काव्यबंध या मराठी काव्य स्पर्धेसाठी श्री.कवी नागेश रामलू बोंतेवाड यांची -जिवलगा माझा- हि कविता -visarjan quotes in marathi- या कि-वर्डवर असून त्यातून त्यांची उच्च काव्यप्रतिभा झळकत आहे
जिवलगा माझा By श्री.कवी नागेश रामलू बोंतेवाड| Best visarjan quotes in marathi 2023
जिवलगा माझा | visarjan quotes in marathi 2023

काका,मामा, दादा आणि भाऊ
चला चला हो गणराया आणू
आणून गणपती जागर करू
भक्ती भावाने आरती म्हणू
पहिल्या दिवशी नियोजन करू
अकरा दिवस जागर सुरू ठेऊ
ज्ञानाचा भांडार सर्वांना हो वाटू
समाजाला बौद्धिक खुराक देऊ
समाजात जाऊन कार्यक्रम घेऊ
आता अंधश्रद्धेला पुरूनच उरू
अडल्या नडल्यांना आधार देऊ
विज्ञान विचार समाजात हो पेरू
चला चला हो दादा आणि भाऊ
सदा सर्वदा आनंदाने एकत्र राहू
तरुणांना साऱ्या हो एकत्र करून
बलशाली भारताचे स्वप्नच पाहू
गजर गणरायाचा करत जाऊ
घरोघरी जाऊन विचार पेरू
मानवतेला सदा जिवंत ठेऊ भाऊ
नेहमी सदविचारांचा गजर करू
आनंदाने सारे एकत्र येऊ
टिळा कपाळी लावू चंदन
गणरायाकडे मागू वरदान
भक्ती भावाने करून वंदन
सर्वांना चांगली सदबुद्धी देवो
जगी सर्वांना सदा सुखात ठेव
विज्ञान विचार सदा तेवत राहो
नाही रे कोणाला कशाचा भेव
चला चला हो आता जागर घालू
अन्यायाने नको कोणाला मारू
लोकशाही विचार समाजात नेऊ
समाजातील अज्ञान दूर हो सारू
आबलवृध्द हो एकत्र येऊन
चला मुलांनो खेळू या खेळ
अन् करुन गजर गणरायाचा
लहान मोठ्यांचा घालू या मेळ
असा आनंदी सण हो आला
सदविचारांचा फुलावा मळा
सर्वांनी मिळून जागर घाला
माणुसकीचा लागावा लळा
अकराव्या दिवशी हो आनंद मला झाला
माणसाला माणसाशी लागला हो लळा
वाजत गाजत गणरायाचा जागर केला
नित्य गजर गणरायाचा आला हो फळा
चला चला हो शेवटच्या दिवशी सारेच नाचू
बेभान होऊन आनंदाने बाप्पाचे विसर्जन करू
मिळूनी सारे दादा भाऊ एकतेचे बीजच रोवू
जागर करू जगी समतेचे नवे पर्व सुरू
गणपती गेले गावाला,करमत नाही आम्हाला
सवय झाली दररोज आरती करण्याची
घरोघर जाऊन नव विचार पेरण्याची
संगतीने सोबत राहून विकास साधण्याची
नागेश रामलू बोंतेवाड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर
जिवलगा माझा By श्री.कवी नागेश रामलू बोंतेवाड| Best visarjan quotes in marathi 2023

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह
जिवलगा माझा By श्री.कवी नागेश रामलू बोंतेवाड| Best visarjan quotes in marathi 2023
आजच्या काळाची गरज आहे.
खूप छान.