Jivan Marathi Poem

जीवन गाणे गातच रहावे | Best Jivan Marathi Poem 2023

रमेश चव्हाण आणि अंकुश कुपले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

उष:काल जीवनाचा – Jivan Marathi Poem

जीवन गाणे गातच रहावे | Best Jivan Marathi Poem 2023

जीवन गाणे गातच रहावे
आनंदाने जीवन जगावे
संपवूनी मनातले उमाळे
विसरुनी दु:ख,सूख मानसी धरावे

सुजन संगत आपुली छान
नको उगा कसली चिंता करणे
साथ देऊनी एकमेकांशी
देवू झुगारून व्यथांची बंधने

कष्ट जीवनी केले फार
कशास आता ते आठवणे
सोडूनी सर्व बंधनांचे पाश
आनंदी करू जीवन गाणे

अंधाराचा आता नको मागोवा
आता लख्ख प्रकाश पाहणे
शरदातील चांदण्यासम,
लुकलुकत रहावे जीवन गाणे

आले वळण त्या वळणावरती
तोल सावरुनी आता वळूया
विश्वासाची साथ मिळवूनी
हर्षभरे जीवनाचे गाणे गाऊया

स्नेहभरे प्रितीचे हे बंधन
घट्ट असे अतुट ठेवूया
शेवटच्या श्वासापर्यंत असेच
प्रेमभराने जीवन गाणे गाऊया

सुरेख शब्दांचा लेऊनी साज
उमटल्या भावना, मनी तराणे
उष:काल उगवला जीवनाचा
आनंदें गातच राहू जीवन गाणे.

सौं संंगिता अभंग
सातारा.


जीवनगाणे – Jivan Marathi Poem

Jivan Marathi Poem

नसते हाती आपल्या
जन्म अगर मरण
घ्यावा आनंद नित्य
ना करावे दुःखाचे स्मरण

मनी शुध्द भाव ठेवा
कुणाचे पहाता सुख
का आपण करावे
उगाचच सांगा दुःख

जीवन गाणे गात रहावे
सदोदित आनंदात
चिंता खेद यातना
जरी झाल्या आयुष्यात

उगाचच नका धरू
हाव ती गर्भ श्रीमंतीची
आहे त्यात समाधान
ठेवावी तयारी मानण्याची

सदैव रहावे हसतमुख
पहाता कुणी आपणास
तोही जाईल सगळे
विसरून दुःखास

गुलाब पहावा हसरा
चमेली पहावी देखणी
चाफा तो सुगंधीत
निसर्गाची ही करणी

ना होईल रोगबाधा
नेहमी रहावे आनंदात
नको रडगाणे गायला
राहू जीवन गाणे गात

आयुष्य हे क्षण भंगूर
आला यमदेव जायचे टाकून
कशास करायचा हव्यास
समाधानाने जाऊ मरून

सदोदित गाऊ जीवन गाणे
संगीताचे सूर ऐकत
सुखदुःखाच्या तारा छेडत
आनंद राहू नित्य घेत..

वीणा.पाटील कोल्हापूर


जीवन गाणे गातच रहावे | Best Jivan Marathi Poem 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

जीवन गाणे गातच रहावे | Best Jivan Marathi Poem 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
27 + 6 =