Best Marathi Poem Paus

श्रावणसखया आला गं | पावसाळा आणि आठवणी | Best Marathi Poem Paus 2023

काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी सौ. भारती दिलीप सावंत यांची -श्रावणसखया आला गं- हि कविता -पावसाळा आणि आठवणी- या विषयावर असून हि एक Marathi Poem Paus आहे

श्रावणसखया आला गं | Marathi Poem Paus 2023

श्रावणसखया आला गं | पावसाळा आणि आठवणी | Best Marathi Poem Paus 2023

दाटलेत घननीळ नभांत
श्रावण सखया आला गं
झुलूया उंच उंच झोपाळे
मोहरूनी जातेया अंगांग

चला गं सयांनो खेळूया
आलाय पंचमीचा सण
घालूया फुगडी झिम्मा
घालवू मस्तीतच क्षण


श्रावणात साजरी करू
मजा सण सोहळ्यांची
लपंडाव ऊनपावसाचा
तृप्ती होतेय डोळ्यांची

घंगाळल्यात पर्जन्यसरी
दाटूनी आले काळे मेघ
बरसुन धरेवरी रिमझिम
पावसाची सतत जलरेघ



नाचे हरखूनी मयूर वनी
फुलवी सप्तरंगी पिसारा
सळसळे पानापानातूनी
पिसाट बेधुंद रानवारा

नेसुनी हिरव्यारंगी शालू
नटुनिच सजली वसुंधरा
अंथरला गालीचा भूवरी
मखमाली नजारा खरा



बरसती मेघांच्या पखाली
रिमझिमती पर्जन्यधारा
पसरले मनोहारी चैतन्य
पहा सृष्टीचा रम्य पसारा

आला सखया श्रावण
सण सोहळ्यांची रंगत
थाटात नटणे मुरडणे
बसू पक्वानांची पंगत



धागा राखीचा बांधूनी
नात्यांची नाळ जुळावी
बंधुला बहिणीची माया
जन्मोजन्मीस मिळावी

आलाय पंचमीचा सण
झुलवू झोके फांद्यावरी
माहेराच्या अंगणातला
वटवृक्षच सावली धरी


बरसती टप्पोऱ्या धारा
वारा नाचतोया अंगणी
सयांनो घालून फुगड्या
गाऊ झिम्म्याची गाणी

पुजूया वारूळाला रानी
नागोबाला मानुनी भाऊ
दूध लाह्यांचा दावू नैवेद्य
पुरणपोळीचा घास खाऊ



गोकुळात आज साऱ्या
रंगलाय गं बाई सोहळा
बाळकृष्ण तिथे जन्मला
मोद भरला सर्व गोकूळा

मंगळागौरीचा सोहळा
लेकीबाळाही सजल्या
नेसूनी नऊवारी शालू
जलसरींतुन भिजल्या



बैलपोळा खुशीचा सण
ऋणमुक्त होऊया सारें
बळीच्या परिवारामध्ये
घुमते बेंदूरसणाचे वारे

घंगाळल्या पाऊसधारा
वारा नाचतोय अंगणी
चला साऱ्या गं सयांनो
गाऊ झिम्म्याची गाणी

श्रावणमासी जलधारां
बरसल्यात पानोपानी
ऐकू पाखरांची गाणी
चला जाऊयात रानी



मेजवानीच रानमेव्याची
फुले बिट्टीचीही फुलली
चोखू फुलातला मधूरस
खेळण्या पाखरे भुलली

रानमेवा करूया गोळा
चला जाऊ रानच्यावाटे
निळ्याशार नभामधूनी
काळेकुट्ट ते मेघही दाटे



शेते फुलली रानफुलांनी
पसरतो दरवळ साऱ्याचा
सुगंध घेऊनी सांगातीला
झोत घुमलाय वाऱ्याचा

थेंब बरसला ढगांखाली
भिजली ही काळी आई
काळ्याकुट्ट मेघसरींना
उतरण्याची झाली घाई

घालू झिम्माड झिम्मा
आल्यात सया अंगणी
माझ्या प्रीतीच्या बाई
गुंफून पंचमीची गाणी



हळदूल्या चाफ्याचा
सुटलाय बेधुंद दरवळ
होऊन बेभान हा वात
उगा करितो सळसळ

गेली भिजुन तृणपाती
थेंब दवबिंदुंचे पिऊनी
डोलताती वाऱ्यासंगे
झोकात वाकुन लवूनी

शहारून गेलीत पाखरे
पंखावर झेलिती धारा
चिडीचुप्प घरट्यातुनी
पिऊनीच उधाणवारा



थेंब निळ्या नभांतूनी
आले ओथंबून धरेवर
जाग गोठ्याला आली
भिजले सारेच चराचर

पिसाटला हा रानवारा
झुलवतो वेलीची फुले
शिवारात गहू जोंधळा
वाऱ्यासंगेच मस्त डुले

चला वेचू क्षण सुखाचे
मास श्रावणाचा गं बाई
सुखी राहूदे माहेरसासर
सासूसासरे न् बाबाआई

श्रावणसखया आला गं | Marathi Poem Paus 2023

पावसाळा आणि आठवणी | Best Marathi Poem Paus 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

श्रावणसखया आला गं | Marathi Poem Paus 2023

3 thoughts on “श्रावणसखया आला गं | पावसाळा आणि आठवणी | Best Marathi Poem Paus 2023”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *