Jivan Poem in Marathi

जीवन एक रंगभूमी मराठी कविता | Best Jivan Poem in Marathi 2023

सौ. अचला धनंजय धारप यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत 2024 विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.

जीवन एक रंगभूमी | Jivan Poem in Marathi

जीवन एक रंगभूमी मराठी कविता | Best Jivan Poem in Marathi 2023

जीवन एक रंग भूमी
इथे मनसोक्त जगायचं
दुःखा बरोबर हसण्याचे
नाटक इथे रंगवायचं!!१!!

निराशेचे येतील वादळ
हसून त्याच्याशी लढायचं
आशेचे दिसता किरण
जीवनात रंग भरायचं!!२!!

एक क्षणाचं दिवस सरता
दिवसाचे वर्ष नकळत सरते
घालवलेल्या त्या क्षणाला
कधीच विसरायचे नसते!!३!!

येतील जीवनात खुप संकट
मनातून कधी तुटायच नसते
सारून मागे मनाचे दुःख सारे
मन खंबीर करून जगायचे असते!!४!!

जीवनाचे असती तीन अंक
बाल्य तारुण्य आणी वार्धक्य
वेळेने एक एक संपत जाते
होते सादर करण पुन्हा अशक्य!!५!!

आयुष्यात मिळते एकच संधी
दाखवण्या जीवनाचा अभिनय
लागते तेव्हा कसोटी आपल्याला
देण्यासाठी स्वतःचा परिचय!!६!!

दिलंय देवाने वरदान जगण्याचे
हसत खेळत जगायचं असत
काळाचा पडदा कधीही पडेल
तिथेच आपलं आयुष्य संपत!!७!!

 रमेश चव्हाण
 तोंडली मंडणगड

जीवन एक रंगभूमी मराठी कविता | Best Jivan Poem in Marathi 2023

जीवन मराठी कविता

॥ जिवनगाने ॥ Jivan Poem in Marathi

कवि -कु अंकुश कुपले
(कोल्हापूर )

पणतीने उजळत रहायला शिकवले फुलांने सुगंध द्यायला
शिकवले . निसर्गाच्या सांनिध्यात मिसळून जावे हेच माझे जिवण गाने… ॥१॥
चंद्र चांदण्यासारखे जगणे असावे
या भरकटलेल्या जिवनात मिसळून जावे हेच माझे जिवन गाणे… ॥२॥

झाडे वेली डोलत रहावे नदीच्या त्या झुळ ,झुळ वाहणार्यात मिसळून जावे. पशु पक्षांनी प्रेम दिले हेच माझे जिवन गाणे॥३॥
मित्र मैत्रीणीं च्या सुखा दुःखात मिसळून जावे. स्वप्न साकार करावे.
हेच माझे जिवन गाणे ॥४॥

आई वडीलांच्या कडून
संस्कारांची शिकवण घेऊन त्यांच्या समोर नतंमस्तक व्हावे हेच माझे जिवन गाणे ॥५॥
जिवनाच्या अभादात मोहून जावे
निर निराळे चेहरे पाहतो मन खुल वून जावे.
हेच माझे जिवन गाणे ॥६॥

भाव सोभाव वेगळे पणा अयुष्यात लाले प्रेम अपूलकी जाणून घ्यावे. हेच माझे जीवन गाणे॥७॥
सुर्या ने पहाटे गोड किरणे द्यावे.
चिमणी घरड्यातुन जागा सोडावे.
गुरे वासरे चरायला जावे हेच माझे जिवन गाणे॥८॥
पिलांने चोचित दाने टिपावे. अकाशात भूरकन उढावे. ॥९॥

जीवन एक रंगभूमी मराठी कविता | Best Jivan Poem in Marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *