सौ. सीता शेळकंदे यांची साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत aaji ajoba kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेली उत्कृष्ट कविता येथे वाचा.
aaji ajoba kavita in marathi
काव्यबंध समूह आयोजित
काव्यलतिका स्पर्धा
विषय – साप्ताहिक काव्यस्पर्धा
दिनांक – १४\०९\२०२३
सोनपरी | aaji ajoba kavita in marathi

सोनियाच्या पावलांनी
सोनपरी घरी आली,
सुखावले घरदार
भेट सुंदर मिळाली…
संसाराच्या ताटव्यात
जणू गुलाब फुलला,
जडलासे जीव भारी
आनंदाचा पूर आला…
अवखळ बालपण
चैतन्याचा वाहे झरा,
याच्यापुढे त्रिभुवनी
नाही आनंद दुसरा…
खुदकन् हसताना
चंद्र खाली उतरतो,
कैवल्याच्या चांदण्याचा
भास मनाला कळतो…
अनमोल सुख भारी
सारी सुखे झाली व्यर्थ,
चिमुकल्या पाऊलांचा
मर्मभरी आहे अर्थ….
मऊ रेशमी रेशमी
स्पर्श हवासा वाटतो,
शुभ्र पांढऱ्या परीचा
छंद मनाला छेडतो…
फिरुनीया घरभर
खोडी काढते सर्वांच्या,
बोल बोबडे ऐकता
आम्ही राशीत सुखाच्या….
बाहुलीला न्हाऊमाखू
घालीतसे वेळोवेळी,
मांडीवर घेऊनिया
प्रेमभरे कुरवाळी…
हट्ट करुनिया पक्का
नित्य खेळायला जाई,
मातीमध्ये माखलेली
ओळखत नाही सई…
प्रत्येकाची कामे तिची
ज्यांनी त्यांनी करायची,
आजी घालते आंघोळ
आजोबांनी पुसायची…
आजी आजोबा शिक्षक
देऊ नातीला संस्कार,
माणुसकी जपण्याला
देऊ आयुष्या आकार…
नात साजिरी गोजिरी
मम गेलंय भरून,
आजी आजोबा रमले
दुःख सारे विसरून…
-सौ.सीता शेळकंदे
जुन्नर,
जि.पुणे

aaji ajoba kavita in marathi
THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.
नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह