आयुष्याचा रंगमंच आणि जीवन प्रवास | 2 Best ayushya kavita in Marathi

आयुष्याचा रंगमंच आणि जीवन प्रवास | 2 Best ayushya kavita in Marathi

पद्माकर दत्तात्रेय वाघरुळकर आणि डॉ. दक्षा पंडित यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत ayushya kavita in marathi विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

ayushya kavita in marathi

काव्यबंध समूह आयोजित रविवारीय काव्यलतिका काव्य ‘स्पर्धेसाठी’
दि.१अॉक्टोबर २०२३ रविवार
विषय- आयुष्य

आयुष्याचा रंगमंच | ayushya kavita in Marathi

जीवन प्रवास | 2 Best ayushya kavita in Marathi

आयुष्याचा रंगमंच
तीन अंकी जगण्याचा
बाल, यौवन, वार्धक्य
अशी रूपे दिसण्याचा १

एकटंच यावे लागे
अन् एकट्याला जाणे
साथ फक्त येती कर्मे
केली असेल जीवने २

जसा पट वर जातो
अंक सुरूवात होई
प्रथमात बालपण
मातापितापदी डोई ३

बोल बोबडे ऐकून
धन्य जनकजननी
हात धरून करती
सदा ते पायाभरणी ४

रांगण्यानं उभे जेव्हा
चालण्यास पुढे पाय
करे कौतुक बाळाचे
नेहमीच बापमाय ५

यौवनात पदार्पण
वृद्धी गुणासह रूप
अध्ययनी एकाग्रता
विकासाचे ते अप्रूप ६

गृहस्थीच्या आश्रमात
मग हळूच प्रवेश
प्रपंचात परमार्थ
साधण्याचा तो आवेश ७

हळूहळू अवयव
साथ सोडू लागतात
वार्धक्याची खूण वाटे
वानप्रस्थी म्हणतात ८

चार पुरूषार्थ अन्
चार आश्रम आयुष्या
देती आकार जीवनी
साकारती ते भविष्या ९

तीन अंकांचं आयुष्य
जगू सौख्य समाधानी
छान भूमिका कराव्या
हेच सदा ठेवा ध्यानी १०

✍️पद्माकर दत्तात्रेय वाघरूळकर (दत्तिंदुसुत) छत्रपती संभाजीनगर. मो.क्र.९७३०७९८२७९🤝

ayushya kavita in marathi

काव्यबंध समूह
दि १.१०.२०२३
विषय : आयुष्य

जीवन प्रवास | ayushya kavita

जीवन प्रवास | ayushya kavita in Marathi

जीवन प्रवास म्हणजे
क्षणोक्षणी असे संघर्ष
प्रयत्न,जिद्द,चिकाटीने
होई आयुष्यात उत्कर्ष…१

आयुष्याच्या प्रवासात
असावा एक उद्देश
प्रयत्नांची साथ मिळता
मिळतसे सुयश….२

पळभर जीवनात
क्षण क्षण महत्त्वाचा सदुपयोग तयाचा करता
मेवा मिळे आनंदाचा..३

आयुष्याचा सारिपाट
सुख दु:खाचा खेळ
धैर्याने तोंड देवुनी
बसवू आयुष्याचा मेळ..४

आयुष्य असे अनमोल
नका करू त्यास फोल
जीवनात आपल्या
साधावा सदा समतोल..५

पळभर जीवनात
क्षण क्षण महत्वाचा
सदुपयोग क्षणांचा करता
मेवा मिळे आनंदाचा..६

आनंदाचे क्षण सारे
घ्यावे हाताच्या ओंजळीत
आठवात जपून ठेवता
मनास करती प्रमुदीत….७

सारे दु:खाचे,नकोसे क्षण
थारा नसावा मनात
स्मृतीतुनी घालवून तयांना
जगूया आपण आनंदात..८

आयुष्य हे क्षणभंगुर
द्यावा त्यास आकार
नयनात स्वप्न बघुनी
करूया त्यांना साकार….९

डाँ दक्षा पंडित
सँनडियागो, अमेरिका

ayushya kavita in Marathi

ayushya kavita in marathi

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *