अर्चना कुलकर्णी आणि श्री मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri marathi kavita lyrics विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
navratri marathi kavita lyrics
काव्यबंध समूह आयोजित साप्ताहिक काव्यलतिका स्पर्धा
दि.०८/१०/२०२३
विषय: नवरात्र
कथा पुराणातील | navratri marathi kavita lyrics

ही कथा पुराणातील ।।धृ।।
जरा ध्यान देऊ ऐका
कथा पुराणातील हो
असूरांच्या नी सूरांच्या
अहो ऐका हो ऐका हो….१
जेव्हा असूर जन्मले
शुभं निशुंभ नावाने
केला पापांचा कहर
नाश केला हो देवाने….२
नाना रुपात येऊन
पायी तुडविले दुष्ट
रिता पापांचा भार
नित सोडविले सृष्ट….३
जे असूर बलशाली
उमा लक्ष्मी रुप घेती
कधी चंडीका होऊन
कधी महाकाली होती….४
धन ती लक्ष्मी होऊन
विद्या देई सरस्वती
रूप शक्तीचे कालीत
नारीरुपे दाखवती…..५
ऐका माता बहीणींनो
करा प्रेम अपार हो
परी खल निर्दालना
घ्यावा काली अवतार…६
अर्चना कुलकर्णी, ठाणे
navratri marathi kavita lyrics
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका
दिनांक:-८/१०/२०२३
विषय:-नवरात्री
नवरंग भक्तगण दंग | navratri marathi kavita lyrics

नवरात्रीचे नऊ रंग
भक्तगण होतात भक्तीत दंग
नऊ दिवसांचे नऊ रूपे
पाहिनं श्रीमुख आनंदाने
देवाच्या दारी विसावतो आत्मा
सुंदर रूप दाखवतो परमात्मा
आनंद जिथं
सुख समृद्धी असते तिथं
भक्तगण होता एकत्र गोळा
दांडिया जागर नैन्यदिपक
होतो तो सोहळा
आनंद साजरा होतो मनमोकळा
एक होता होता
देवा तुम्ही ह्रदयात राहता
कसलाही भेदभाव न करता
तुम्ही सर्व भक्तांनकडे पाहता
रंगाचे म्हहत्व सांगता
निळा रंग आकाशाचा
तेज सुर्य प्रकाशाचा
तेजोमय रहा, आनंदी रहा
पांढरा रंग साफ स्वच्छ
आणि सुंदरतेचे प्रतिक
साफ मन ठेवा, स्वच्छ अंतःकरण ठेवा
सुंदर नाते ठेवा,करू नका हेवा दावा
लाल रंग प्रेमाचं प्रतिक
प्रेम जिथे, आनंद तिथे
लाल असतं रक्त
नका होऊ विभक्त
नऊ रंगाची स्वप्ने नवी
नवरात्रीत पुर्ण व्हावी
नवरात्रीत बाप्पाचा आराम चालू झाला
आता एकमेकांना प्रेमपुर्वक साथ द्यावी
श्री.मच्छिंद्र रत्नाकर झुरंगे
देहू माळवाडी पुणे
9881058501
navratri marathi kavita lyrics

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह