काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ.अनिता मधुकर भोई यांची -गणेशाचे गुणगान – हि कविता -ganpati visarjan kavita in marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
गणेशाचे गुणगान | ganpati visarjan kavita in marathi 2023
गणेशाचे गुणगान | ganpati visarjan kavita in marathi 2023

गणपती गेले गावाला
चैन पडेना आम्हाला
असे गात गात आम्ही
कसे घालवू गणाला
असा गणपती आला
ढोल ताशे वाजवत
कसे केले हे स्वागत
साऱ्या पोरांनी नाचत
आला नेसून पिवळे
पितांबर भरजरी
त्याच्या डोईवर साजे
फेटा रंगीत केशरी
त्याच्या गळ्यामंधी दिसे
माळा मोतीयांच्या दाट
फुल जास्वंदी शोभते
रूप पहा जरा नीट
येतो भादव घेऊन
सण गणेश चतुर्थी
असे हिंदूंचा पवित्र
विनायक ही चतुर्थी
असे आवड गणाची
खीर मोदक गोडाचे
करू मनोभावे पूजा
ठेऊ ताट नैवेद्याचे
फळे ठेऊन नैवेद्य
पंचखाद्य पंचामृत
करू आरती जोमात
वाटू प्रसाद थाटात
असे मूषक वाहन
गणेशाचे एक थोर
असे त्याचीही आवड
लाडू मोदक ते फार
नेई मूषक सर्वत्र
गणेशाला आनंदाने
असे फार तो हुशार
वागे नेहमी बुद्धीने
असे शंकर पार्वती
माता पिता गणेशाचे
असे सारा स्वर्ग जग
रूप दिसे ते मातेचे
असे सुखकर्ता तोच
आणि दुःखहर्ता तोच
धावे साऱ्यांच्या संकटी
माझा बाप्पा गणोबाच
पूजा प्रथम करतो
सर्व कार्याच्या आरंभी
आहे आद्य ही देवता
वक्रतुंड ही प्रारंभी
सोंड गणेशाची असे
लांब सडक देखणी
शोभे एकदंतालाही
लांब कान सुपावाणी
येतो उत्साह घेऊन
दहा दिवस गणेश
पण जेंव्हा तो जाईल
मन होईल निराश
यावे असे गणपती
कधी जाऊ नये घरी
नित्य राहतील माझ्या
सोबतीला खरोखरी
सारे ठेऊया मनात
मूर्ती गणेशाची अशी
कधी नाही विसरावी
अशी स्वप्ने ही उराशी
करू गणेशाशी मैत्री
याच्यासम नाही कोणी
सारे मिळे शिकायला
नवे नवे सारे पाही
केला रात्रीचा दिवस
गणेशाच्या उत्सवात
हरवली भूक आणि
सारी तहान कामात
असा आणे तो उभारी
साऱ्या आयुष्यात भारी
वाट पहातो म्हणून
गणेशाची वर्षभरी
जास्त दिवस चालतो
गणेशाचा हा उत्सव
आहे आवड म्हणून
नसे त्याची ती उणीव
कधी जाऊच नये हा
बाप्पा परत माघारी
असे वाटते आम्हाला
लागे क्षण हा जिव्हारी
सारे करू उत्साहात
गौरी गणपती सण
सारे हिंदू हे गातील
गणेशाचे गुणगाण
गणेशाचे गुणगान | ganpati visarjan kavita in marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
गणेशाचे गुणगान | ganpati visarjan kavita in marathi 2023