Indira Gandhi Information In Marathi 2023

इंदिरा गांधी मराठी माहिती | Best Indira Gandhi Information In Marathi 2023

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून येणाऱ्या तसेच भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी Indira Gandhi Information In Marathi जाणून घ्या.

Indira Gandhi Information In Marathi

पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू जे की एक उत्तम पंतप्रधान राजकारणी आणि उत्कृष्ट लेखक म्हणून प्रसिद्ध आहे त्यांचीच एकुलती एक मुलगी इंदिरा यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1917 मध्ये झाला. या तितक्याच थोर लीडर प्रमुख राजकारणी, काँग्रेसच्या महिला अध्यक्ष होत्या. वडील पंतप्रधान असल्यामुळे त्यांच्या घरामध्ये राजकारणी वातावरण होतं त्यांच्या घरी राजकारणातील मुद्द्यांवर चर्चा केली जात असायची कारण पंडित जवाहरलाल नेहरू हे काँग्रेसचे काँग्रेस सरकारचे प्रमुख सदस्य होते इतकच नाही तर त्यांच्या घरामध्ये नेहमीच स्वतंत्र चळवळ आणि समाजातील विविध वाईट गोष्टींना कसं सोडवता येईल या गोष्टींची या मुद्द्यांवर चर्चा केली जात होती.

इंदिरा गांधी मराठी माहिती | Best  Indira Gandhi Information In Marathi 2023

इंदिरा गांधी यांची आजोबा म्हणजेच जवाहर जवाहरलाल नेहरू यांचे वडील हे बॅरिस्टर होते. इतकच नाही तर ते स्वातंत्र्य बलाढ्य काळातील एक लोकप्रिय आणि सर्वांना आवडणारे नेते होते. स्वातंत्र्य चळवळीमध्ये प्रवेश करण्यासाठी महात्मा गांधींनी जवाहरलाल नेहरू यांना योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली ते वाटचाल करत होते.

पंडित मोतीलाल नेहरू आणि जवाहरलाल नेहरू हे राजकारणामध्ये गुंतलेले असताना इंदिरा गांधी यांना योग्य मार्गदर्शन योग्य शिक्षण देण्याचे काम त्यांच्या आईने केल. त्यांच्या आईचे नाव कमला नेहरू होते ज्या आजाराने पीडित होत्या आणि दीर्घकाळ आजार असल्यामुळे 1936 या साली त्यांचे निधन झाले. इंदिरा या हुशार आणि वैचारिक होत्या त्यांच्या मनामध्ये नेहमीच देशप्रेम देशासाठी काहीतरी करण्याची भावना होती जेव्हा इंदिरा गांधी बारा वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी मुलांना मिळून एक वानर सेनेची स्थापना केली या सेनेचे नेतृत्व बंदर बीग्रेड असे करण्यात आले. या सेनेने भारतीय चळवळीमध्ये एक लहान पण महत्त्वाची भूमिका बजावली.

शिक्षण (Education) – Indira Gandhi

इंदिरा गांधींनी मॅट्रिकची परीक्षा हे पुणे विद्यापीठातून पूर्ण केली.
त्यानंतर त्यांनी शांतिनिकेतन येथील विश्व भारतीय विद्यापीठात पुढील शिक्षणासाठी दाखला घेतला शांतिनिकेतन विद्यापीठ रवींद्रनाथ टागोर यांनी बांधले होते. इंदिरा यांना रवींद्रनाथ टागोर हे प्रियदर्शनी असे म्हणत. ऑक्सफर्ड विद्यापीठाची प्रवेश परीक्षा त्यांनी इंग्लंडला गेल्यानंतर दिली. मात्र त्यामध्ये त्या यशस्वी झाल्या नाही. काही महिने त्यांनी ब्रिस्टलच्या बॅटमिंटन शाळेमध्ये घालवले तिथे त्या उत्तीर्ण होऊन १९३७ मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड च्या सोमरविले कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

इंदिरा गांधी यांचे जीवन साधारण नव्हते. जेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. तेव्हा जवाहरलाल नेहरू हे भारतीय तुरुंगात होते. त्यांना आई-बाबांसोबत कौटुंबिक जीवन अनुभवता आले नाही. त्यांनी शिक्षण देखील भारतीय प्रमुख युरोपियन आणि ब्रिटिश शाळेमध्ये घेतले.

