारा दिवस आवडीचे मोदक शोभते ताटात
दुर्वांची माळ रोज तुमच्या गळ्यात
धूप दिप पंचारतीची ओवाळणी थाटात …
सार्वजनिक स्थानी तुमच्यासमोर
कला कौशल्य बालगोपालांच्या होतात सादर
बुध्दीविधाता तुझाच आशीर्वाद त्यांच्यावर
कृपा कर वातावरण शुद्धतेवर दे भर
इकोफ्रेंडली मुर्ती स्थापन व्हावी साऱ्या जगभर…,
सोबतीला माता गंगा गौरी तिसऱ्या दिनी
साडी नेसवली जरीकाठी घेते कुशीत गणु
खण नारळाची ओटी पंचपकवानची मेजवानी
नवसाशी पावतेस त्याच्या नमले तुझ्या चरणी..
शंकर पार्वतीच्या लाडक्या लेका
साऱ्या जगभर असू द्या आपली माया
सद्बुद्धीने बहरू द्या बालगोपाल माणसं आयाबाया
भक्तजनांची हाक तुम्ही हो ऐका …..
लाल जास्वंद प्रिय ,सोबतीला रिध्दी सिद्धी
मुषक वाहन सह निघता मोदक आस्वादाला
त्रिशुल ,गदा ,रुद्राक्ष तुमच्या हाती
पार्वती लाल तुम्ही सर्वांच्या हृदयाती
अलौकिक रूप तुझे नयनी सारे निहारती…..
ध्यास बळावा एक गाव एक गणपती उपक्रमाचा
निरंतर मनी वसू द्या बाप्पा मनात सर्वांच्या
एकोपा राहिल टिकुन ,बोजा नाही खर्चाचा
नवा उपक्रम घ्यावे घडवावी मुर्ती मातीची
बागेतच सोय करावी विसर्जनाची
मातीतच पेरावी बीजे झाडाची ….
वर्षभर जोपासावे गणरायाची स्मृती
येता संकट धावुनी येती विघ्नेश्वरा
गणपती गेले गावाला ,चैन पडेना आम्हाला
म्हणतच खतपाणी देवू झाडाला …
खण नारळाची ओटी पंचपकवानची मेजवानी
नवसाशी पावतेस त्याच्या नमले तुझ्या चरणी..
शंकर पार्वतीच्या लाडक्या लेका
साऱ्या जगभर असू द्या आपली माया
सद्बुद्धीने बहरू द्या बालगोपाल माणसं आयाबाया
भक्तजनांची हाक तुम्ही हो ऐका …..
लाल जास्वंद प्रिय ,सोबतीला रिध्दी सिद्धी
मुषक वाहन सह निघता मोदक आस्वादाला
त्रिशुल ,गदा ,रुद्राक्ष तुमच्या हाती
पार्वती लाल तुम्ही सर्वांच्या हृदयाती
अलौकिक रूप तुझे नयनी सारे निहारती…..
ध्यास बळावा एक गाव एक गणपती उपक्रमाचा
निरंतर मनी वसू द्या बाप्पा मनात सर्वांच्या
एकोपा राहिल टिकुन ,बोजा नाही खर्चाचा
नवा उपक्रम घ्यावे घडवावी मुर्ती मातीची
बागेतच सोय करावी विसर्जनाची
मातीतच पेरावी बीजे झाडाची ….
वर्षभर जोपासावे गणरायाची स्मृती
येता संकट धावुनी येती विघ्नेश्वरा
गणपती गेले गावाला ,चैन पडेना आम्हाला
म्हणतच खतपाणी देवू झाडाला …
गणुच्या आवडत्या ढोल ताशाच्या गजराने
भक्तजन डोलती सारे आनंदाने
पण ऐक सांगते गजराज तुला
नको डोलू देवू मदिरा प्राशनाने माणसाला
सृदृढ उत्तम आरोग्य लाभू दे प्रत्येकाला …..
वक्रतुंड ,एकदंत ,कृष्णपिंगाक्ष,गजवक्र
श्रीलंबोदर ,विकटनाव,विघ्नराजेंद्र ,धुम्रवर्ण
भालचंद्र,श्रीविनायक, गणपती अकरावे
बारावे श्रीगजानन नामस्मरणाने येतो दिवस
शेवटचा अनंत चतुर्दशी अमावस ……
गणपती बाप्पा मोर्या ,पुढल्या वर्षी लवकर या
जय घोषाने दुमदुमते सारी नगरी
लाडक्या गणुराया ,जाता तुम्ही आपल्या गावाला
चैन पडेना आम्हाला ….
गणरायाची कृपा By सौ.अनिता प्रकाश डोंगरावर | Best ganpati nirop status 2023

गणरायाची कृपा By सौ.अनिता प्रकाश डोंगरावर | Best ganpati nirop status 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गणरायाची कृपा By सौ.अनिता प्रकाश डोंगरावर | Best ganpati nirop status 2023