शेतकरी कविता कवी

शेतकरी आणि मला व्हायचय शेतकरी | 2 Best शेतकरी कविता कवी

संगीता देवकर आणि नरेंद्र आनंदराव मोरे यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत शेतकरी कविता कवी विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

शेतकरी | Best शेतकरी कविता कवी

काव्यलतिका
शेतकरी

शेतकरी आणि मला व्हायचय शेतकरी | 2 Best शेतकरी कविता कवी

सकाळी लवकर उठून,
शेतात जातो तो शेतकरी,
अन्नधान्य पिकवतो,
आपल्या कुटुंबाची काळजी घेतो.

उन्हाची तीव्रता,
ढगांचा पाऊस,
वाऱ्याचा झोका,
या सगळ्यात तो शांत राहतो.

शेतकरी हा देशाचा आधार,
त्याला सन्मानाने जगवूया,
त्याला आधुनिक तंत्रज्ञान द्या,
त्याला आत्मनिर्भर बनवूया.

शेतकरी हा एक महान योद्धा,
तो कधीच हार मानत नाही,
तो कठोर परिश्रम करतो,
आणि आपल्या देशाला अन्नधान्याची सुरक्षा देतो.

शेतकरी हा एक संत,
तो निसर्गाचा आदर करतो,
तो पर्यावरणाचे रक्षण करतो,
आणि आपल्या देशाला स्वच्छता देतो.

शेतकरी हा एक कलाकार,
तो आपल्या शेतातून अन्नधान्य पिकवतो,
आणि आपल्या देशाला सुंदरता देतो.

शेतकरी हा एक योद्धा,
तो एक महान व्यक्ती आहे,
तो आपल्या देशाचा अभिमान आहे,
त्याला सन्मानाने जगवूया.

संगीता देवकर

————————————

मला व्हायचय शेतकरी | शेतकरी कविता कवी

“काव्यबंध समूह” आम्ही मराठी साहित्याचे शिल्पकार
काव्यलतिका गुरुवारची स्पर्धा
दिनांक – ३१/०८/२०२३
विषय – शेतकरी
साहित्य प्रकार – काव्य लेखन
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️
शीर्षक – मला व्हायचय शेतकरी
➖➖➖➖➖➖➖➖

मला व्हायचय शेतकरी | 2 Best शेतकरी कविता कवी

माझ्या बापाला पाहिले मी
दिनभर शेतात राबतांना
मशागत जमिनीची करता
नांगर,फाळ हाताने दाबतांना….!!१!!

करत होता अंगभर कष्ट
आहे म्हणे मी शेतकरी
बेइमानीचे काही नको मला
माझी चटणी भाकर बरी….!!२!!

मी कष्ट करतो जरी
उपयोग होई त्याचा कुणाला
आनंद पाहून त्यांचा
मिळे समाधान माझ्या मनाला….!!३!!

निवांत रात्री झोपी जात होता
दिनभर गाळून घामाच्या धारा
ना लागत होता त्याला
कुठल्याच यंत्राचा वारा…..!!४!!

श्रमाला मानून ईश्वर
नव्हती कुठलीच त्याला हाव
सोसावे त्यालाही लागत होते
नैसर्गिक संकटाचे घाव….!!५!!

जिद्दीने राहत होता उभा
कधी न जाता खचून
स्वप्न पूर्ण करायचे होते त्याला
जे मनात होते साचून….!!६!!

स्वप्न बापाचे पूर्ण करण्या
मला व्हायचय शेतकरी
होता स्वप्न बापाचे पूर्ण
दौलत असेल तिच माझी खरी….!!७!!
♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️♾️

  • नरेंद्र आनंदराव मोरे… ✍️
  • जि.अमरावती
मला व्हायचय शेतकरी

शेतकरी कविता कवी

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *