Durga Devi kavita

जगदंबा आली घरा आणि नवदुर्गा | 2 best Durga Devi kavita

सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी आणि सोमदत्त कुलकर्णी यांच्या साप्ताहिक काव्यलेखन स्पर्धेत Durga Devi kavita विषयावर रजिस्टर झालेल्या उत्कृष्ट कविता येथे वाचा.

Durga Devi kavita

काव्यबंध समूह आयोजित काव्यलतिका

दिनांक:- ८/१०/२०२३

विषय :- नवरात्री

जगदंबा आली घरा | Durga Devi kavita

जगदंबा आली घरा आणि नवदुर्गा | 2 best Durga Devi kavita

मंचकी निद्रा दूर सारून अश्विनात जगदंबा बैसे घटी |
माय माउली माझी अंगणी येता येई सुख पर्वणी मोठी ||


सहर्षे करीता देवालयी घटस्थापना आईच्या सेवेचा लाभ मिळे |
मनोभावे प्रार्थना करीता षड्रीपुंचे अंधकारमय भय दूर पळे ||


ललिता पंचमीसी अर्पिता मातेसी फुलोरा मनात फुले श्रद्धेचा मळा |
अष्टमीसी होम आहुती अर्पण करीता होती अष्टसात्विक भाव गोळा ||


नवमीसी बनविली पंचपक्वान्ने त्यात पुरणपोळीचा असे न्याराच थाट |
जगदंबा रुपी सवाष्ण आली भोजन करावया, तिला देऊ बसायला चांदीचा पाट ||


उगवता दसऱ्याचा सुदिन क्षण येई समीप मातेच्या सीमोल्लंघनाचा |
जगदंबा स्वधामगमन करणार म्हणुनी मनी दाटे भाव विरहाचा ||


असत्यावरी सत्यच विजय मिळवते हे सांगते विजया दशमी |
याकामी जगदंबेने सहाय्य केले होते रघू नंदनास होऊनी सुक्ष्मी ||


विजयश्री देणाऱ्या शमीचे आपण सारे करूया दसऱ्यासी पूजन |
अन् मनाच्या तळ्यात उठणाऱ्या सुख तरंगांचे सारेच करूया चिंतन ||

©®सौ. वैष्णवी परेश कुळकर्णी नाशिक

Durga Devi kavita

काव्य बंध समूह आयोजीत स्पर्धा काव्य लतिका
विषय: नवरात्री

नवदुर्गा | Durga Devi kavita

नवदुर्गा | 2 best Durga Devi kavita

तुच दुर्गा तु भवानी नवरात्री आद्य मान
शैलपुत्री माता गिरी कन्या शोभते छान

हिमालय कन्या शोभे प्रकट झाली प्रभाती
वर्ण नारंगी तिचा शोभे शोभतसे दिव्य कांती

पुजन द्वितीय दिनी नाव ते ब्रम्हचारिणी
कमंडलू शोभे हाती शुभ्र वसन धारिणी

पुजन तृतीय दिनी करु ते चंद्र घंटेचे
स्वर्ण कांती शोभतसे धरु चरण मातेचे

पुजन चतुर्थ दिनी करु कूष्माण्डा मातेचे
अष्टभुजा देवी शोभे करु पूजन मातेचे

पुजन पंचम दिनी करु या स्कंद मातेचे
स्वार झाली सिंहावर करितो पुजन तिचे

पुजन सहावे दिनी स्मरु कात्यायनी नित्य
चतुर्भुज मुर्ती शोभे मातेस स्मरु हे सत्य

कृष्ण वर्ण कालरात्री पुजन सातवे दिनी
अज्ञान दूर करिते मुर्ती साठवावी मनी

गौर वर्ण महागौरी पुजा आठवे दिनी
महादेवा संगे शोभे आहे सर्वांची जननी

पुजा नवम दिनी स्मरु माता सिद्धिदात्री
यश बल, किर्ती, धन देई माता ठेव खात्री
१०

©®सोमदत्त कुलकर्णी
कोल्हापूर

best Durga Devi kavita

Durga Devi kavita

THE END
जर आपल्याला देखील कविता किंवा साहित्य लिहिण्याचा छंद असेल आणि आमच्या मासिक कविता स्पर्धांमध्ये तुम्हाला भाग घ्यायचा असेल तर आम्हाला नक्की कळवा. तुम्ही आम्हाला 7020965224 या नंबर वर Whats App करू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून संपर्क साधू शकता.

https://wa.link/ag8iy7

नवनवीन साहित्य तुमच्या पर्यंत आणण्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो. मराठी भाषेचा ऱ्हास होऊ नये यासाठी तिचे लेखन, वाचन, मनन केले पाहिजे अशी आमची धारणा आहे. तुम्ही देखील या कार्यात सहभागी होऊ शकता.

कविता स्पर्धा Kavita Lekhan Marathi KAVITA SPARDHA MARATHI


आमच्या इतर कविता वाचा.
लग्न म्हणजे काय असते ?
लेकी साठी सुंदर चारोळ्या संग्रह

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *