सौ. भारती बागल आणि सौ. संघमित्रा सोरटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत green diwali poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
green diwali poem
काव्यबंद समूह आयोजित काव्य लतिका स्पर्धेसाठी स्वरचित काव्य दिनांक 29 ऑक्टोबर 2023
दिव्यांचा सण green diwali poem

दिवाळी येता दारी
दिव्यांची झगमगाट सारी
घरोघरी रोषणाई
लुकलुकत्या ज्योतींची गंमत न्यारी
आनंदाच्या रांगोळीत
लावते स्नेहाची पणती
सडा शिंपते वात्सल्याचा
जपते नाजूक नाती
पेटल्या प्रेम ज्योती
हर्षल मन
ओठात स्मित
आनंदाच धन
लटकला आकाश कंदील
नाना रंग पसरलं
रोषणाई पाहुनी
आनंदा उधान आलं
दोन्ही बाजूस उंबऱ्याच्या
दोन पणती पेटल्या
स्वागता गणेशाच्या
रिद्धी सिद्धी वाटल्या
तुळशी वृंदावनी
लावले निरांजन
ज्योत नाजूक पिवळसर
वेधते मन
तेवल्या समयी
नंदादीप तेवला
लक्ष्मी गणेश पूजन
देव्हारा उजळला
येता सण दिवाळीचा
अंगणाला पणतिचा वेढा
चमचम ज्योतींची
जणू चांदण्यांचा सडा
दिवा लावते नम्रतेचा
उजळते स्नेहाची नाती
माधुर्य भरते वाणीत
वाढवते आदर प्रीती
एक दिवा ज्ञानाचा
दूर अंधार अज्ञानाचा
एक दिवा वात्सल्याचा
मन मन जपण्याचा
उजळते घर अंगण
प्रसन्न होते मन
पाडव्याला पिता पुत्रांचे
दिव्यांनीच औक्षण
राजापासून रंकापर्यंत
दिवा लागतो घरोघर
प्रसन्नता भरतो मनी
श्रद्धा भाव आयुष्यभर
रांगोळी तोरणांनी सजवले घरदार
शोभा नाही दिव्या विना
इवली ज्योत देते प्रसन्नता
हर्ष आनंद मना
वसुबारशीला होते
गाई वासराचे औक्षण
गोड घास देऊन मुखी
प्रसन्नतेने फुलते मन
नानाविध पदार्थांचा नैवेद्य
लक्ष्मीपूजनाला
प्रेमाचे औक्षण
भाऊबीजेस भावाला
प्रेमाने ओवाळते पत्नी
पाडव्या दिवशी पतीला
मानाचा पोशाख
नववधू अन जावयाला
धनतेरसला होते
धनाची पूजा
पणत्यांसोबत
फटाक्यांची मजा
स्वच्छता कानाकोपऱ्यांची
दिवाळी आरास दिव्यांची
फराळाच्या निमित्ताने
आप्तस्वकीयांच्या मिलनाची
दिवाळीचा सण
सर्वांसाठी खास
प्रत्येकाच्या मनी
हर्ष आणि उल्हास
चिमुकल्यांना
फटाक्यांचा ध्यास
वृद्धांमुखी
वात्सल्याचा घास
सौ भारती राजेंद्र बागल
वडूज सातारा
green diwali poem
काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा.
दि.29/20/2023
विषय..सण दिव्यांचा.
आला दिव्यांचा सण | green diwali poem

आनंदाचे सारेच क्षण
प्रफुल्लित होई तनमन
सजले घर ,आंगन
आला दिव्यांचा सण
खरेदीची चाले लयलूट
पक्वान्न दरवळे गंध
पाहुण्यांची रेलचेल
घरभर उस्साह,आनंद
रोषणाई दिव्यांची
आकाशकंदील घरावर
रांगोळ्यांचा रंगीत थाट
चाले प्रभातीच्या वेळेवर
गाई गुरांची वसुबारस
पूजन वासरू गाईच
माया अन् ममतेचं
प्रतिक असे सुंदरतेच
बलिप्रतिपदा, धनत्रयोदशी
बळीच राज्य मिळो
अनिष्ट धरेवरचे सारे
दूर,दूर पळो
पाडवा सह दिवाळी
पतिपत्नी आनंदात
उदंड आयुष्य लाभो
सुवासिनी ओवाळतात
लक्ष्मीच पूजन
मंद तेवतात ज्योती
सुखसमृद्धि नांदावी
शुद्ध भाव लक्ष्मी प्रती
भावाची ती भाऊबीज
दिवस भाऊ बहिणीचा
प्रेमाचा अनंत ठेवा
ओवाळणी हक्काने घेण्याचा
फटाक्यांची माळ, फुलभाजे तडतड
भुईनुळे सुंदर ,अग्नी नक्षी वरवर
अज्ञानाचा अंधार प्रेमानं दूर करी
दिव्यांचा सण दीपावली,
सर्व सणात असे भारी.
सौ.संघमित्रा राहुल सोरटे.
माळशिरस.सोलापूर.

green diwali poem
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह