रमेश चव्हाण आणि अंकुश कुपले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
जीवनगाणे : Jeevan Marathi Kavita

अनमोल जीवनाचे
जीवनगाणे असे सुंदर
गाऊया निरंतर
सर्वांनी ||१||
चढ उतार
या जीवनात असती
ध्येय वसती
मनामध्ये ||२||
सुख दुःखाचे
गाणे गात राहू
जीवनाकडे पाहू
वेगळेपणाने ||३||
सुंदरसे जीवन
असे आनंदाने जगूया
जीवनगाणे गाऊया
जीवनात ||४||
जीवन जगताना
मनी आनंद ठेवावा
मनमुराद घ्यावा
आनंद ||५||
हसत खेळत
जीवन हे जगावे
जीवनगाणे गावे
आनंदाने ||६||
विनायक कृष्णराव पाटील
ता. जि. बेळगाव कर्नाटक
अनमोल जीवनाचे जीवनगाणे | Best Jeevan Marathi Kavita 2023
जगणे महाग झाले : Jeevan Marathi Kavita

आलो जन्मास मी एकला
जाणे आहेच मला एकले
माणसांच्या गर्दीत आजला
मला जगणे महाग झाले ….१
माणसांच्या गर्दीत दिसतात
माणसेही सारी वेगवेगळी
कोण म्हणावा तो आपला
सारीच माणसे परकी झाली …२
खाताना दोन घास सुखाने
त्यातही कोणी वाटणीस आले
वाटणीसाठी भांडतात सारेच
आता मला जगणे महाग झाले…३
चार चौघात,घरीदारी बोलताना
आता आपले शब्दच मुके झाले
कोण कोणाला घेईना समजून
तिथे त्यांनी माझे बोलणे बंद केले…४
कोणासाठी जगतो मी आजही
समजून नाही कोणीच घेतले
कोणाकडून समजून घ्यावे आज
सारेच आता मुके,बहिरे झाले ….५
माणुसकी नाही राहिली कुठे कुठे
माझे म्हणणारे सारे दुभंगले
जन्मास घातलेले ते ही पोरके झाले…६
असे हे माझ्या जीवनाचे गाणे
मांडावा कुणापुढे हिशोब जगण्याचा
आयुष्याच्या वाटेवरुन चालताना
अर्थ लावावा कसा, या जगाचा..७
जयद्रथ आखाडे
जिल्हा पुणे
अनमोल जीवनाचे जीवनगाणे | Best Jeevan Marathi Kavita 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
कृपया जास्तीत जास्त शेअर करा.