फिरोज गांधींशी लग्न – Indira Gandhi

फिरोज गांधी हे पारशी होते, आणि इंदिरा या हिंदू त्यामुळे फिरोज गांधी आणि इंदिरा गांधी त्यांच्या लग्नाविरुद्ध पंडित जवाहरलाल नेहरू होते. इंदिरा आणि फिरोज यांची 1930 मध्ये स्वातंत्र्य लढ्यादरम्यान भेट झाली. त्या दरम्यान कमला नेहरू बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेल्या असताना ,फिरोज गांधींनी कमला नेहरू यांची खूप काळजी घेतली. आणि अशा कठीण अवस्थेमध्ये फिरोज गांधी नेहमीच त्यांची काळजी घेत असत. ही गोष्ट इंदिरा यांना आवडली . त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधात जाऊन 1942 मध्ये इंदिरा गांधी यांनी फिरोज गांधी सोबत लग्न केलं.

इंदिरा गांधी मराठी माहिती

मात्र महात्मा गांधी यांनी या जोडप्याला पाठिंबा दिला. कारण त्या काळामध्ये आंतरजातीय विवाह म्हणजे खूप मोठी चूक मानायचे. महात्मा गांधींनी मध्यस्थ असलेल्या लोकांना विनंती केली.
इंदिरा गांधी यांच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा भाग हा लग्न करणे होता. कारण त्यांना आंतरजातीय विवाह चालना द्यायची होती. भारत छोडो आंदोलनामध्ये इंदिरा आणि फिरोज हे एकाच तुरुंगामध्ये बंदिस्त होते.

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष – Indira Gandhi

इंदिरा या जेव्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या भाग बनल्या आणि महिला अध्यक्ष बनल्या तेव्हा त्यांच्या आयुष्यामध्ये अतोनात बदल व्हायला सुरुवात झाली. भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी ते 1959 आणि 1960 मध्ये निवडून आल्या. इंदिरा गांधींना पंतप्रधान बनवण्यासाठी पाठिंबा देणाऱ्या कामराज यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. त्यावेळी प्रसारण आणि माहिती म्हणून नियुक्त असलेल्या काँग्रेस पदावर कार्यरत असलेले के शास्त्री यांच आकस्मिक निधन झालं.

राष्ट्रीय सुरक्षा (National Security) – Indira Gandhi

काँग्रेसचे त्यावेळेला दोन भाग झाले एका भागामध्ये कार्यरत असलेल्या मोरारजी देसाई आणि दुसऱ्या भागात कार्यरत असलेल्या इंदिरा या दोघींमध्ये नेहमीच अनेक मुद्द्यांवर मतभेद व्हायचे.
इंदिरा गांधी यांनी 1969 मध्ये परराष्ट्र धोरणाला एक नवी दिशा दिली. सोबतच राष्ट्रीय सुरक्षा या मुद्द्यांचा विचार करून चालना दिली त्याच वेळेला बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले..
मोरारजी देसाई या श्रीमती गांधी यांना गुंगी गुडिया म्हणत इतकच नाही तर एक 1966 मध्ये श्रीमती गांधी या पंतप्रधान झाल्या.

हरित क्रांती (Green Revolution) – Indira Gandhi

इंदिरा गांधींविषयी जेवढा जाणून घेतलं तेवढे कमीच आहे. पण त्यापेक्षाही महत्त्वाचं म्हणजे, हरित क्रांती, इंदिरा यांनी शास्त्री यांच्यासोबत मिळून भारतामध्ये हरितक्रांती आणली. जेव्हा जवाहरलाल नेहरू यांचे निधन झाले, त्या काळानंतर भारतामध्ये अन्नधान्याची टंचाई होऊ लागली ,अन्यधान्य शेती आणि भारतातील शेतकऱ्यांवर मोठ संकट निर्माण झाल या गोष्टींचा विचार करून इंदिरा गांधी यांनी सखोल अभ्यासपूर्वक भारतामध्ये हरितक्रांती आणली. पंतप्रधान या पदावर कार्यरत असताना, त्यांनी त्यांचे संपूर्ण लक्ष हे शेतकरी आणि आपल्या भारत देशातील शेतीवर केंद्रित केलं. शेतीसाठी महत्त्वाचे असलेले रसायन आणि तंत्रज्ञानावर भर दिला ,ज्यामुळे भारतामध्ये शेतकरी हा सुखात आणि हसत आपलं आयुष्य जगू शकेल.

Author :- मिस. प्रतिक्षा गजानन मांडवकर

Pratiksha

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *