Jivan Gane Marathi Poem

आयुष्याचा प्रवास | Best Jivan Gane Marathi Poem 2023

सौ. राधा खानझोडे आणि शुभांगी शिवाजी शेळके यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

आयुष्याचा प्रवास.. Jivan Gane Marathi Poem

Jivan Gane Marathi Poem 2023

जीवन गाणे आयुष्यांचे
गात रहावे आनंदाने
जीवन हा प्रवास आहे
मार्ग काढावा आत्मबळाने…!!१!!

या जीवन प्रवासांत
जगण्यांची आस आहे
थोडं सुख थोडं दुःख
त्यातूनही तरु पाहे..!!२!!

सप्तरंगी जीवनांत
जावे आपण डुबून
फुलांसारखे उमलावे
मस्त प्रेमरंगात रंगून..!!३!!

नशिबात काय आहे
नाही माहित कुणाला
गात रहा जीवन गाणे
अर्थ आहे जगण्यांला…!!४!!

जीवनाचा आनंद हा
आपणच शोधावा
काटेरी कुंपणातूनही
मार्ग त्यातून काढावा..!!५!!

पुढे काय होईल
नको भविष्याचा विचार
मार्गक्रमण करीत चला
ठेवा चांगले आचार..!!६!!

बदलत असते आपले
काळानुरूप आयुष्य
खरा तोच या जगी
कधी घेऊ नये नैराश्य…!!७!!

खरा आत्मविश्वास
अंगी जरूर बाळगावा
केलेल्या प्रयत्नांवर
विश्वास जरूर ठेवावा..!!८!!

नका घाबरू हो तुम्ही
येणाऱ्या कुठल्याही संकटाला
हिंमतीने पुढे जात रहावे
येणाऱ्या प्रसंगाला…!!९!!

आयुष्यांचे गणित हे
आपणच सोडवायचे
आहे त्या परिस्थितीत
समाधान मानायचे…!!१०!!

जीवन क्षणभंगुर आहे
प्रत्येक क्षण वेचावे
हार असो वा जीत
त्याला आनंदाने झेलावे..!!११!!

आयुष्याच्या संध्याकाळी
बिनधास्त जगावे
गेलेल्या त्या स्मृतींना
स्मरणांत साठवावे…!!१२!!

हसतच जगायचे
हसतच मारायचे
जीवनाचा नियम हा
त्यांनी सदा ठेवायचे..!!१३!!

सौ. राधा खानझोडे, नागपूर…
९३२६८२६७३८

आयुष्याचा प्रवास | Best Jivan Gane Marathi Poem 2023

जीवन रडायला लावनारे

आयुष्याचा प्रवास | Best Jivan Gane Marathi Poem 2023

जीवन थांबनार, पळनार,
थोड रडायला लावनार
जो जस कर्म करेल,
त्याला तस पावणार

एक स्मित देन सुध्दा ,
कठीण झालय,
या कसल्या धावपळीत
जगन विसरून गेलय

दुखाचे चार, सुखाचा एक दिवस,
तोही जगता येइना
स्वताच्या धुंदीत राहुन,
दुसऱ्या च्या अडचणी कोनी पाहिला

भविष्याचा विचार न करता,
एकदा वर्तमानात जग
चमत्कारिक आहे जीवन,
एकदा मदत तर करून बघ

न मिळनाऱ्या प्रश्नांची उत्तर ,
शोधन्यात नाही मजा
डोळयात पाणी येइल इतक हसायला शिक,
दुख आपोआप होतील वजा

या आयुष्याचा कारागीर,
आयुष सुंदरच बनवनार,
जर आली संकट कधी
तर तितक्याच जोमाने लढनार

– शुभांगी शिवाजी शेळके
९३५६९८९१६४

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

आयुष्याचा प्रवास | Best Jivan Gane Marathi Poem 2023

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Solve : *
11 + 3 =