सौ. समीक्षा जामखेडकर आणि रजनी घाटुर्ले यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत navratri par kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.
navratri par kavita
काव्यबंध समूह आयोजित
काव्य लतिका स्पर्धा
दिनांक 8 10 2023
विषय नवरात्री
उत्सव नवरात्रीचा | navratri par kavita

नवरात्रीचा उत्साह देवीने
साज शृंगार बहू केला l
नऊ दिवसाची घटस्थापना
मनी हर्ष किती झाला l १
देवी आणण्याची तयारी केली
वाजत गाजत मैदानी बसली।
रोज आरती पूजनाची तयारी
सगळेजण आनंदाने नाचली। २
पातळ नेसली, साज शृंगार केला
ढोल ताश्याच्या गजर, सुगंध धुपाचा।
देवी मातेला आरतीला दिवा
गावरान तुपाचा। ३
सगळ्याजणी नटून थटून
दांडिया खेळे उत्साहाने।
गाणे वाजती तालावर
कशी तालात टीपरिवर टीपरी पडे। ४
येई उत्साहाला उधाण
आहे जरी नऊ दिवसाचे उपवास।
तहान भूक हरपून जाई
जगदंबे तुझ्या सहवासात । ५
नवरात्राचे नऊ रंग
जीवनात उत्साह भरती
मनोभावे कुलस्वामिनीचे
भजन, पूजन, आरती करीती l६
दहा दिवस कसे गेले
तुझ्या ग सेवेत आई जगदंबे।
उठल्यापासून पळापळ भक्तांची
नऊ रंग तुझे नऊ रूपे। ७
ठेव सुखी सगळ्यांना
आता एकच मागणे।
इच्छा कर पूर्ण सर्वांच्या
श्री आदिमाया जगदंबे । ८
सौ.समीक्षा जामखेडकर🙏🌹
navratri par kavita
नवरात्रीची परंपरा
काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका स्पर्धा
दिनांक 8 /10/ 2023
विषय: नवरात्री
शीर्षक :नवरात्रीची परंपरा

नवरात्र शब्द संस्कृत असूनी
याचा थेट संबंध शेतकऱ्याशी
पावसाचे पहिले पीक येता घरी
घराखालच्या स्थंडिलावर नऊ धान्य पेरूनी
वाढलेले ते अंकुर दसऱ्याच्या दिवशी
देवाला वाहून कृतज्ञता व्यक्त करी
कालांतराने नवरात्रीची परंपरा धार्मिक झाली
भगवतीची उपासना सुरू झाली
नऊ दिवस युद्ध केले महिषासुराशी
विजय मिळविला वध करूनी मां दुर्गेनी
रावणाचाही पराजय राम विजयी
नवरात्र उत्सव याचे प्रतिक म्हणूनी
पितृपक्ष संपताच आश्विनमासी
शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना नऊ बहिणींची
पूजा करुनी घटाला माळ झेंडूफुलांची
राळ कर्पूर व निरांजनात दीप लावून करे आरती
नऊ कुमारीकेचे भोजन पूजन करुनी
अष्टमीला गोंधळ व जोगवा मागूनी
नवमीला कुठे महाप्रसाद कुठे भोजन देई
दशमीला वाजत गुलालासवे निरोप विसर्जनावेळी
मित्रपरिवार ज्येष्ठ व गुरूंना सोनं म्हणुनी
आपटापान देई दसऱ्याच्या दिवशी
साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त विजयादशमी
या शुभ दिवशी लोक नवीन कार्याचे उद्घाटन करी
रजनी घाटुर्ले
उमरेड नागपूर
navratri par kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह