सौ. सुवर्णा बाबर आणि सौ रश्मी पोतदार यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Jivan Gane Marathi Poem विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
जन्म- मृत्यू Poem on Life in Marathi Language

उदरात आईच्या गाते मी जीवनगाणे
आईचे उदरच इवलूशे जग माझे
इथे न कसलीच चिंता, न कसलीच भीती
इवलूश्या घरट्यात नुसतीच भटकंती…
खेळ खेळून लागला नुकताच डोळा
ऐकू येतं होता गोंधळ सावळा
अलगद उघडले थोडेसे डोळे
सगळेच बडबड करीत होते वेडे…
सुरू झाला होता नवा प्रवास,
पुन्हा एक नवीन जीवन गाणे
नव्या दुनियेत झाला होता प्रवेश
सुरू झाले होते माझे मोठे होणे…
कोड कौतुक होई जिथे तिथे
बालपणं हळू हळू पुढे सरके
सरतासरे काळ बालपणीचा
वेध लागे तरुण्याच्या नवलाईचा…
संपवूनी प्रवास शाळा-कॉलेजचा
सुरू होई खरा संघर्ष जीवनाचा
कर्तव्य, सफलता, अाशा निराशा
झुंज सुरू होते देण्याची जीवनाला नवी दिशा…
कर्तव्य पूर्ती करताना आयुष्यं जातं संपून
आणि मग उमजतं मी तर पहिलचं नाही जगूनं
हळू हळू कुरबूरं सुरू होई मग तब्येतीची
सुरुवात होते मग परतीच्या गाण्याची…
जन्म-मृत्यूच्या प्रवासात येतात कैक नाती-गोती
ठेवून जातात गोड कडू आठवणी
साठवूनी मनात त्या साऱ्या आठवणी
गाते मी सुरेल जीवन गाणी…
सार हेची जीवनाचे समजून-उमजून
जेव्हा जातो माणूस थकून
मग जातो भक्तीतं लीन होऊन
धरीतो भगवंत चरणं…
सौ. सुवर्णा बाबर, पुणे
जन्म-मृत्यू | जीवन गाणे | Best Poem on Life in Marathi Language 2023
….. जीवन गाणे…

जीवन गाणे तुझे माझे..
आपण मिळून गावे..
त्यात मात्र आपण..
एकमेकात एकरूप व्हावे..
तुझ्या अलवार कुशीत शिरूर..
जीवन गाणे गावे..
दोघांनीही एकमेकांच्या..
प्रेमात हरवून जावे..
आपले जीवन गाणे..
प्रत्येकाच्या ओठी असावे..
ते गात असताना..
तुझ्या प्रीतीत न्हाऊन निघावे..
जीवन गाणे गाताना…
तू फक्त माझे व्हावे..
जीवन गाणे गाता गाता..
दोघांनीही हरवून जावे…
तुझ्या माझ्या जीवनाचे.
असेच राहू दे गुपित..
न्हाऊन निघू आपण..
एकमेकांच्या प्रीतीत..
आयुष्याचे जीवन गाणे..
नेहमी असेच गावू..
सख्या तुझ्या माझ्या प्रीतीत..
दोघेही आपण न्हाऊ..
तुझ्या जीवनातील प्रत्येक शब्द..
अलवार माझ्या हृदयात फुलतील..
दोघांच्याही प्रेमभावना..
किती सुंदर जागतील..
सौ रश्मी पोतदार..
… नागपूर…
जन्म-मृत्यू | जीवन गाणे | Best Poem on Life in Marathi Language 2023
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह