navratri marathi kavita

अंबा येऊनिया बसलिया घटाला आणि आनंद सोहळा | 2 Best navratri marathi kavita

चि. रावण अरुण पडवळ आणि सौ. संघमित्रा राहुल सोरटे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

navratri marathi kavita

📙📘काव्यबंध समूह📗📕
आपल्यासाठी घेऊन आले आहेत
काव्यलतिका
प्रत्येक रविवारीय होणारी स्पर्धा
▪️दिनांक:- ८/१०/२०२३
▫️वार:- रविवार
▪️विषय :- नवरात्री

अंबा येऊनिया बसलिया घटाला | navratri marathi kavita

◆●◆●◆◆◆◆◆●◆◆◆●◆●◆●◆●

अंबा येऊनिया बसलिया घटाला आणि आनंद सोहळा | 2 Best navratri marathi kavita

उनाड पडलं होतं वरिस सरत नव्हते र हे दिस बघुनि भक्तांची आस माय प्रकटली धराला,
जणू साक्षात रुद्ररूपीनी बनुनी दुर्गा सौम्य ती आलीया सोन्याच्या पावलांनी गरीबाच्या घराला,
स्वर्गी जणू रोवुनी खांब मेरूदंडी घेऊनि हाती त्रिशूल छडीला,
त्रैलोक्याची रत्नसुंदरी जगतमता माय माऊली जगदंबा बैसली घटाला….!

आई तूच जगन्माता तूच राव नि रंकाची सत्ता ठेऊनिया भक्तांची लाज सोडूनि घर आली मज अंगणी मुक्कामी नवं दिसाला,
तुझ्या कृपेच्या छायेत माय मावले मज पामराचा परीवार सुखी तो भवभय झाला,
हाक दिली मी कवण्या ठिकाणी न जाण संकटी पडलो भ्रमाला,
अशी नटून थटून दिसते जणू लाजली अप्सरा आंबा माझी माय बसलिया घटाला….!

तूच प्रथमम दिनी शैलपुत्री, द्वितीयम ब्रम्हचारिणी,तृतीयम चंद्रघंटा चतुर्थकम नमन कुष्मांडा मातेला,
पंचममच स्कंद माता कात्यायनी ती षष्ठमम सप्तममी विक्राळ रुद्ररूपी कालरात्री कलेला,
तथाष्टकम महागौरी वंदन तिजला करोनि नवम्या दिनी सिद्धीदात्री घेतीया भक्त शरणाला,
नवरूप धारींनी एकशून्य प्रतिकाय नवदुर्गा नाम धारी येऊनिया बैसली घटाला….!

करतो रावण निजभाळी जोडुनिया कर तुझं चरण माते माझं ग माहेर येईल सर्वदा माझ्या या घराला,
महाकाल कृपेने सुख नांदले जरी तुझवीन अपुरी जीवनाची शिदोरी सांगतो वंदून तव चरणाला,
तुझा भक्त मी वाटे भिकारी बनून बसावं तुझ्या पायरीला,
भिक्षा वाढ ग आई सपूत झोळी घेऊनि उभा ठाकला तुझ्या दरबाराला,
नमन घ्यावे माते लिहण्या खूप आहे थांबवतो लेखणी घे पोटी घालून चुका लेकरांच्या बैस न रुसता येऊनि घटाला….!
●◆●◆●◆◆◆◆◆●◆◆◆●◆●◆●◆●

🔸नाव:- चि.रावण अरुण पडवळ.
(FUTURE IAS)
🔹गाव/तालुका/जिल्हा:-
🙏🏻महा.२०.🙏🏻
🚩छत्रपती👑संभाजीनगर.🚩
🔸मो.नं:- +९१ ८९९९९७८७८२
+९१ ८९९९०८६१४५

navratri marathi kavita

” काव्य बंध समूह”आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार.
काव्यलतिका….स्पर्धा.

दि.०८/१०/२०२३

विषय…नवरात्री.

आनंद सोहळा | navratri marathi kavita

आनंद सोहळा | 2 Best navratri marathi kavita

नवरात्री उत्सव असे
आनंदाचा हा सोहळा
भाव भक्तीचा चोहीकडे
येई फुलूनीया मळा

अष्टभुजा,आदिशक्ती
रुपें तीची अनंत
असते प्रत्येक घरी ती
कन्या,माता, भार्या रुपात

तिच्याच या स्वरूपांना
दया हो मान,सन्मान
काली,दुर्गा वसते तिच्यात
ठेवा तयाच भान

नवनिर्मितीचा प्रेरणा श्रोत
अखंड तिच्यात भरला
म्हणून जीवन सागर
मानवाचा सुखाने ओथंबला

नका करू अवहेलना
नका करू तिला भ्रष्ट
ऊर्जा जगण्याची देते
रुप अनोखे हे सर्वश्रेष्ठ

आदिशक्ती ची करुया भक्ती
टेकून चरणी माथा
होईल जागर नव दिवस
गीत तिचे गाता

घराघरांतून रुप तिचे
नित्य नवे पाहू
आई जगदंबेच्या सानिध्यात
क्षणभर जग विसरू

दुर्गा काली, महाकाली
असे तीच रेणुका
सिहावर स्वार होऊन
येईल ती अंबिका

नव दिवसाची नव रूपे
नयनी साठऊन ठेऊ
श्रद्धा ठेऊन मनी
चरणकमलावर लीन होऊ.

✍️
सौ.संघमित्रा राहुल सोरटे माळशिरस.सोलापूर.

Best navratri marathi kavita

navratri marathi kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *